Skip to main content

भटकंती सह्याद्रीच्या कुशीतली...K2S ट्रेक

लेखक sagarshinde यांनी सोमवार, 01/05/2017 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
(ट्रेकिंग बद्दल माझे अनुभव लिहिण्याचा हा माझा छोटासा प्रयत्न आहे त्यामुळे व्याकारनिक चुका सांभाळून घ्या हि विनंती :-) )

न्यूरेम्बर्ग - भाग ३

लेखक अफगाण जलेबी यांनी सोमवार, 01/05/2017 18:11 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूरेम्बर्ग - भाग २ न्यूरेम्बर्ग - भाग ३ २० नोव्हेंबर १९४५ या दिवशी खटल्याला प्रत्यक्ष सुरुवात होण्याआधी अनेक पडद्यामागच्या घडामोडी घडल्या. खटला सुरु होण्याच्या साधारण एक आठवडा आधी रशियन सरकारी वकील रुदेन्कोला मलेरिया झाल्याचा निरोप न्यायाधीशांना मिळाला. ब्रिटिश आणि अमेरिकन वकिलांचा आणि न्यायाधीशांचा अर्थातच याच्यावर विश्वास बसला नाही. ‘ हा राजनैतिक मलेरिया असावा ‘ असं मत ब्रिटिश परराष्ट्र खात्याने व्यक्त केलं. दुसरीकडे सर्व आरोपींच्या वकिलांनी या न्यायालयाच्या वैधतेला आव्हान देणारी एक याचिका दाखल केली.

तलाक

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/05/2017 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. सुधीर रा. देवरे ही पोस्ट केवळ उत्सुकता आणि जाणून घ्यावे या हेतूने लिहीत आहे. म्हणून या पोस्टचा अर्थ कोणी धार्मिक वा राजकीय या अंगाने घेऊन गैरसमज करून घेऊ नये ही विनंती. मी या विषयाकडे सामाजिक प्रबोधन म्हणून पाहतो. सगळ्याच धर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध या विचारधारेतून झालेले हे लिखाण आहे: परदेशात राहणार्‍या माझ्या एका उच्चशिक्षित मुस्लीम मित्राला विचारलं, ‘आजच्या काळात तोंडी तीन तलाक विषयी तुमचं मत काय आहे?’ मित्र म्हणाला, ‘आपण धार्मिक बाबींवर न बोललेलं बरं. आपण आरएसएस विचारांचे आहात का?’ त्याचे उत्तर ऐकून मी चपापलो.

एका माणसाची गोष्ट

लेखक परशुराम सोंडगे यांनी सोमवार, 01/05/2017 14:54 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आणि व्यथा ************** **एका माणसाची गोष्ट ** शेवटची बस चुकली. आता खाजगी वाहना शिवाय पर्याय नव्हता. पाण्याची बाटली घेतली. ढसा ढसा पाणी प्यायलो. आता खाजगी वाहन जिथं लागतात तिकडं निघालो.थोड पुढं चलत गेलो की एक पोरगा पळत पळत आडवा आला. तो पण ओरडतचं," साहेब, पाटोदा ना ?" " हो, तुला कसं कळलं ?" " असं कसं ? तुम्हाला कोण ओळखत नाही? " अशी स्तुती केली की मला थोड मूठभर मांस अंगावर चढल्यासारखं वाटलं. " बरं तुझी गाडी कोणती ?' " मॅक्स आहे साहेब " " टेप ?" " आताच नवा कोरा बसविला ...सांऊड सिस्टीम पण.." " पण ड्रायवर चांगला का ?" " एकच नंबर ? त्याच्या ड्रायव्हींगला तोड नाय. लय हात साप त्याचा" " अरे...!

स्मृती संचय (मेमरी)

लेखक मंजूताई यांनी सोमवार, 01/05/2017 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
सेतू - अ कॉन्शस पॅरेंट फोरम तर्फे मैत्रेयीने(समुपदेशक) 'मेमरी' वर एक चर्चात्मक कार्यक्रम घेतला. मैत्रेयीने टाटा इंस्टीट्युट ऑफ सोशल वर्कमधून एमएसडब्ल्यू केले आहे. पौगंडावस्थेतील मुला व मुलींच, विवाहपूर्व व विवाहत्तोर जोडप्यांचं ती समुपदेशन करते. विचार करणे, शिकणे व स्मृती संचय ह्या तीन एकत्रित गोष्टीने मुलांची बुद्धिमत्ता ठरते. ‘घोका व ओका’ उत्तमतर्हेनने करतो, म्हणजेच ज्याचं पाठांतर चांगलं आहे पूर्वी त्याला हुशार म्हटलं जायचं! पण आज हा समज खोटा आहे.

निकाल : महाराष्ट्र दिन २०१७ - चारोळी स्पर्धा

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 01/05/2017 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, महाराष्ट दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. या खास दिवसाच्या निमित्ताने घेतलेल्या चारोळी स्पर्धेचा निकाल आज जाहीर करीत आहोत. इतक्या कमी मुदतीत सुद्धा आवाहनाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल आणि उत्तमोत्तम रचना पाठवल्याबद्दल सगळ्या स्पर्धकांचे मन:पूर्वक आभार. सर्वच प्रवेशिका खरोखर सुरेख होत्या.

आमची फटाफट झणझणीत मिसळ

लेखक सविता००१ यांनी सोमवार, 01/05/2017 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
कृती: आधी नेहमीसारखी तेल, मोहरी,जिरे, हिंग, कढीपत्ता घालून फोडणी करून त्यात वाफवलेली मटकी घातली. गोडा मसाला, तिखट, मीठ, किंचित आमचूर पावडर आणि साखर घालून ससरसरीत उसळ करून घेतली. आता कट करायचं ठरवलं :) कट्/तर्री: जरा जास्त तेलाची फोडणी करून त्यात कढीपत्त्याबरोबरच थोडी पुदिना पाने चिरून घातली. आलं-लसूण पेस्ट १ चमचा, ४ छान लालभडक पण ओल्या मिरच्या आणि २ छोट्या कांद्यांची पेस्ट त्यात घालून परतले. १ मोठ्या टोमॅटो ची प्युरी त्यात घालून तेल सुटेतो परतलं. त्यात धने जिरे पावडर, गरम मसाला, तिखट (सोसेल एवढं). मी १ टी-स्पून घातलं होतं.

आंब्याची शिकरण (दूध आंबा):

लेखक अनन्न्या यांनी सोमवार, 01/05/2017 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: 5 हापूस आंबे, (हापुसच), दूध अर्धा ली. , साखर दोन चमचे, अगदी थोडे मीठ. aamba कृती: आंबे स्वच्छ धुवावेत. दोन बाजू कापून घ्याव्यात, त्यावर उभ्या आडव्या फोडी होतील अशा सुरीने रेषा माराव्यात. चमच्याने भांड्यात काढून घ्याव्यात. दोन्ही कडा पण कापून त्याच्या फोडी करून घ्याव्यात . कोयीचा रस काढून घ्यावा. दूध न तापवता गार करून घ्यावे. फोडी आणि रस एकत्र करावा.

#मिपाफिटनेस - मी आज केलेला व्यायाम - मे २०१७ - #व्यायामविडा

लेखक वेल्लाभट यांनी सोमवार, 01/05/2017 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, दर महिन्याप्रमाणे या महिन्यातही आपल्या समोर एक मिपाकर आपली व्यायामगाथा सांगणार आहेत. ह्या महिन्याचे मानकरी आहेत "वेल्लाभट"! मुंबईसारख्या ठिकाणी अत्यंत धावपळीच्या दिनचर्येतही रात्री उशीरा का होईना पण ठरवलेला व्यायाम केल्याशिवाय न झोपणारे हे मिपाकर! नोकरी, जाण्या येण्यात जाणारा वेळ, लहान मुल अशा आपल्याकडे असणार्‍यशासर्व सबबी त्यांच्याही आयुष्यात आहेतच. पण त्याचा बाऊ न करता नित्य नियमाने व्यायाम तर करतातच पण सोबतच मिपाफिटनेसच्या धाग्यावरही त्यांचे प्रतिसाद अत्यंत वाचनीय असतात. ह्या महिन्याचा मिपाफिटनेसचा धागाही असाच वाचनीय असेल ह्यात शंकाच नाही.

साद

लेखक मिडास यांनी सोमवार, 01/05/2017 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आजोबांना एक सवय होती, ते कुठल्याही लहान मुलाला 'देवा' अशी हाक मारायचे. खूप गम्मत वाटायची त्या गोष्टीची. त्यांची ती हाक ऐकण्यासाठी म्हणून मग मी मुद्दाम लपून बसायचो कुठेतरी. घराच्या एखाद्या अनोळखी कोपऱ्यात दडून त्यांची हाक ऐकण्यामध्ये एक अपूर्व असा आनंद होता. या म्हाताऱ्या लोकांच्या आवाजात काय जादू असते कळंत नाही. सतत मुरत असलेल्या मुरंब्याची गोडी असते त्यांच्या स्वरात. त्यांच्या स्वरांची जादू असेल किंवा त्या शब्दाची असेल पण कसलीतरी भूल पडत होती त्या वेळी.