Skip to main content

मानगड, कुंभे घाट आणि बोचेघोळ घाट भटकंती

लेखक स्वच्छंदी_मनोज यांनी रविवार, 14/05/2017 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
२०१४ च्या जानेवारीचे दिवस. नुकताच मेगा ट्रेक करून झाला होता तरी अस्सल ट्रेकभटक्या प्रमाणेच दोन-तिन आठवडे जाताच ट्रेकचा ज्वर चढायला लागला होता. ह्यावेळी असाच एक क्रॉसकंट्री घाटवाटा ट्रेक करण्याच योजत होतं. सोबतीला नेहेमीचे, हक्काचे आणि समानधर्मी सोबती होतेच. तसे तर आता इतक्या वर्षांच्या सहसह्यभटकंतीमुळे एखाद्याने ट्रेक ठरवला (हा एखादा होण्याचे काम आमच्या ग्रुपमध्ये मला आणि अजून दोघाना करावे लागते :) ) की बाकीचे पटापट बॅगा भरायला घेतात आणि आमच्या आधी तयार असतात :). तर ट्रेक ठरवला होता काहीसा आडवळणाचा पण दुर्लक्षीत नव्हे.

दहीवडा

लेखक सविता००१ यांनी रविवार, 14/05/2017 14:13 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्यांना आवडणारा एक पदार्थ म्हणजे दहीवडा. मस्तच लागतो तो. तर काल आमच्याकडे हाच बेत. किती किती कारणं त्याची - एक तर शनिवार म्हणून मारुतरायाला उडदाने मस्का मारायचा. दुसर्‍या दिवशी चतुर्थी म्हणून रात्री काही उरायला नको, सगळे मजेत काय बरं खातील? असला डोस्क्याला व्याप नको.... हुश्श.

उकडांबा

लेखक अनन्न्या यांनी रविवार, 14/05/2017 10:33 या दिवशी प्रकाशित केले.
ही पारंपरिक रेसिपी आहे, माझी आजी, आजेसासूबाई करायच्या. पूर्वी कोकणात पावसात फार भाज्या मिळत नसत. तेव्हा या बेगमीच्या पदार्थांचा उपयोग व्हायचा. हे करायला ठराविक झाडाचे रायवळ आंबे वापरले जायचे. फक्त आंबे उतरून काढायचे, पडलेले नको.

माय

लेखक Dr prajakta joshi यांनी रविवार, 14/05/2017 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
ओल्या मायेची सावळ्या छायेची कावड भरल्या वात्सल्याची माय माझी.... मातृदिनानिमित्त.....

माणूस आणि कालगणना ( घोळ आणि त्याची शास्त्रीय करणे)

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 13/05/2017 19:03 या दिवशी प्रकाशित केले.
माणूस आणि कालगणना ( घोळ आणि त्याची शास्त्रीय करणे) हे शिर्षक बराच विचार करून असे दिले आहे कारण तारखांचा आणि तिथ्यांचा घोळ ह्यावर आजकाल लोकांच्या भावना आणि इतर बरच काय काय दुखायला लागलंय. पु.ल.नी असामी असामी मध्ये म्हटलय की “सुटीशी संबंध आल्या शिवाय तिथीची भांडण सुरु होत नाहीत...” आता ह्या वाक्याला विनोदी संदर्भ आहे पण हे वाक्य आठवायला कारण झाले ते आताच म्हणजे १५ मार्च २०१७ला आलेल्या वर्षातल्या दुसऱ्या शिवजयन्तीचे. सरकारी (!) शिवजयंती १९ फेब्रुवारीला झाली. पण अजून एक शिवजयंती तिथीप्रमाणे साजरी होते. आता हि गोष्ट कोणीही मान्य करेल कि छत्रपती शिवाजी महाराज एकदाच जन्माला आले होते.

कथुकल्या ७

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 13/05/2017 13:57 या दिवशी प्रकाशित केले.
१ . मायावी माझ्या स्वागताला ना पाचूंनी मढलेला दरवाजा होता, ना हिरेमाणकांसारख्या लखलखणाऱ्या अप्सरा. ज्या दगडी दरवाजातून मी आत आलो होतो त्यावरून स्पष्ट होत होतं की ही गुहा आहे. चारीबाजूंनी काळ्याशार, उंचच उंच दगडी भिंती होत्या. गुहा निर्जीव नसून जिवंत आहे अशी अनुभूती होत होती. कुबट, कोंदट वासाने जेरीस आणलं होतं. मला माहीत होतं की मी कुठे आलोय. तेच ठिकाण ज्याला जगातले सगळ्या धर्माचे लोक घाबरतात. ज्याच्या भितीमुळे बऱ्याच श्रद्धा आणि अंधश्रद्धांचा जन्म झालाय. नक्कीच मी नरकात आलो होतो.

सदाभाऊ

लेखक Vinayak sable यांनी शुक्रवार, 12/05/2017 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
एकेकाळी शेतकऱ्यांसाठी जीवाचं रान करणारे सदाभाऊ आज स्वतः सत्ताधारी विशेष म्हणजे कृषिमंत्री झाल्यावर त्यांच्या भूमिकेत झालेला बदल कवी व वक्ते जगदिश ओहोळ यांनी त्यांच्या *सदाभाऊंचा ऊर* या कवितेतून नेमकेपणाने मांडला आहे. शेतकऱ्याचा जीव घेतेय त्यानेच पिकवलेली तूर आता भरून कसा येत नाही शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर गोडी लागली सत्तेची वारं लागलं AC चं अन चळवळ झाली दूर आता भरून कसा येत नाही शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर भावनिक बोलून गाजवायचे सभा अन अश्रूंचा त्यांच्या सभेत वाहायचा पूर आता भरून कसा येत नाही शेतकऱ्यांसाठी सदाभाऊ चा ऊर मातीची नाळ तुटली की माणूस माणसातनं उठतो शेतकऱ्यांतला पांडुरंग त्याला लाल

शाळा- मंतरलेले दिवस

लेखक योगेश आलेकरी यांनी शुक्रवार, 12/05/2017 16:37 या दिवशी प्रकाशित केले.

शाळा- मंतरलेले दिवस

स्वप्नवत विद्यालयाचे प्रवेशद्वार a शालेय जीवन म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक हळवं पान असतं तर काहींच्या आयुष्यातील एक भळभळती जखम. स्वछंदी असे ते जीवन संपवून आपण कधी जबाबदार होऊन जातो कळतच नाही..असच २००६ मधील एप्रिल महिन्यात माझं बालपण संपत होतं.

हंपी: दिवस पहिला- राजवाडा परिसर- भाग २

लेखक प्रचेतस यांनी शुक्रवार, 12/05/2017 16:15 या दिवशी प्रकाशित केले.
हंपी: दिवस पहिला- चंद्रशेखर आणि सरस्वती मंदिरं - भाग १ सरस्वती मंदिरापासून एक कच्चा रस्ता जातो तो राजवाडा परिसराकडे. तसं बघायला गेलं तर चंद्रशेखर मंदिर आणि सरस्वती मंदिर राजवाड्याच्या परिसरातच येतात पण तुलनेने ते तेथून काहीसे लांब आहेत. राजवाडा परिसर (Royal enclosure) हे विजयनगरच्या राजवटीचे केंद्र. चहूबाजूंनी तटांनी वेढलेलं, विजयनगरची बहुतांश संपत्ती येथेच एकवटलेली, विजयनगरच्या बहुतांश शासकीय इमारती देखील येथेच. विजयनगरचं एक सर्वांगसुंदर मंदिरही ह्याच परिसरात, आजही कर्नाटकात महत्वाचा समजला जाणारा दसरा उत्सव होई तो इथेच.

इमान....भाग २

लेखक चिनार यांनी शुक्रवार, 12/05/2017 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्या भागाची लिंक http://www.misalpav.com/node/39750 इकडं गब्ब्यांन पैश्याची जुळवाजुळव सुरु केलती. इमानात बसाची त्याची लय इच्छा व्हती. त्यानं बायकोला न सांगता गावच्या बँकेत एक खातं ओपन केलंत. जमनं तसे पैसे टाकत जाय तो त्याच्यात. गब्ब्यांन गपचिप जाऊन पैसे काढून आनले. अन तिकडं बबन्यानं तिकीटाची जुगाडबाजी चालू केली. बबन्या एक नंबरचा फकाल्या मानुस. त्येच्या पोटात काही रायते का? अन तसपनं खेड्यात कोनती गोष्ट लपून रायते ? येक दिवस बबन्यानं गब्ब्याच्या हातात तिकीट टिकवलं... "घे बे सायच्या.जमवला तुया जुगाड" "काय सांगतं? येक नंबर काम झालं ना हे.