Skip to main content

गोवा पर्यटन जून महिना माहिती

लेखक saumitrasalunke यांनी मंगळवार, 06/06/2017 13:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, या आठवड्यात (१० ते १४) कुटुंबासोबत (ज्यात लहान मुले आहेत - वयोगट ३ त ५ वर्षे) गोव्याला (प्रथमच) जायचा विचार आहे. शाकाहारी सदस्यसुद्धा संख्येने जास्त आहेत. या मोसमात कुठे राहणे योग्य राहील, ४-५ दिवसात कुठे भेटी देता येतील याबद्दल कृपया मार्गदर्शन करावे. लहानग्यांची मौज होणार असेल तर बजेट लवचिक ठेवायची तयारी आहे. कृपया मार्गदर्शन करावे. धन्यवाद, सौमित्र

क्रृष्णमेघ

लेखक चष्मेबद्दूर यांनी मंगळवार, 06/06/2017 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
क्रृष्णमेघ प्रणयी बरसून गेला तो क्रृष्णमेघ होता. .

अभियांत्रिकीच्या पद्व्युत्तर शिक्षणासाठी जर्मनीत कसे जायचे?

लेखक मुक्त विहारि यांनी मंगळवार, 06/06/2017 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मिपाकरांनो, ह्या वर्षी आमचे मोठे चिरंजीव बी.ई. इंस्ट्रुमेंटेशन होतील. त्याला पुढील शिक्षण जर्मनीत घ्यायचे आहे. आपल्या मिपा कुटुंबातील सदस्यांना ह्या विषयी काही माहिती असल्यास विचारावे म्हणून हा धागा प्रपंच. आपलाच, मुवि.

जय महाराष्ट्र बोला

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 04/06/2017 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
अरे बोला बोला जय महाराष्ट्र बोला कुणाच्या बापाची भीती नाय बोला दणकूण बोला तुम्ही जय महाराष्ट्र बोला अरे बोला बोला जय महाराष्ट्र तुम्ही बोला आता नाही तर कधीच नाही हे ठेवा ध्यानी सीमाभाग आमच्यात घेवू लक्षात घ्या तुम्ही उगा पिरपिर करू नका नाहीतर एकच ठेवून देवू टोला बोला बोला जय महाराष्ट्र बोला बापजादे खपले आमचे सीमालढा देवून लाठ्या काठ्या खाल्या लई हाल सोसून खोटे गुन्हे नका दाखल करू कन्नडीगांनो, झाले मराठी आता गोळा बोला बोला जय महाराष्ट्र बोला मराठी शाळा तुम्ही संपवल्या की हो कानडीची सक्ती तुम्ही राबवली हो सोईचे नियम केले हो केले दमनशास्त्र तुम्ही राबवले हो राबवले खेळी केली अन गावं खिशात घा
काव्यरस

अंबरनक्षी

लेखक सांजसंध्या यांनी रविवार, 04/06/2017 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
अंबरनक्षी ====== सुखाच्या जाणिवेपोटी निद्रीस्तदामिनी झाली नेणीवलकेर लहरता निर्झरली शब्दमाऊली उरले ना रितेपण रिते आठवसाठले रांजण डोळ्यातील आसवांनी आता भरले गं आंगण त्या क्षितिजरेषेवरती झेपावला मानसपक्षी विलंबित जलदांसाठी उमलली ही अंबरनक्षी ही सांज ढळण्याआधी तेवते गाभारसमई स्मरणातील उत्सवसंध्या पांघरते गर्दनिळाई - सांजसंध्या 4.6.2017
काव्यरस

वॉशिंग्टन डीसी मेट्रो एरिया सहल - भाग १

लेखक जुइ यांनी रविवार, 04/06/2017 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २, भाग ३, भाग ४ बर्‍याच वर्षांपासून वॉशिंग्टन डिसीला जाऊन तिथल्या चेरी ब्लॉसमचा बहर पाहावा हे मानात होते. त्या निमित्ताने अमेरिकेच्या राजधानीतील इतरही ठिकाणे पाहता येतील हा उद्देश त्यामागे होता. हो नाही करत या वर्षी चेरी ब्लॉसम महोत्सव पाहायला जायचे असे ठरले.

पुरुष नसबंदी आणि समज गैरसमज

लेखक नर्मदेतला गोटा यांनी रविवार, 04/06/2017 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुष नसबंदी आणि समज गैरसमज पुरुष नसबंदी या विषयाबाबत आपल्या देशात अनेक गैरसमज आहेत. लोकशिक्षण करून ते गैरसमज दूर करावेत असेही कुणाला वाटत नाही. स्त्रियांच्या शस्त्रक्रियेच्या मानाने पुरुष नसबंदी फार सोपी, कमी वेळखाऊ वगैरे वगैरे फक्त जमेच्या बाजूच सांगितल्या जातात. पूर्ण माहीती स्वतः पेशंटला तरी असते की नाही शंका आहे. वास्तविक पेशंटला पूर्ण माहिती देऊन त्याने सारासार विचार करून निर्णय घ्यावा ही अपेक्षा आहे. पण जाहीरात अशी होते. यूं गया यूं आया, आल्यावरही तोच जोष कायम इ. पुरुषावर नसबंदी केल्यावर पुढचे तीन महीने आतमधे वीर्य तसेच असल्याने गर्भधारणा होण्याची शक्यता असते.

कथुकल्या १०

लेखक अॅस्ट्रोनाट विनय यांनी शनिवार, 03/06/2017 15:39 या दिवशी प्रकाशित केले.
१. अपघात रात्रीचे अकरा वाजले होते. अशोक पानसे त्याच्या अंधाऱ्या बेडरुममध्ये बसलेला. झोपणे तर दूर, गेल्या एक तासापासून तो जागचा हललाही नव्हता. तो अॅक्सीडंट राहून राहून त्याच्या नजरेसमोर येत होता. सिग्नलचा दिवा लाल झाला पण तो घाईगडबडीत होता, दिव्याकडे लक्ष न देता त्याने गाडी सुसाट पुढे पळवली. त्याच्या उजव्या बाजूचा सिग्नल केशरी झाला. पुढच्याच क्षणाला वाहनांचा लोंढा अन त्याच्या अग्रभागी असलेला बाईकवाला वेगात समोर आला. ब्रेक दाबायचं कुणालाच जमलं नाही. धडक बसली अन बाईकवाला दूरवर फेकला गेला. हॉर्न वाजत होते, लोक ओरडत होते.पण अशोकची दृष्टी बधिर झाली होती.

नटनागर कृष्ण

लेखक शरद यांनी शनिवार, 03/06/2017 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
नटनागर कृष्ण भगवान कृष्ण ही एक महान विभुती असली पाहिजे. असं बघा, जन्मता जन्मता तुरुंगातून पळणे ते सोन्याची द्वारका समुद्रात बुडवून नंतर एका रानात शांतपणे मरणाची वाट पहाणे या दोन नाट्यमय क्षणांमधील आयुष्यात त्याने काय काय केले किंवा खरे म्हणजे काय काय केले नाही ? सर्व स्तरातील माणसांना मग ते स्त्री-पुरुष, आबालवृद्ध, गरीब-श्रीमंत, ज्ञानी-अज्ञानी कोणी असोत, आपल्याला भावेल, तेथे आपण पाहिजे होतो, असे वाटावे अशी एक तरी घटना कृष्णाच्या आयुष्यात घडलेली असते. तुमचा देवावर विश्वास नसेल तर विश्वदर्शन तुम्हाला भाकडकथा वाटेल व त्याला महान विभुती म्हणावयास तुम्ही तयार होणार नाही.

सायकल प्रवास - पुणे ते पोखले (वारणानगर, कोल्हापूर )- एक स्वप्नपूर्ती

लेखक अजित पाटील यांनी शनिवार, 03/06/2017 11:36 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. गेली २ वर्ष झाली सायकलचे थोडे वेड लागले आणि सायकल प्रवास सुरु झाला. अभियांत्रीकी पर्यंत पूर्ण शिक्षण सायकल ने केले नंतर १४ वर्ष नोकरीच्या मागे धावायला लागलो. त्यामुळे ७० किलोचा मी ८८ किलोचा कधी झालो कळालेच नाही. सर्व डाएट प्लॅन करून झाले पण ते फक्त काही दिवसांपुरतेच आणि नंतर ये रे माझा मागल्या प्रकार चालू व्हायचा आणि वजनाची गाडी पुढे पुढेच धावायची. दोन वर्षांपूर्वी माझे मित्र गजानन खैरे यांनी मला सायकलींग बद्दल सांगितले. तो दररोज आपले सायकलींग बद्दलचे फिटनेस अॅप चे फोटो व्हाट्सपवर पाठवत होता.