Skip to main content

विक्रम आणि वेताळ पदार्थविज्ञानाच्या जंगलात

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 02/07/2017 14:29 या दिवशी प्रकाशित केले.
जगातल्या जवळजवळ सर्वच संस्कृतींमध्ये कपोल कल्पित कथांची रेलचेल आहे. त्यांच्यात भुताखेताच्या, झाडावरील भुता-खेताच्या, हडळींच्या, हैवानांच्या गोष्टी तर असतातच. अशीच काही भुते आपल्या आजुबाजूला कायम वावरत असतात. माणूस बसला असला किंवा फिरत असला, जमिनीवर, पाण्यात, हवेत असला, झोपला असला किंवा उतारवरून गडगळत खाली जात असला तरीही त्याला ही पदार्थविज्ञानातली भुते पछाडल्याशिवाय राहत नाहीत.

कोथरूड (पुणे) इथे कुणी मिपाकर आहेत का? मी उद्या ३ जुलै २०१७ ला कोथरूडला आहे.

लेखक मुक्त विहारि यांनी रविवार, 02/07/2017 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, काही कारणानिमित्त (पुण्याला कारणाशिवाय जाणे, शक्यतो टाळतो) मी उद्या संध्याकाळी, सोमवार दिनांक ३-०७-२०१७ कोथरूड (पुणे) इथे येत आहे. मंगळवारी संध्याकाळी डोंबिवलीला परत येणार. एखादा मिनी कट्टा पण करता येईल आणि त्या निमित्ताने पुण्यातील मिपाकर मित्रांना पण भेटता येईल, हा हेतू आहेच. आपलाच (कट्टाप्पा) मुवि

रावेरखेडी १

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी शनिवार, 01/07/2017 21:50 या दिवशी प्रकाशित केले.
www.misalpav.com/node/30970 मिसळपाव ही काय भानगड आहे हे माहित नव्हतं त्यावेळी श्री मोदक ह्यांचा हा लेख वाचला. बाजीराव पेशव्यांची समाधी मध्य प्रदेशात कुठेतरी आहे हे कळाल. लेख खुप छान होता. वडीलही इतिहास प्रेमी असल्याने त्यांनी सुध्दा पुन्हा पुन्हा वाचला. काही दिवसांनी मध्य प्रदेशात इंदौर च्या शंभर की.मी. अंतरावर मुंबई आग्रा महामार्गावरील शाजापुर ह्या ठीकाणी पवनउर्जा कंपणीत नोकरी लागली. (आताही आहे.) कंपणीत सर्व भारतातील मुलं आहेत. पण जीतके मुलं आहेत त्यातल्या मराठी मुलांशी चांगली गट्टी जमली.

टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य...

लेखक दमामि यांनी शनिवार, 01/07/2017 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
टाळण्या कवटाळण्या वा पाळण्यायोग्य काही म्हणा पण ऐट तिची भाळण्यायोग्य.. चाटते ती ज्या अदेने मान वेळावून शेपटी चवरीच भासे ढाळण्यायोग्य. बिल्ली असे भारी बिलंदर, अर्धोन्मिलित नयनी टाकते तिरपे कटाक्ष जाळण्यायोग्य. रे किती पिल्ले निघाली एकापुढे एक या विणीला अंत नाही, भंजाळण्यायोग्य. विषय 'मनी'चा म्हणून विणली माळ शेरांची जाणतो मी, मुळीच नाही माळण्यायोग्य. प्रेरणा- अर्थात श्री गुरुजी आणि नवीन सदस्य.

रानभाजी महोत्सव २०१७

लेखक त्रिवेणी यांनी शनिवार, 01/07/2017 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
रानभाजी - ऑगस्ट २०१७ चिंब पाऊस अल्लड वारा, धुंद हवा मृदगंध नवा l रानातुनी बहरे रानमेवा, तयाचा मज आस्वाद हवा ll या वर्णनासारखे अगदी नितांत सुंदर, श्यामल आणि पावसाळी व सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदूषण मुक्त अस्सल नैसर्गिक वातावरण भीमाशंकर डोंगराईत असलेल्या आहुपे या गावात दर पावसाळ्यात असते. या गावात गेली २ वर्षे वनवासी कल्याण आश्रमातर्फे, आदिवासी समाजातील आपल्या बंधू/भगिनींसाठी ""रानभाजी महोत्सव"" अशी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा घेतली जाते. आपल्याला माहीतही नाहीत अशा काही उत्तम पालेभाज्या या भागात श्रावण मासात उगवतात. आपल्या सर्व आदिवासी भगिनींना आणि मातांना या भाज्य

नावात बरंच काही असतं!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/07/2017 17:35 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे नावात काय आहे, असं म्हटल्याबरोबर आपल्याला शेक्सपिअर हे नाव आठवतं. हो, फक्‍त नावच आठवतं. कारण शेक्‍सपिअर नावाची व्यक्‍ती कोणी पाहिली? निदान मी तरी नाही. व्यक्‍तीच काय पण शेक्‍सपिअरचं छायाचित्रही मी अद्याप पाहिलं नाही. आपण पाहतो ते शेक्‍सपिअरचं चित्र आहे. असो. म्हणजे नावात काय आहे, हे वाक्‍य म्हणायला कितीही आकर्षक वाटत असलं तरी प्रत्यक्षात नावात बरंच काही असतं. नातेवाईकातल्या एका मुलीचं लग्न होतं. लग्नपत्रिका मिळाली. वराचं नाव वाचलं. तेजेंद्र उर्फ बंडू आणि कंसात नाना. नावाखाली एम एस ई बी असं लिहिलेलं.

#मिपाफिटनेस दिल की धडकन का मॉनीटर - भाग २

लेखक विंजिनेर यांनी शनिवार, 01/07/2017 03:45 या दिवशी प्रकाशित केले.
भाग-१ : ....आता इथपर्यंत आपण मोजमाप केली, बरीच आकडे मोड केली, भाग-२ मध्ये ही सगळी आकडे मोड प्रत्यक्ष वापरायची कशी हे बघणार आहोत!... ---------------------------------------- आपण काही परिभाषा बघूयात. १. इझी रन - ७०% हार्ट रेट रेंजमधे राहून केलेले रनिंग २. रिकवरी रन/जॉग - ६५% हार्ट रेट रेंजमधे राहून केलेले रनिंग ३. टेंपो रन - ८५% हार्ट रेट रेंजमधे राहून केलेले रनिंग ४. व्हीओटू मॅक्स (किंवा माझ्या भाषेत - वॉमीट लिमीट) - ९०% ते ९५% हार्ट रेट रेंज मधे केलेले रनिंग. ५.

ब्रह्मगिरी - भांडारदुर्ग मोहीम

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी शनिवार, 01/07/2017 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
ब्रह्मगिरी-भांडारदुर्ग मोहीम १. धुके दाटलेले... रविवारला जोडून सोमवारची ईदची सुट्टी होती. जून महिन्याचा शेवटचा रविवार, पावसाला सूर गवसू लागलेला. खरं तर शनिवारी रात्रीच ट्रेकसाठी निघायचे होते. पण १८ जूनला कळसूबाईला जाऊन आले होते, बच्चे कंपनी स्पेशल ट्रेक करुन. त्यामुळे आत्ता घरुन रजा नव्हती.

अनवट किल्ले १३ :म्यानातून उसळे तलवारीची पात, सामानगड ( Samangad)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 30/06/2017 20:51 या दिवशी प्रकाशित केले.
ई.स. १६७४. राजधानी रायगडावर शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाची तयारी चाललेली, सगळीकडे निमंत्रणे गेलेली. अगदी कट्टर शत्रु ईंग्रजानही निमंत्रण पोहचले होते, पण खुद्द स्वराज्याच्या एका मानकर्‍याला मात्र या सोहळ्याला यावयाची परवानगी नव्हती, कोण हा शिलेदार ? हे होते स्वराज्याचे सरनौबत कुडतोजी गुजर उर्फ प्रतापराव गुजर. स्वराज्याच्या एका डुख धरलेल्या नागाला, बहलोलखानाला त्यांनी हाती गवसलेला, असताना, जतजवळील उमराणीजवळ धर्मवाट दिली. हाती आलेला शत्रु, गवसलेला नाग आणि न विझलेली आग या तीनही गोष्टी अर्धवट दुर्लक्षित करायच्या नाहीत, हे शिवाजी महारांजांचे धोरण विसरण्याची चुक या मानकर्‍याकडून झाली होती.

सोलमेट २

लेखक नीलमोहर यांनी शुक्रवार, 30/06/2017 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
तिच्या डेस्कवर बसून आकांक्षा विचार करत होती, आयुष्यातील घटना एखाद्या टाइमलॅप्स व्हिडीओप्रमाणे तिच्या डोळ्यांसमोरून सरकत जात होत्या. घरातल्यांपासून आलेला दुरावा, नात्यांतील अपेक्षाभंग, असफलता, करिअर मधील स्टॅग्नेशन, कधीमधी छळणारे एकटेपण, या सगळ्यांचा एकत्रित परिणाम होऊन आधी ती जवळ्पास डिप्रेशन मध्ये गेली होती. "मॅडम चला, सुटलं ऑफिस..