Skip to main content

ऐसी भी क्या जल्दी है !

लेखक sudhirvdeshmukh यांनी बुधवार, 09/08/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या सर्वाना पुढे जायची घाई आहे. परंतु काहि महाभागांना मात्र जरा जास्तच घाई दिसते. ही सतत व्यस्त, त्रस्त आणि काहिशी अत्यव्यस्त असणारी मंडळी भेटणार्यांची अनेक ठिकाणे आहेत. प्रामुख्याने ATM, पेट्रोल पंप, ट्राफिक सिग्नल्स, टिकिट खिडकी इत्यादी ठिकाणी ही मंडळी हटकुन भेटतात. गर्दीच्या रस्त्यांवरून सुसाट वेगाने वाहने पळवनारे कुशल वाहन चालक याच जात कुळीतले. बहुतेक सर्वाना रेल्वे स्टेशन वर जायचे आहे व पोहचले नाहीतर यांची गाड़ी सुटनार, अर्थातच गाडी सुटली तर यांचे आयुष्यभराचे नुकसान होणार, असेच आपल्याला वाटावे एवढ्या सुसाट वेगात ही मंडळी जात असतात.

श्रावण सायकल सफर ०९ ऑगस्ट १७

लेखक भ ट क्या खे ड वा ला यांनी बुधवार, 09/08/2017 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
दीर्घ विरहा नंतर आज सायकलिंग ची संधी मिळाली. खर तर अंबरनाथ ते वाडा अशी ६५/७० किमी ची राइड करायचा विचार होता, पण ज्या सायकल मित्रा कडे जाणार होतो त्यालाच अचानक ठाण्यात यावे लागले, अचानक उद्भवलेल्या कौटुंबिक कारणांमुळे. त्याचा रात्री निरोप आला ,त्यामुळे मग वाड्याला जे बघायला जायचं तेच जवळपास कुठे मिळेल याचा विचार करू लागलो. मलंग गड ,नेवाळी परिसर यासाठी योग्य वाटला. जवळ ही आणि रस्ता ही चांगला, रहदारी कमी. वाड्याला मित्राच्या शेतावर व रानात जायचे होते, सृष्टीला लागलेल्या पाचव्या महिन्यातले सोंदर्य न्याहाळायला. रानभाज्या बघायला, त्या कशा बनवतात हे माहित करून घ्यायला.

शामभट्टाची "युरोप" वारी .. इटली, स्वीस, फ्रान्स लेखांक ९

लेखक चौकटराजा यांनी बुधवार, 09/08/2017 10:15 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस ९ - आमचा होस्ट एरिक याने सुचविल्याप्रमाणे माउंट रिगी ला जायचे असे नक्की केले होते त्याप्रमाणे सकाळी लवकर उठणे झाले. पण आज आम्ही आमची रूम सोडणार होतो. कारण बुकिंग एकाच रात्रीचे होते. मग काटजाला विचारले आम्ही रूम सोडून तुमचे इथे आमच्या दोन बॅगा ठेवल्या तर चालतील का? तिने लगेचच होकार भरला व आमची परत येण्याची वेळ नक्की करून घेतली. आम्हाला दुपारी साडेतीन च्या दरम्यान आमच्या पुढच्या मुक्कामासाठी लूझर्न वरून इसेल्टवाल्ड या अतिरम्य ठिकाणी जायचे होते. काटजाकडे बॅगा सोडून बस गाठली व दहा मिनिटात लूझर्न रेल्वे स्टेशन समोरील बोटीच्या धक्यावर जाउन पोहोचलो. बोट आलेली नव्हती.

१० वी नंतर विज्ञानातले पांरपारिक शिक्षण न घेता १२वीच्या स्तराचे NIOS मधुन Sr. Secondary परिक्षा देणे कितपत व्यवहार्य आहे?

लेखक कोदंडधारी_राम यांनी बुधवार, 09/08/2017 09:19 या दिवशी प्रकाशित केले.
पार्श्वभूमी - माझा मोठा मुलगा या वर्षी इ. १० वी ची परिक्षा उत्तीर्ण झाला आहे त्याला ६२ टक्के गुण प्राप्त झाले आहेत. त्याच्या बरोबर सर्व क्षेत्रातील पुढील संधी जसे विज्ञान, वाणिज्य व कला इत्यादी क्षेत्रातील पर्याय चर्चा करुन झालेले आहेत. त्याच्या मतानुसार त्याला विज्ञान क्षेत्रात शिक्षण घ्यायचे असल्याने पुण्याच्या ११ वी च्या केंद्रीय प्रवेश प्रक्रियेत नांव नोंदवून चारही पेऱ्यांमधुन अपेक्षित असे चांगले कनिष्ठ महाविद्यालय उपलब्ध झाले नाही.

अतींद्रिय आणि भुताटकीचे अनुभव : ठेवलेली बाई

लेखक सत्या सुर्वे यांनी बुधवार, 09/08/2017 04:34 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यप्रदेश मधील घटना आहे. एका बहुराष्ट्रीय कंपनी साठी सरकारने जमीन अधिग्रहण प्रक्रिया सुरु केली आणि नेहमी प्रमाणे शेतकरी, बिल्डर, राजकारणी ह्यांचा गोंधळ सुरु झाला. अश्यांत एका आमदाराच्या फार जवळच्या माणसाचा खून झाला. प्रकरण CBI कडे गेले आणि मी जुनिअर ऑफिसर म्हणून मध्यप्रदेशला गेले. महिला ऑफिसर म्हणून मला जास्त बाहेर जाऊन काम करावे लागत नसे. बहुतेक वेळी महिलाचे स्टेटमेंट घेणे, पोलिसांच्या सोबत बसून त्यांच्याकडून माहिती घेणे आणि रिपोर्ट्स लिहिणे असाच माझा दिनक्रम असायचा. केस इतकी किचकट होती कि जवळ जवळ ५०० लोकांचे स्टेटमेंट घेणे जरुरीचे होते. (नो किडींग).

#कटींग_पाटली_व_हिप्पीकट

लेखक sudhirvdeshmukh यांनी मंगळवार, 08/08/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
#कटींग_पाटली_व_हिप्पीकट लहापणी न्हावी काकाकडे गेलो की काका खुर्चीवर पाटली टाकायचे पाटलीवर बसने मला फार कमीपणाचे वाटायचे, आपण उगीच लहान असल्याची जाणीव होत असे. एकदा ती कसरत काकाची सुरु झाली की बस, मधे मधे मान आपण सरळ करायची तर काका दुसऱ्या बाजूला एकदम दाबायाचे. समजा त्याच बाजूला ठेवावी तर परत दुसऱ्या बाजूला दाबल्या जायची. नेमके कुठल्या बाजूला डोके ठेवावे हा प्रश्न मनात यायचा अवकाश की समोर एकदम झटक्यान डोकेे दाबल्या जाई व मागच्या बाजूच्या केसावर आक्रमण होई. बऱ्याचवेळा डोक्याला वाटेल तसे झटके देवून झाले की मग कैचीचे काम संपे, मग कैचिची जागा वस्तारा घेत असे.

आठवणीतला श्रावण

लेखक sudhirvdeshmukh यांनी मंगळवार, 08/08/2017 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण सुरु झाला कि एक नवीन चैतन्य सृष्टीत निर्माण होते. आषाढ एकादशी साठी आपल्या विठुरायाच्या दर्शनाला गेलेला शेतकरी परतलेला असतो. शेतात पेरणी झालेली असते. सृजनासाठी धर्तीच्या कुशीत बियाणे शांत झोपी गेलेले असते. आषाढ मेघ आपल्या सरींच्या द्वारे जमिनीवर भेटीसाठी उतरतात. धरती तशीच ग्रीष्माच्या तापाने तापलेलेली असते. ती या मिलनाची मोठ्या आतुरतेने वाट पाहत असते. धर्तीच्या व वर्षा धारेच्या या मिलनातून, धरतीच्या पोटात पडून असलेले बियाणं अंकुरते, जमिनीच्या एक एक आवरणाला विभागत हलकेच बाहेर डोकावू लागते. त्या कोवळ्या अंकुराला रवी किरणाने स्वतः;ला न्हाऊ घालायचे असते.