Skip to main content

कृष्णाच्या गोष्टी-४

लेखक Bhakti यांनी बुधवार, 26/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
*रासलीला अ कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.

पुस्तक परिचय: ययाति

लेखक श्रीगणेशा यांनी बुधवार, 26/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
---- ययाति ---- वि. स. खांडेकर -- ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेले, मराठीतील पहिले साहित्यिक. ययाति -- वि. स. खांडेकरांनी १९५९ मधे लिहिलेली, पौराणिक संदर्भ आणि सामाजिक आशय असलेली कथा. या कादंबरीसाठी १९७४ साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. ---- अगदी ओघवतं, प्रवाही लिखाण. साधे शब्द, पण तरीही कथेतून सामाजिक आशय अगदी प्रखरपणे मांडलेला. कथेच्या शेवटी मन विषण्ण, व्यथित होतं. कथा संपते, पण वाचकाला स्वतःशी संवाद करायला भाग पाडूनच. एवढं प्रभावी लिखाण दुर्मिळच. प्रत्येक व्यक्तिरेखा अगदी भिन्न स्वभाव, आणि विचारांनी साकारलेली.

तुमची निष्ठा कुठे ?

लेखक प्रसाद गोडबोले यांनी मंगळवार, 25/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
आज संसदेत काही नवनिर्वाचित सदस्यांनी खासदारकीची शपथ घेतली. त्यात निदर्शनास आलेली काही वाक्ये :
ओवेसी - जय भिम. जय मीम. जय तेलंगाना . जय फलस्तीन . अल्लाहु अकबर.
राहुल गांधी - जय हिंद. जय संविधान
छत्रपालसिंग गंगवार - जय हिंदुराष्ट्र. जय भारत.
(हे म्हणल्यावर लगेच विरोधी पक्षाच्या बाजुने - "ये संविधान विरोधी है" अशा अर्थाच्या घोषणा ऐकु आल्या. मात्र पॅलेस्टाईनच्या जयजयकारानंतर विरोधी पक्ष पैकी "ये संविधान विरोधी है" असे कोणी म्हणल्याचा व्हिडीओ दिसला नाही. )
निलेश लंके - जय हिंद. जय महाराष्ट्र.

" क्रॉसिंग द फ्लोर "

लेखक चौकस२१२ यांनी मंगळवार, 25/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
फातिमा फातिमा वेस्टमिस्टर पद्धतीमध्ये स्वतःच्या पक्षाच्या धोरणांविरुद्ध संसदेत मतदान करणे याला " क्रॉसिंग द फ्लोर " (शब्दशः अर्थ घ्यावा ) म्हणले जाते सध्या इस्राएल कि पॅलेस्टाईन यावर पाश्चिमात्य देशातील मुस्लिम धर्माच्या आमदारांचे वागणे हा एक अभ्यासाचा विषय आहे अर्थात "धर्म आधी देश नंतर " हे धोरण हि मंडळी राबवतात हे सरळ सरळ दिसून येते ( अर्थात डावखुरे या कडे दुर्लक्ष करतीलच ) विशेषतः हि मंडळी डाव्या मजूर पक्षातून निवडून येतात , त्यामुले त्या पक्षात हि मंडळी म्हणजे "अवघड जागी दुखणें किंवा "धरलं तर चावत , सोडला तर पळत " असा काहीसा प्रकार , गठ्ठा मते मिळवण्यासाढी हे पाहिजेत पण

भिंत तुझी माझी...

लेखक kool.amol यांनी मंगळवार, 25/06/2024 या दिवशी प्रकाशित केले.
मी खऱ्याखुऱ्या भिंतिविषयी बोलतो आहे. आभासी नव्हे. भिंत हा एक भारी प्रकार आहे. भिंतीविषयी उगाच एक नकारात्मक भावना जोडलेली आहे. भिंतीवर कितीतरी सुंदर गोष्टी सुद्धा असतात. म्हणजे छानशा पेंटिंग्ज, देवाचा फोटो, एकत्र कुटुंबाचा फोटो, वगैरे. ह्या भिंतीविषयी सुचण्याचे कारण म्हणजे, आज बाजारात फिरत असताना रस्त्यावर पोस्टर विकणारी एक बाई दिसली. कधी काळी मला हे पोस्टर्स फार आवडायचे. माझ्या रूम मध्ये वाकुल्या दाखवणाऱ्या tom च एक पोस्टर होतं. त्यानंतर एका रूम मध्ये आधी राहणाऱ्या एका मुलाने काही अप्रतिम म्हणावेत असे ऐश्वर्या रॉयचे फोटो लावले होते. काही महाभाग फारच शौकीन असायचे.