Skip to main content

'अक्षर मैफल'ची भूमिका

लेखक रणभोर यांनी मंगळवार, 29/08/2017 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवारी रात्री कोणत्या तरी मित्राच्या घरी किंवा रूमवर सगळे जमतात. आपल्याला आवडतं ते खायला प्यायला घेऊन येतात. आणि गप्पा मारत बसतात. हा अनुभव बहुतेक सर्वांना असेल. अशा मैफलींना वयाचं बंधन नसतं. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अशा मैफलींना विषयाचं बंधन नसतं. मला तर असा अनुभव आहे कि एरवी उघडपणे बोलता येणार नाहीत असे सर्व गंभीर विषय सुद्धा तिथे सहज मोकळे होतात. रात्रभर गप्पा सुरु राहतात. मित्र दर्दी असतील तर कदाचित मागे बेगम अख्तर किंवा नुसरत फतेह अली (आपापल्या आवडीनुसार) सुरु असतो. एका प्रसन्न वातावरणात, हसत खेळत यच्चयावत विषय बोलले जातात. आम्ही सुरु करतोय अशीच एक मैफल.

श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ४ : एका अनोळखी जगातला प्रवास.

लेखक अनिवासि यांनी मंगळवार, 29/08/2017 10:31 या दिवशी प्रकाशित केले.
एका अनोळखी जगातला प्रवास. अनिवासि लेखमालेसाठी काय लिहावे ह्याचा विचार करत असताना इतके प्रसंग डोळ्यापुढे आले की निवड करणे कठीण झाले. तेव्हा जेथून माझ्या आयुष्यातल्या एका नव्या पर्वाला सुरुवात झाली आणि ज्याचे सूतोवाच मी एका प्रतिसादातून केले होते, तेथेच जातो. १९-२०व्या वर्षापर्यंत माझे आयुष्य पुण्यातल्या एका मध्यमवर्गीय कुटुंबात गेले. ५० साली शालान्त परीक्षा पास झालो, रीतसर कॉलेजला प्रवेश घेतला आणि त्या वेळच्या इंटरपर्यंत वाटचाल केली. सर्व काही आलबेल होते आणि ---- एकाएकी घरात आर्थिक आपत्ती आली. (तो निराळा विषय). कॉलेजची फी थकली, परीक्षेसाठी फॉर्म भरायलासुद्धा पैसे नव्हते.

बाप्पाचा नैवेद्यः बटाट्याचे कानवले

लेखक इशा१२३ यांनी मंगळवार, 29/08/2017 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी!गणेशोत्सवाच्या सगळ्यांना शुभेच्छा! गणपतीचे घरोघर आगमन झालेच असेल. दरवर्षी दहा दिवस येणारा बाप्पा यावर्षी दोन दिवस जास्तच मुक्कामाला आहे तर रोज नविन काय नैवेद्य करायचा हा गहन प्रश्न असतोच.

मला भेटलेले रुग्ण - ८

लेखक डॉ श्रीहास यांनी मंगळवार, 29/08/2017 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/40626 डॉक्टर परवा पासून खूपच त्रास वाढलाय हो खोकल्याचा , मधले ३ महिने ईतका कमी झाला होता की आता त्रासच संपला वाटत होतं.... जरा त्राग्यानेच बोलत होती पेशंट... मी फाईल बघत बघत ऐकून घेतलं आणि बोललो की तुम्हाला फक्त खोकल्याचा त्रास नाही होत आहे , अजून काय अडचण आहे ते सांगा ... कारण नेहेमी नवऱ्यासोबत येणारी पेशंट आज वडिलांसोबत आली होतीं... BP मोजलं.... पेशंट calm down होतात ... डाॅक्टरनी जर पेशंटला स्पर्शच नाही केला तर ,समजूनच घेता येत नाही ....

तू

लेखक अमित रेडीज यांनी मंगळवार, 29/08/2017 01:54 या दिवशी प्रकाशित केले.
नाही काढलीस तू कधी माझी आठवण तरी तुला विसरता आलं नाही मैत्रीचे धागे बांधले माझे मीच तरी तोडावेसे कधी मनात आलं नाही भेटून खूप बोलायचय तुझ्याशी पण ते अंतर कधी कापताच आलं नाही दूर असलीस तरी तुझं असणच खास आहे पण शब्दात व्यक्त करून कधी सांगताच आलं नाही

सरकारी नियमन आणि बाहुबली

लेखक साहना यांनी मंगळवार, 29/08/2017 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
कुठल्याही निर्याणाचे प्रथम अनुक्रम परिणाम (फर्स्ट ऑर्डर कॉन्सिक्वेन्सेस) बहुतेक लोक ओळखू शकतात पण द्वितीय आणि तृतिय अनुक्रम परिणाम मात्र अनुभवी आणि जाणकार लोकच ओळखू शकतात. खुप वेळा बैल पळून गेल्यानंतर सुद्धा नक्की कारण बहुतेक लोकांना समजत नाही. खूप वर्षां आधी देशांत चित्रपट (गृह) हे सर्वांत लोकप्रिय मनोरंजनाचे साधन होते. लक्षावधी लोक चित्रपटगृहांत जाऊन चित्रपट पाहत. सरकारने ह्या मतपेढीला ओळखले आणि मते मिळवण्यासाठी चित्रपटाच्या तिकिटावर किंमत निर्धारीत करायचे ठरवले. बहुतेक लोकांनी आनंदाने सरकारी निर्णयाचे स्वागत केले.

अँड्रॉपॉज.... एक दुर्लक्षित विषय!

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 28/08/2017 23:47 या दिवशी प्रकाशित केले.
अलीकडच्या काळात किमान शहरांमध्ये मेनोपॉज बद्दल हळूहळू चर्चेला सुरवात झाली आहे. स्त्रियांच्यात साधारण चाळीशी नंतर होणारे बदल; त्यांचे ऋतुचक्र बदलणे आणि त्यामुळे त्यांच्यात होणारे शारीरिक आणि मानसिक बदल याची अलीकडे काही प्रमाणात दखल घेतली जात आहे; आणि हे चित्र समाधानकारक आहे यात प्रश्नच नाही.   पण ज्याप्रमाणे मेनोपॉजबद्दल मोकळेपणी बोलले जाते त्याचप्रमाणे अँड्रॉपॉज देखील थोडी चर्चा झाली पाहिजे. कारण स्त्रियांप्रमाणेच पुरुषदेखील या विशिष्ट शारीरिक आणि मानसिक संक्रमणातून जात असतात. अँड्रॉपॉजचे कारण पुरुषांमधील hormone testosterone कमी होणे हे असते.

अशक्य (कथा) (काल्पनीक) -- भाग १

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 28/08/2017 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
अशक्य (कथा) (काल्पनीक) - भाग १ तपंजय शिक्षण संस्थेची इमारत नेहमी प्रमाणेच गजबजलेली होती . इमारतीसमोरच्या पटांगणात मधल्या सुट्टीमधे विद्यार्थ्यांचा खेळ , दंगा चालु होता . या सगळ्या धामधुमीतही संस्थेचे प्राचार्य , प्राध्यापक नीलकंठ हे आपल्या ऑफीसमधे बसुन कुठल्यातरी महत्वाच्या विषयावरील लेख लक्षपुर्वक वाचत होते . "सर , आत येउ का ? " या प्रश्नाने प्रा. नीलकंठ यांची समाधी भंग झाली . त्यांनी समोर पाहिले . एक शिक्षक ऑफीसच्या दारापाशी उभे राहुन विचारत होते . त्यांनी आपल्या बरोबर एका विद्यार्थ्याला जवळ जवळ जबरदस्तीने हाताला पकडुन आणले होते . त्या मुलाचा हात काळानीळा पडला होता .

हंपी - मदत हवी आहे

लेखक केडी यांनी सोमवार, 28/08/2017 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, यंदा दिवाळीच्या सुट्टीत हंपी चा फॅमिली ट्रिप चा प्लॅन आहे. अर्थातच, फॅमिली मध्ये आमचा श्वान दुशन्त उर्फ बोल्ट ला देखील न्यायचे आहे. जाणार:- पुणे-हंपी-पुणे दिवस :- ४.५ (हा अर्धा दिवस का ते पुढे येईलच) फॅमिली:- २ मोठे, २ लहान (वय वर्ष ५ आणि १३) + एक श्वान जाणार कसे:- स्वतःच्या ४ चाकीने थोडक्यात रूपरेषा १. सुट्ट्या कमी असल्यामुळे हापिसातून जरा लवकर निघून कोल्हापूर/किंवा थोडं पुढे एक ब्रेक घायचा प्लॅन आहे (हाच तो ०.५ दिवस). २. दुसऱ्या दिवशी सकाळी निघून थेट हंपी गाठायचा प्लॅन आहे. ३.