श्रीगणेश लेखमाला : लेख क्रमांक ५ : माझी मी जन्मले फिरुनी
माझी मी जन्मले फिरुनी
१९९३चा मे महिना होता. जळगावचं रणरणतं ऊन मी म्हणत होतं. त्यात माझ्या चुलतबहिणीचं लग्न असल्याने आणि साडी नेसण्याची हौस असल्याने मी सकाळपासूनच झकास तयार होऊन मिरवत होते. मार्चमध्ये बारावीची परीक्षा दिली होती. त्यामुळे आता सिनिअर कॉलेजला जाणार, म्हणजे मोठी झाले आहे... असा माझा एकूण आविर्भाव होता. मे महिन्याची एकोणतीस तारीख होती, पण अजून बारावीचा निकाल लागला नव्हता. आदल्या वर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात निकाल जाहीर झाला होता, त्यामुळे मनातून खूप धाकधूक होती. सकाळपासून दोनदा जवळच्या S.T.D. बूथवर जाऊन मी मुंबईच्या मैत्रिणीला फोन करून निकाल कधी लागणार आहे ते विचारलं होतं.
मिसळपाव