गंदीकोटा आणि बेलम गुहा - २ (अंतिम भाग)
दिवस ३
आजचा दिवस तसा आरामाचा होता. बेलम गुहा पाहणे आणि घरची गाडी पकडणे ही दोनच कामे आज करायची होती. उठलो आणि सुर्योदय पहाण्यासाठी धावतपळत घळीकडे निघालो. पण सुर्योदय आमच्या नशिबात नव्हता. ढगांमुळे सुर्यमहाराजांचे दर्शन झाले ते चार बोटे वर आल्यावरच. एका जोडप्यानं रात्र इथेच दगडांवर काढलेली दिसत होती. कल्पना छान होती.
मिसळपाव