Skip to main content

नरभक्षकाच्या मागावर ! - भाग ३

लेखक रश्मिन यांनी शनिवार, 25/04/2020 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ ----------------------------------------------------------------------------------- vaagh हळूहळू सर्व कॉल्स विरत गेले. ह्याचा अर्थ अलार्म कॉल्स देणाऱ्या प्राण्यांच्या परिसरातून निघून ती वाघीण आता जवळपास पोहोचली होती.

कमीत कमी साहित्यात होणाऱ्या पाककृती

लेखक Prajakta२१ यांनी शनिवार, 25/04/2020 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
कमीत कमी साहित्यात होणाऱ्या पाककृती Lockdown रेसिपीज-मुगाच्या डाळीची खिचडी साहित्य- १. मुगाची डाळ २. तांदूळ (मी दोन्ही एकास एक असे घेतले होते ) ३. तूप ४. जिरे ५. .हळद ६.तिखट ७. गोडा मसाला ८. कसुरी मेथी (ह्याने थोडा कडवटपणा येतो चालत असल्यास घालणे किंवा मग नंतर साखर जास्त घालणे ) कृती- १.एका पातेल्यात मंद आचेवर तूप गरम करून त्यात आधी जिरे घालायचे २. जिरे तडतडले कि त्यात हळद घालायची. ३.हळद घातल्यावर लगेच तिखट आणि धने पावडर घालायची. ४. थोडी कसुरी मेथी घालायची (चवीनुसार ) ५. मग धुतलेले डाळ तांदूळ घालायचे. ६.

तोरणा ते राजगड

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी शनिवार, 25/04/2020 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
तोरणा ते राजगड (दि.१४-१२-१९ ते १५-१२-१९) फोटोसहित लेख वाचण्यासाठी या लिंकवर जा - https://www.blogger.com/blogger.g?blogID=6920222328094762649#editor/tar… शिवाजी महाराजांनी स्वराज्याच्या सुरुवातीला घेतला तो तोरणा किल्ला.

रतनगड ते हरिश्चंद्रगड

लेखक नमिता श्रीकांत दामले यांनी शनिवार, 25/04/2020 16:57 या दिवशी प्रकाशित केले.
रतनगड ते हरिश्चंद्रगड (१/११/२०१९ ते २/११/२०१९) फोटोसहित लेख या लिंकवर बघा - https://www.blogger.com/blogger.g?blogID=6920222328094762649#editor/tar… ठाण्याच्या फलाट क्र.५ वर मी आणि केतकी ११.३४ ची कसारा गाडी पकडायला उभ्या होतो. मन मात्र सामरदला जाऊन पोहोचले होते. सामरदहून पहाटे उठून सांधण दऱ्याला जाताना बघितलेल्या डोंगररांगा खुणावत होत्या.

" भातभाजी भोपळी "

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 25/04/2020 16:31 या दिवशी प्रकाशित केले.
" भातभाजी भोपळी " साहित्य: मक्याचे दाणे, मटार , तांबड्या ढोबळी मिरची चे काप , कांदा, लसूण, हळद , धने जिरे पूड , सुकी तांबडी मिरची , तमाल[पत्र, थोडी हळद , पांढरे व्हिनेगर , ( पाहिजे असल्यास चीज..) - तेलावर कांदा परतून त्यात लसूण , सुकी मिरची, तमाल[पत्र , धने जिरे पूड आणि हळद घालावी - कांदा शिजल्यावर मक्यचे दाणे वगैरे घालून चांगले परतावे ( मंद आचेवर) शेवटी शेवटी थोडे व्हिनेगर किंवा लिंबाचाच रस आणि मीठ , चिमूट भर साखर घालावी हे मिश्रण कोमट होऊ द्यावे - वरील भाजीतील तांबड्या मिर्चांचे तुकडे काढून , ते तेलात बुडवावे आणि त्या तेलात कोरडी लसूण घालावी - तेलावर आधी केलेला भात थोडा परतून त्यात

लॉकडाऊन : बत्तीसावा दिवस

लेखक टर्मीनेटर यांनी शनिवार, 25/04/2020 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
p { text-align:justify; font-size:17px;} h6 { text-align:center; font-size:17px; } अनेक घटना/गोष्टी आपल्या जीवनात पहिल्यांदाच घडत असतात किंवा कराव्या लागत असतात. त्यातून मिळणारे अनुभवही वेगवेगळ्या प्रकारचे असतात. कधी सुखाची, आनंदाची अनुभूति मिळते तर कधी दुःख, मन:स्ताप पदरी पडतो. नवीन वर्ष सुरू झाल्यापासून आयुष्यात पहिल्यांदाच घडलेल्या काही घटना, कराव्या लागलेल्या/करायला जमलेल्या गोष्टींसाठी २०२० साल आत्तापर्यंत तरी माझ्यासाठी वैशिष्ट्यपूर्ण ठरले आहे.

ज्यात त्यात बटाटा

लेखक चौकस२१२ यांनी शनिवार, 25/04/2020 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
"ज्यात त्यात बटाटा घालतात इथे .. " उत्तर प्रदेशात एकदा जवळ जवळ महिना घालवल्यावर अशी वैतागवाडी झाली होती... हम्बल spaD ( गरीब बिचारा बटाटा ) असे ज्याचे वर्णन केलं जाते तो हा पामर ... यात अनेक जाती असतात ..रंग /चव आणिआकार वेगवेगळे.. मराठी पद्धतीची पातळ खरपूस काचऱ्याची भाजी असो , "गर्भश्रीमंत " दम आलू असो किंवा जर्मन पोटॅटो रोस्टी असो... जगभर फिरणारा हा प्राणी... यातील एका चविष्ट बटाट्याची ओळख.. किपेंफ्लर ( kipfler उच्चार आपापल्या सोयीप्रमाणे करणे ) हि त्यातील एक चविष्ट जात.. लांबुडक्या आकाराचा हा बटाटा ..

मंथरा

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 24/04/2020 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
मंथरा! हे नाव कोणाहीसाठी नवीन नाही. पण तरीही 'रामाला वनवास आणि भारताला अयोध्येचे राज्य मागून घे;' असे कैकयीला सांगणारी मंथरा. इतकेच आपल्याला माहीत आहे. आज याच मंथरेच्या आयुष्याची कथा मी घेऊन आले आहे. "अर्थात ही संपूर्ण कथा काल्पनिक आहे." मंथरा "काय सांगू मंथरे, चाकाची कुणी निघाली होती. रथ पुढे काढणे अशक्य होते. चारही बाजूंनी दानवांनी घेरले होते आमच्या रथाला. महाराज त्यांच्या अमोघ शरसंधानाने समोरील दानवांना दूर ठेवत होते. परंतु रथ त्या व्यूहातून बाहेर निघणे अत्यंत आवश्यक होते.

जगज्जेता [भावानुवाद - शतशब्दकथा]

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 24/04/2020 23:04 या दिवशी प्रकाशित केले.
सेकंदाला हजारो मैल इतक्या झंझावाती वेगाने ब्रह्मांडातून भरारी मारताना कॅप्टन विजयच्या मनात त्याने मिळवलेल्या दैदिप्यमान विजयांच्या सुखद स्मृती क्षणभर डोकावून गेल्या. लढाईच्या सहाव्या टप्प्यात दुष्मनाला लालूच दाखवत विस्तीर्ण पर्वतरांगांच्या कड्याकपारींमधे अडकवून त्यांच्यावर तोफगोळ्यांचा जोरदार भडिमार करताना दाखवलेली अफलातून कल्पकता! त्या दिवशी त्याला एका पाठोपाठ एक अशी तीन शौर्यपदके मिळालेली होती.