Skip to main content

बाप

लेखक Govind यांनी सोमवार, 24/08/2020 22:38 या दिवशी प्रकाशित केले.
  सकाळची वेळ. सगळीकडे एकप्रकारचं चैतन्य संचारलेलं. सूर्याची कोवळी किरणं सगळीकडे पसरलेली. सार्वजनिक नळावर बायकांची पाणी भरण्यासाठी लगबग चाललेली. घरोघर दारात सडे टाकून त्यावर सुंदर रांगोळ्या काढण्यात गुंतलेल्या मुलीबाळी. कुणी शेतकरी आपली गुरे घेऊन शेताकडे निघालेला. पाणी भरता भरता बायकांचा आवाज वाढायला लागला. वाढत्या उन्हाबरोबर पाणी भरण्याची घाई वाढू लागली आणि त्यासोबतच भांडणांनाही सुरूवात झाली. रस्त्याच्या कडेलाच असणार्‍या झोपडीसमोर फाटक पोतं अंथरूण बसलेलं सुधाकरचं म्हातारं आपले मिचमिचे डोळे उघडायचा प्रयत्न करत होतं पण ऊन्हामुळं डोळ्यांसमोर अंधारी येत होती.

दक्षिण भारतीय मंदिरे

लेखक उपयोजक यांनी सोमवार, 24/08/2020 22:13 या दिवशी प्रकाशित केले.
दक्षिण भारतीयांच्या एका समुहावर एका लेखासाठी थोडी मदत हवी आहे. _/\_ बृहन्मुंबई/ठाणे शहर/पनवेल शहर या ठिकाणी दक्षिण भारतीयांमार्फत(तमिऴ/तेलुगू/कन्नड/केरळी)लोकांकडून चालवली जाणारी हिंदू मंदिरे/धार्मिक संस्था कोणत्या?

पाचूंडी!

लेखक चिनार यांनी सोमवार, 24/08/2020 19:37 या दिवशी प्रकाशित केले.
पाचूंडी ! पाचवी-सहावीत असताना शाळेत एक प्रवचनकार/कीर्तनकार आले होते. त्यांनी सांगितलेली ही गोष्ट.. एका युद्धमोहिमेनंतर छत्रपती शिवाजी महाराज आपल्या सैन्यासह रायगडावर परतत होते. जवळजवळ ऐंशी हजार मावळे महाराजांसोबत होते. मजल दरमजल करत येताना, कुतुबशाहाच्या सीमेवर महाराज पोहोचले. तिथंच त्यांनी तळ ठोकला. कुतुबशहाला बातमी मिळाली. राजे सीमेवर आलेत म्हणून तो आनंदित झाला. इकडे राजे,कुतुबशाहाकडून भेटीचं आमंत्रण येईल ह्याची वाट बघत होते. कुतुबशाहाला राजे स्वतःहुन भेटायला येतील असं वाटत होतं. दोन-तीन दिवस झाले काहीच घडलं नाही. थोड्याश्या नाराजीनेच महाराजांनी तळ हलवायचा निर्णय घेतला. लगबग सुरु झाली.

एका खेळियाने - स्वयमेव मृगेंद्रता |

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 24/08/2020 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
ये दौडेगा तो पुजारा को उसीके लिय रखा है, ताली बजानेके लिये नहीं है पहली बॉल तेज डालना - ये आगेसे खेलेगा जड्डू जाग के जरा... उसका पैर जैसे हिल रहा है.. उसके हिसाबसे अँटिसिपेट कर इशांत - अगर चौका गया तो मेरा रिस्क है... तू बिंदास डाल एक बार बोला है बार बार नहीं बोलूंगा - पैर पे खिलाना है तो पैर पे खिलाना है भारतीय क्रिकेटनी अशी वाक्यं कधी ऐकली नव्हती. यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः म्हणतात खरे. पण आमच्याकडे रणजींपासून ते विराट कोहलीपर्यंत कितीतरी अतिरथी महारथी अर्जुन होऊन गेले तरी भारतीय क्रिकेटला असा "सारथी" कधी मिळाला नव्हता!

जग जेव्हा ग्रँटेड घ्यायला लागते...

लेखक पंचमहाभूते आणि थोडं यांनी सोमवार, 24/08/2020 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
जग जेव्हा ग्रँटेड घ्यायला लागते... सूर्य ही थकतो कधी कधी... ज्या तेजाने पृथ्वी जगवतो... स्वतःही काजळतो कधी कधी... तेव्हा जे हात समोर येतात... सूर्याला लागलेलं ग्रहण ओढून... पुन्हा एकदा सूर्य धरतीच्या दारावर... तोरण म्हणून बांधायला... ते खरे दिन'कर'...

राजमाचीच्या आठवणी-माझ्याही

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 24/08/2020 13:06 या दिवशी प्रकाशित केले.

खूप वर्ष झाली असतील, राजमाचीचा पहिला ट्रेक कधी केला ते आता नेमकं आठवत नाही. किंबहुना पहिल्यांदाच राजमाचीच्या त्या नितांतसुंदर वाटेवर जाऊनही तेव्हा माचीला न जाता सरळ पुढे गेलो होतो ते म्हणजे ढाकच्या बहिरीला.

वसूली

लेखक Govind यांनी सोमवार, 24/08/2020 12:32 या दिवशी प्रकाशित केले.
निवरादादा आता खूपच थकला आहे पण आजदेखील तो शिलाई मशिनवर बसून कपडे शिवत असतो. तीनही मुलींची लग्नं झाली आणि त्यांना मुलंबाळंदेखील झाली. आता कसली म्हणून चिंता उरली नाही. एक दीड एकर जमिनीचा तुकडा आहे तिथं त्याची बायको शेतीची कामं करते आणि निवृत्ती उर्फ निवरादादा आपला अपंग पाय घेऊन लोकांचे कपडे शिवत बसतो. मला बघताच त्यानं हाक मारली आणि मी त्याच्याकडं गेलो. गावातील बर्‍याच लोकांच्या आतल्या गोष्टी याला ठाऊक. त्याच्यासोबत गप्पा मारत बसणं हा एक विलक्षण विरंगुळा असे. खूप सार्‍या गोष्टी त्याच्याकडून कानावर येत. त्याच्या जवानीतल्या कित्येक गोष्टी मी त्याच्याकडून ऐकल्या आहेत.

लघु गुरु कसे ओळखावेत - सूक्ष्मभेद आणि बारकावे

लेखक धष्टपुष्ट यांनी सोमवार, 24/08/2020 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
कळीचा नियम: ज्या अक्षराला उच्चार करण्यासाठी कमी वेळ लागतो ते लघु, आणि जास्त वेळ लागणारं अक्षर गुरु. . पण अनेक वेळेला नियम खूप संक्षिप्त असेल तर तो पुरत नाही. पुढे आलेले उपनियम या एकाच नियमाहून ओघाने आलेले आहेत. त्यातले सूक्ष्मभेद आणि बारकावे थोड्या विस्तारानं पुढे देतोय. . १) आपण शुद्धलेखनात जे ऱ्हस्व किंवा दीर्घ लिहितो ते ढोबळमानानं लघु किंवा गुरु असतात. मुले आणि भिणे या शब्दांची पहिली अक्षरे ऱ्हस्व आली आहेत म्हणून ती लघु. मूल आणि भीत-भीत या शब्दांची पहिली अक्षरे दीर्घ आहेत म्हणून ती गुरु.
Taxonomy upgrade extras

इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 24/08/2020 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
(महाराष्ट्रीय राज्य पाठ्यपुस्तक अनावलोकन व टिप्पणी असंशोधित खाजगी मंडळ, पुणे-१२) इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट (प्रस्तावना : कोरोना आजारापश्चात एखाद्या इयत्तेतील अभ्यासक्रमात एखादा पाठ कसा असू शकेल, हे लेखकाच्या मनात आल्याने 'इयत्ता ८. पाठ ६. कोरोना आजार : जगावरचे संकट' हा पाठ लिहिला आहे. ) जगात सर्वप्रथम कोरोना अर्थात कोविड-१९ या आजाराचा उद्रेक चीन देशातील वुहान या शहरात डिसेंबर २०२०च्या दरम्यान झाला होता. या शहरातून इतरत्र तसेच इतर देशात गेलेल्या व्यक्तींमार्फत हा आजार इतर देशांत पसरला. साधारण जानेवारी २०२०च्या शेवटी कोरोना या आजाराची लागण असलेले रुग्ण भारतात सापडले.

काठियावाडी मिरच्या

लेखक Bhakti यांनी सोमवार, 24/08/2020 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
मिपाकर तुम्हाला वाटत असेल गणपतीमध्ये गोडधोड सोडून हे काय तिखट मिरची?खूप खूप मोदक करून,खाऊन झाले. तेव्हा अशाच लोळत पडलेल्या दोन पोपटी लांब लांब मिर्च्यांकडे लक्ष गेले.आल्या तेव्हा चांगल्या तरतरीत होत्या,आता पार आळसावल्या होत्या.चिडून कि काय लाल व्ह्यायला लागल्या होत्या.विचार करीत असतील आम्हाला ही घेते की म्हाताऱ्या झाल्यावर फेकते. तेव्हा डोक्यात आलं,ते काठीयावाडी पद्धतीने बेसन पिठ पेरून खूप दिवसांपासून मिरच्या करायच्या होत्या.तेव्हा आजचा मुहूर्त चांगला आहे.तसही यापूर्वी नोकरी सांभाळून २० मिनिटांत स्वयंपाक करण्याची कला मी आत्मसात केली होती.ती मोडली ,पण हे यु ट्यूब वर पाककृती पाहून करण्यात एक श