Skip to main content

सांग दर्पणा

लेखक ज्येष्ठागौरी यांनी मंगळवार, 01/09/2020 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
सांग दर्पणा... एका अगदी प्रिय दुकानात चक्कर मारताना अतीव सुंदर आरसा दिसला,एकदम स्वच्छ चकचकीत आणि सागवानी लाकडाची सुंदर किनार.मन थबकलं तिथंच,मनात विचार करूनही त्या क्षणी घरात योग्य जागा सापडेना त्याच्यासाठी. मग पुन्हा येण्याचा निश्चय करून वळले. शास्त्रात शिकवलंय की आरसा ही एक प्रकाश परावर्तित करणारी चमकदार वस्तू असते.

श्रीगणेश लेखमाला २०२० - आठवणी मिपाकर्सच्या

लेखक प्रशांत यांनी मंगळवार, 01/09/2020 07:11 या दिवशी प्रकाशित केले.
1 नमस्कार मिपाकर. सर्वप्रथम मिपाच्या १४व्या वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा. या वेळी श्रीगणेश लेखमालेचा विषय 'आठवणी' असा असल्यामुळे काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करू या, असा विचार करतच होतो, तेवढ्यात सुचले की मिसळपावच्याच खूप साऱ्या आठवणी आहेत, त्याबद्दल काहीतरी लिहून काढू... फोरम मिसळपाव.कॉमची ओळख - चौदा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे.

श्रीगणेश लेखमाला २०२० - पेशंट एच एम

लेखक आनंदिनी यांनी मंगळवार, 01/09/2020 07:00 या दिवशी प्रकाशित केले.
1 पेशंट एच एम जाताजाता सहज कानावर पडलेली गाण्याची एखादी ओळ कधीकधी वर्षानुवर्षांपूर्वीची आठवण घेऊन येते. कधी विचार केलाय की ही आठवण नेमकी कुठून येते? हीच नव्हे, तर इतर साऱ्या लहान-मोठ्या आठवणी कुठे असतात? आणि जर आपल्याला इतक्या वर्षांपूर्वीची एखादी गोष्ट रंग-गंधासकट आठवते, तर मग परवा भेटलेल्या त्या माणसाचं नाव कसं काय आठवत नाही!