सोबतीण
आज अंगणातच मला दुरावा दिसला,
सगळयानी त्याला परक केल
याची खंत सलत होती त्याला,
त्याची ती अवस्था पाहवली नाही मला,
मी दुराव्याला ही आपलेस केलं,
असहायतेलाही साहय केलं,
दुख ही दरात उभा राहुन पाहत होत सार.
त्याच ही अगदी आनंदाने स्वागत केलं,
तो मला विखुरताना पाहयला आला होता,
त्यालाच मी प्रेमाच्या दोन शब्दांने सावरलं,
ते एेकुन माञ त्याचे डोळे नभाळ झाले
आणि दुख ही त्या क्षणी सुखावला,
कसली तरी चाहुल लागली,
कोण आहे तिकडे, पाहलं
कोपरयात गुपचुप खाली मान घालुन
एकटाच एकटेपणा बसला होता
काय हवं तुला?
झड
पावसाची येता झड
जुने जातसे वाहून
आठवणींचा दोदाणा
आणि अंतरीची खूण
धोधो पाऊस वाहता
माझे मन स्वच्छ होई
मागमूस किल्मिषांचा
सापडेना कोण्या ठायी
कडाडते वीज नभी
लख्ख तेज चकाकते
आठवणीतले हसू
तिचे मज खुणावते
झड थांबे घटकेने
थंडगार आसमंत
पाण्यातले प्रतिबिंब
भासे मज शांत शांत
(दोदाणा: पाण्याचा वेगवान प्रवाह)
लबरे़ज
लबरे़ज...
आज अचानक एक खजिना हातात लागला कोणाच्यातरी कृपेनं आणि मायेनं!निमित्त होतं आर डी बर्मन ह्यांच्यावर असलेला quintessential sunshine इतकं समर्पक नाव असलेला हा कार्यक्रम!
पाती..
आज घरी नारायण दशमी आहे. विदर्भातल्या एक-दोन जिल्ह्यात फारच कमी कुटुंबांमध्ये हा सण असतो. 90 टक्के विदर्भात हा प्रकार माहितीसुद्धा नसेल. आमच्या मूळ गावातल्या घरी आज सूर्यनारायणाची पूजा असते.कित्येक पिढयांपासून हे अखंड सुरू आहे. हळूहळू कुटुंब रुंदावलं, लेकरं गावाबाहेर पडलीत, संबंध कमी झालेत, तरी बहुतांश कुटुंबीय आपापल्या घरी नारायण दशमी करतात. हे व्रत तसं कडक आहे. लग्न होऊन सासरी गेलेल्या मुलीला कूळ बदललं तरी हे व्रत करावं लागतं.वडिलांच्या आत्याबाईंना वयाच्या पंच्यात्त्तरीपर्यंत नारायण दशमी करताना मी बघितलेलं आहे.
अलिबाग राईड..
घर ते अलिबाग
मार्च 13 ला शेवटली शतकी राईड झालेली. नंतर करोनाने छळ मांडलेला. हपिस बंद असल्याने सक्तीची विश्रांती. पण तरी कुठेही जाता येत नव्हतं. पावसात एकतरी मोठी राईड करायची होती पण रहाणार कुठे आणि खायचं काय? या प्रश्नाने हरवलं होतं. कारण हॉटेल सेफ नव्हती राहिली. छोट्या 40-50 km च्या राईड्सवरच समाधान मानत होतो. सहज मोगलीला कॉल केला की तो इकडे यायचा होता त्याचं काय झालं? तर तो म्हणाला अलिबागला जायचा विचार सुरुए. तिथे काही झाडं लावायचीत. एखाद्या चित्यासारखी या ऑफरवर झडप घातली. रहायचा प्रश्न सुटला. खाणं सोबत घेतलं की तो प्रश्न मिटला. लॉकडाऊनला कंटाळलेला बंड्या तिसरा भिडू आला.
Once in a lifetime....!
२८ ऑगस्ट ते ११ सप्टेंबर Govt. Medical college ला कोव्हीड ड्यूटी केली. पण ड्युटीची नोटीस हातात पडल्यावर पहिली प्रतिक्रिया ... मला का जावं लागतंय , बाकी लोकं जातीलच! माझी ओपिडी तशीही कमी आहे नुकतीच वाढतीये , मागचे कितीतरी दिवस अर्ध्यापेक्षा कमी वेळ काम करतोय ना ? मलाच infection झालं तर सरकार जबाबदारी घेणार का ?
मग जवळच्या मित्रांनी जाणीव करून दिली की ही संधी आहे काहीतरी भव्यदिव्य घडतांना साक्षीदार होण्याची आणि आपण समाजाचं काहीतरी देणं लागतोच ना मग जाऊन ये ड्युटीला... आई बाबांना काळजी होती पण मी जावं ही इच्छा देखील होतीच.
भुतो न भविष्यती अशी परिस्थिती ...
शिवप्रतापाची झुंज ( भाग २)
आधीच्या भागाची लिंक
शिवप्रतापाची झुंज ( भाग १)
"बेगमसाहीबा, अंदर आनेकी ईजाजत है ?" अलीने महालाच्या दाराबाहेर उभा राहून प्रश्न केला.
"हां, अंदर आवो! तशरीफ रखो" महालात करडा आवाज घुमला. बुरख्याच्या आडचे तिक्ष्ण बदामी डोळे अलीवर रोखले गेले. अली बैठकीवर बसला आणि महालातील ती करारी बाई ताडकन उठली आणि फेर्या मारु लागली. कोण होती हि राजस्त्री ? हि होती मरहुम महमद आदिलशहाची बीबी, बडी बेगम. वास्तविक हिचे नाव बडी बेगम नव्हते.
वेढा
अंकिता. . . . . . .
डोक्याला शॉट [चतुर्थी]
मला लिहिते करण्यात मोलाची भूमिका बजावणारे जेष्ठ मिपाकर अविनाश कुलकर्णी (अकु काका) यांना भावपूर्ण श्रद्धांजली. ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो ही प्रार्थना.
*****
ब्रह्मांड लोकातून चिन्मय परत आल्यावर बोललेला नवस फेडायला जानकी बाई लगेच पुढल्या दोन दिवसांनी काशी यात्रेला गेल्या होत्या.
काशी यात्रेहून परत आल्यावर चिन्मयही आता पूर्वीपेक्षा जरा बरा वागू लागल्याचे पाहून त्यांनी अप्पा राशीनकरांकडे त्याला कुठेतरी नोकरीला लावण्यासाठी शब्द टाकला. अप्पांनीही त्वरित त्यांच्या परिचयाच्या सरकारी कामांचे कंत्राट घेणाऱ्या एका कंत्राटदाराकडे त्याला नोकरीला लावले होते.
मिसळपाव