प्रेमाचा कोव्हीड!!
(नम्र विनंती: कविता हलके वाचावी. न आवडल्यास विसरून जावी. भावना दुखवून वगैरे घेऊ नयेत. तितकी तिची लायकी नाही. दिवस हे असे आहेत. त्यात आपला जरा विरंगुळा, इतकेच!)
--------
आठवतं तुला? तुझ्या अंगाला सेंटचा वास येत होता, सॕनिटायझरचा नाही.
आत्मविश्वास वाढवणारं भाषण
“तुम्ही इथे उगाच नाही जन्माला आला आहात, काहीतरी कारण आहे, तुम्हाला हा नश्वर देह घेवून नुसतंच जगायचं नाहीय, तुमच्यात काहीतरी आहे म्हणून तुम्ही ईथे आहात….. आणि ईथे तुम्ही अस्तित्वात आहात… जिवंत आहात…. हीच गोष्ट पुरेशी आहे….. आता फक्त तुम्हाला सिदध करायचं….. तुमची सगळी मेहनत ही तुमच्या मनाची मशागत करण्यासाठी असायला हवी…..एकदा त्यांच्यावरती ताबा मिळवला की झालं…. मनात गोष्ट पक्की करायची, त्यांच्यामागे लागायचं, यांसाठी काही ध्येय डोळ्यांसमोर ठेवावी लागतील….. तुम्हाला आभाळाएवढी स्वप्न बघावी लागतील, तुमच्या सध्याच्या परिस्थितीवरुन तुम्हालां ते अशक्यप्राय वाटेल…..
सोनगड
"राज्याचे सार ते दुर्ग" असे अज्ञापत्रात सांगितले आहे. अर्थात दुर्ग हे मुलतः संरक्षणाची वास्तु म्हणून उभारले गेले. लष्करी ठाणी हा बहुतांश किल्ल्यांचा प्राथमिक उद्देश असला तरी काही किल्ल्यांचा इतरही कामासाठी उपयोग झालेला दिसतो. महाडजवळच्या आणि रायगडाच्या घेर्यातील सोनगडाचा मुख्यतः वापर कारागृह म्हणून झाला. अर्थात सोनगडाने युध्द पाहीली नाहीत असा मात्र याचा अर्थ नव्हे. सावित्री नदीच्या मार्गाने याठिकाणी गलबतातुन मोठया प्रमाणात व्यापार चालत असे. बंदरावरील या व्यापारी मार्गाचे रक्षण करण्यासाठी दौलतगड,सोनगड,महेंद्रगड या किल्ल्यांची साखळी निर्माण केली गेली.
व्यथा
'अंतरात खोल काही दाटले आहे'
'वाहवा! काय सुंदर मांडले आहे!'
वृक्ष काय वृद्ध रे होती कधीही?
म्हणती, हे झाड छान वाढले आहे
कसे आज अचानक सुटले कोडे?
जाणीवेने क्षणास या गाठले आहे
राहू दे ठिगळ, आणखी धागा-सुई
व्यर्थ धडपड आभाळ फाटले आहे
कितीक वर्षे, अजून ही जखम ओली
पाहीन वाट, अन्य उत्तर कोठले आहे?
आताशा उचकीही येत नाही मला
वाटते कुणी नवे तुला भेटले आहे
-अनुप
प्रेम म्हणजे प्रेम असत!
प्रेम म्हणजे प्रेम असत,
पण तुमचं आमचं वेगळं असतं…
तुमचं प्रेम बुलेट, bmw वर असतं,
तर माझं प्रेम Btwin, Trek वर असतं…
तुमचं प्रेम मॅक डी तल्या बर्गर वर असतं,
तर माझं प्रेम सब वे तल्या सॅलड वर असत…
तुमचं प्रेम इंस्टाग्राम वर असतं,
तर माझं प्रेम Strava वर असतं…
तुमचं प्रेम मोची नि H &M वर असतं,
तर माझं प्रेम Decathlon वर असतं…
तुमचं प्रेम सिल्क आणि कॉटन वर असतं,
तर माझं प्रेम ब्रीदेबल जर्सी वर असतं…
तुमचं प्रेम INOX, सिनेपोलिस वर असतं,
तर माझं प्रेम BRM, RAAM वर असतं…
तुमचं प्रेम मॉर्निंग वॉक वर असतं,
तर माझं प्रेम मॉर्निंग राईडवर असतं…
तुमचं प्रेम बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड वर असतं,
माणूस आणि एकलेपण
- डॉ. सुधीर रा. देवरे
माणूस नात्यागोत्यांच्या सहवासात एकटा पडत नाही. दु:खातच नव्हे तर सुखाच्या दिवसातही माणसाला आपल्या माणसांसोबत रहायला आवडतं. विवाह समारंभ जसा एकट्याने साजरा करता येत नाही, किमान वधूवरांचे दोन कुटुंबं आणि दोन मित्र त्यात सामील असतात, तसा माणसाचा शेवटचा दिवसही म्हणजे अंत्यविधीही कोणाला एकटेपणाने उरकता येत नाही. माणसाच्या पार्थिवाला उचलायला कमीतकमी चार खांदे द्यावे लागतात. (आता वैकुंठ रथ असला तरी.) सारांश, सुखाचा आनंद व्दिगुणीत करण्यासाठी माणसाला मित्र- नातेवाईक लागतात आणि दु:खाचं सांत्वन करण्यासाठीही माणसाला आपुलकीचे लोक लागतात.
माणूस या जगात एकटा जगू शकेल?
वर्षादूत
काळ्या झालरीची नक्षी
नभी लोलक विजांचे
वाजे चौघडा नगारे
वाऱ्यासंगे हे ढगांचे
आला,आला म्हणताना
दारी येउनी ठाकला
वर्षातला नवा ऋतु
माझ्या डोळ्यात साठला
किती किती त्याचा दंगा
किती रूपे, किती रंग
काळ्या फत्तराला देई
एक ओलसर अंग
त्याचे थेंब, त्याच्या सरी
येती धावून धावून
आर्त तापल्या भुईला
भेटी कवेत घेऊन
कोसळल्या धरेवरी
जशा धारांवर धारा
काळी माय झाली सर्द
बिलगून लेकराला
मग धावले बाहेरी
तिच्या अंतरीचे काही
वाहे भरून भरून
जाऊ दश दिशा पाही
मंद गंध जीवघेणा
कसा पसरे भरारा
गेला दाटून कोंदून
ओल्या सृष्टीचा गाभारा
वाटे हवासा हवासा
पाहुणा हा अनाहूत
निथळूनी गेले मन
पाहुनी हा वर्षा दूत
मिसळपाव