Skip to main content

शब्द

लेखक VRINDA MOGHE यांनी सोमवार, 12/10/2020 20:27 या दिवशी प्रकाशित केले.
*शब्द* शब्द देतात आनंद दुःखही देतात शब्दच, शब्दानेच मिळते वेदना त्यावर मलम होती शब्दच !! शब्दातून मिळते प्रेम माया हि होतात शब्दच, शब्दच नात्यांतला दुरावा, नवी नाती जुळवतो शब्दच !! ह्रदयातून यावा शब्द, साखरमाखला गोड गोड, भावनेने ओथंबलेला , काही नको त्यात तडजोड !! कधी मुके होतात शब्द, अन् बोलू लागतात डोळे, भाव मनीचे याचे त्याला, जातात समजून सगळे !! झाडं वेली, डोंगर दरी पक्षी बोलतात मधुर शब्द मोहवणारं निसर्गाचं हरेक रूप. तेथे मात्र सारंच निःशब्द !! होई सारंच निःशब्द !!! -©सौ वृंदा मोघे 15/1/2020

पाऊस

लेखक मका म्हणे यांनी सोमवार, 12/10/2020 20:24 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस मनातला पाऊस आठवणीतला पाऊस तुषारांचा पाऊस वळवाचा पाऊस कडाडणाऱ्या विजांचा पाऊस घनगर्द काळ्या नभाचा पाऊस सरींवर सरींचा पाऊस भरून वाहणाऱ्या नद्यांचा पाऊस खळाळत येणाऱ्या ओढ्यांचा पाऊस धबधब्यातून कोसळणारा पाऊस निसर्गात भरून राहिलेला पाऊस छत्रीच्या किनारीवरून ओघळणारा पाऊस भिजलेल्या कपड्यांच्या वासाचा पाऊस झाडाखाली थांबलेला पाऊस पत्र्यावर टपटपणारा पाऊस सर्द काडेपेटीतला पाऊस मिठालाही पाझर फोडणारा पाऊस पापडाला मऊ करणारा पाऊस चपलेतून पाय सटकवणारा पाऊस वस्त्रे उंचावून चालवणारा पाऊस ओले केस निथळणारा पाऊस कौलांवर शेवाळ पांघरणारा पाऊस डोळ्यातलं पाणी हलकेच मिसळून घेणारा

माणुसकी

लेखक VRINDA MOGHE यांनी सोमवार, 12/10/2020 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
*माणुसकी* बदलापूर स्टेशनवर लोकल ट्रेनची वाट पहात उभी होते. दादर ला जायचं होतं. एका मैत्रिणीकडे सगळ्याच जमणार होतो, जवळजवळ चार वर्षांनी भेटून अख्खी रात्र गप्पा, गाणी असा बेत होता. एक मैत्रिण दादर स्टेशनवरच भेटणार होती. खुप उत्साही वाटत होतं सगळ्या भेटणार म्हणून. तेवढ्यात बदलापूर लोकल आलीच. लेडीजच्या मधल्या डब्यातून सगळी बायकांची गर्दी चिवचिवत बडबड करत उतरली. मग चढणा-या बायका, मुली घाई न करता सावकाश चढल्या. मी हल्ली नोकरी सोडल्यापासून प्रवास करत नाही लोकलने. त्यामुळे अशी ही दुपारची वेळ मला फारच आवडली होती प्रवासासाठी. आत चढून राईटविंडो ची सीट बघून बसले. आजुबाजूला कोणी अजून आलं नव्हतं.

साहित्य संपादक मंडळात नवीन सदस्यं

लेखक नीलकांत यांनी सोमवार, 12/10/2020 09:44 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मिपाच्या साहित्य संपादक मंडळात चार नवीन सदस्यं नव्याने जोडले आहेत. मिपावरील लेखन आणि नवीन सदस्यांना लेखन संदर्भात मार्गदर्शन करण्याचे काम, त्यांना त्यांच्या लेखनात बदल करायचे असल्यास अश्या प्रकारच्या मदतीसाठी साहित्य संपादक मदत करतील. मिपाच्या साहित्य संपादक मंडळात सामील झालेल्या नवीन चार सदस्यांची नावे खालील प्रमाणे.

तुतनखामुन

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी सोमवार, 12/10/2020 00:19 या दिवशी प्रकाशित केले.
mAK ईजिप्त ची संस्कृती सुरक्षीत राहीली कारण पुर्वेला सौदी वाळवंट आणी तांबडा समुद्र दक्षीणेला जंगल, पश्चिमेला सहारा वाळवंट, ऊत्तरेला भुमध्य समुद्र ह्यामुळे त्यांच्यावर परकीय आक्रमणे खुप कमी झाली.

विश्वास

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 11/10/2020 14:32 या दिवशी प्रकाशित केले.
*विश्वास* तो कोसळतो, सहस्त्रधारांनी अविरत अखंड आपल्याच नादात.. तीच्या डोळ्यातली वेदना...

माझा डबा

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 11/10/2020 14:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझा डबा आपलं बायकांचं कसं असतं ना..अपल्या घरातल्या चमच्यांपासून डबे, वाट्या, ताटं, ताटल्या सगळ्यांत जीव  गुंतलेला असतो. त्यातून सगळं स्वतः घेतलेलं असलं तर जास्तच आणि माहेरहून मिळालेलं असेल तर मग विचारायलाच नको. आणि ह्यातलं काही कोणाला दिलं गेलं तर परत मिळेपर्यंत जीव कित्ती कासावीस झालेला असतो नाही? झालं असं.. आमच्याकडे सत्यनारायणाची पूजा होती. थोडक्यातच करायची, म्हणून जवळचेच मित्र मैत्रिणी बोलावले होते.  सगळं व्यवस्थित पार पडलं. मैत्रिणीच्या मुलाला शिरा खूपच आवडतो म्हणून तीने  माझ्या अत्यंत लाडक्या अशा थोड्याशा वेगळ्या आकाराच्या डब्यात भरून नेला.