Skip to main content

भूमिपुत्र ...बळीराजा

लेखक Vivekraje यांनी बुधवार, 28/10/2020 10:08 या दिवशी प्रकाशित केले.
धरतीच्या लेकराला कसं आभाळ नडलं.. होतं सपान येगळ सारं इपरित घडलं.. होती कष्टाची पावती , सारी उभी शेतामधी.. आलं आभाळाच्या मनी, उभं पाणी डोळ्यामधी.. शेत पाण्यात भिजलं , मन जागीच थिजलं.. रान सपनाच उभं, एका क्षणात विझलं.. कधी बाजारात धाक , काय मिळेल हो दाम.. पेरी मोत्याचं बियाणं, वाही अनमोल घाम.. कर्ज व्याजनं ते काढी , रानी हिरवळ शृंगारी.. व्याज फेडी दर साली, तरी फिटेना उधारी.. दरसाली पेरतो , नव्या सपनाच बियाणं.. तरी भरेना घरात, कधी खरं सोनं नाणं.. दिस सणाचे हे आले, देवा आता उंबऱ्यावर.. करी उपकार थोडे ,जगाच्या पोशिंद्यावर.. थोडी उसंत जगण्याची,त्याच्या नशिबी मिळू दे.. सपनं छोटी

प्रिय मिनूस: माझे करोना (रड)गाणे

लेखक मित्रहो यांनी मंगळवार, 27/10/2020 13:33 या दिवशी प्रकाशित केले.
ए मिने (ते Hey Means म्हणणारा नाही फार मिन वाटत.) तेंव्हा सोपच आपलं प्रिय मिनू कशी आहेस? किंवा How are you? यासारखे ऐहीक सुखाशी संबंधित प्रश्न विचारुन मी तुझा आणि मुख्य म्हणजे माझा वेळ खर्ची घालणार नाही हे मी तुला याआधीही प्रत्येक पत्रात स्पष्ट केले आहे. मी मागेच लिहिणार होतो पण करोनाच्या काळात इ-मेल सुरु राहिल की नाही याचा स्पष्ट खुलासा सरकारकडून न झाल्याने लिहायला उशीर झाला. नोकरशाहीच्या चुकांसाठी मी दिलगीरी व्यक्त करणार नाही.

स्मरण रंजन

लेखक नीलकंठ देशमुख यांनी मंगळवार, 27/10/2020 10:47 या दिवशी प्रकाशित केले.
"आवाज के दुनिया का दोस्त " संगीत ,सर्व प्रकारचे संगीत,लोकप्रिय होण्यात ,त्याचा प्रसार ,प्रचार होण्यात रेडीओ चा फार मोलाचा वाटा । हिंदी चित्रपट संगीताची वाटचाल किंवा घोडदौड तर मुख्यत्वेया माध्यमाच्या पाठीवरूनच झाली । आपला शेजारी देश,सिलोन(श्रीलंका )रेडीओ वर हिंदी सिनेगीतासाठी वेगळे केंद्रच (श्रीलंकाब्रॉडकॉस्टिंग कंपनीचे )आहे । बहुतेक आपणा सगळ्यांचे आवडते स्टेशन। तिथे ऐकलेल्या असंख्य गाण्यांनी वेड लावले । सर्व कार्यक्रमाचा सरताज म्हणजे "बिनाका गीतमाला""। बुधवार केव्हा येतो ,रात्रीचे आठ केव्हा वाजतात अन , #भाईयो और बहनो 'अशी साद घालत आवाज की दुनिया के दोस्तों को साद घालणारा एक सुपरिचित ,सुप्रस

आवाज की दुनिया का दोस्त

लेखक नीलकंठ देशमुख यांनी सोमवार, 26/10/2020 10:44 या दिवशी प्रकाशित केले.
'आवाज की दुनिया का दोस्त।' दोन हजार आठ मधे मुंबई ला जॉईंट च्यारिटी कमिशनर (धर्मादाय सह आयुक्त) होतो। विविध प्रकारचे ,विविध स्तरातील लोक कामानिमित्त भेटायचे । एके सकाळी निजी कक्षातला फोन वाजला। सहाय्यका ने घेतला । कुणीतरी माझ्या भेटीची वेळ मागत होते । "आज साहेब बिझी आहेत " सरकारी नोकरांची ही एक पध्दत असते, आपले महत्त्व वाढविण्यासाठी। त्यानुसार त्याचे उत्तर । नजरेनेच , 'कोण? 'म्हणून माझी विचारणा। अमीन सयानी ,ते रेडीओ वाले '- सहाय्यक। क्षणभर काही कळलेच नाही। अमीन सयानी ? द लेजैंड ?

रोमान्स विथ मुझिक

लेखक संजय क्षीरसागर यांनी रविवार, 25/10/2020 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
गाणं हा शांतता आणि ध्वनी यातला प्रणय आहे. शांतता ही स्त्री प्रकृती आहे आणि ध्वनी पुरुष आहे. तुम्ही जीवनात गाणं आणलंत तर हा रोमान्स अविरत चालू शकतो. आशा भोसले म्हणते की गाणं ही फक्त शब्दाचा ध्वनी करण्याची कला आहे. जनमानसात एक दृढ गैरसमज आहे की गाणं ही अवघड कला आहे आणि मुख्य म्हणजे आपल्या आवजात गोडवा नाही. या लेखाचं प्रयोजन असं की कोणतंही शास्त्रीय संगीत किंवा गाण्याचं फॉर्मल ट्रेनिंग न घेता, तुम्ही सुद्धा सुरेख गाऊ शकता. तुमच्याकडे एकमेव गोष्ट हवी ती म्हणजे रोमँटीक मूड ! हा रोमँटीक मूड तुमच्या जीवनाचा सगळा रंगच बदलून टाकतो.

पालक चकली (फोटो-विडिओ सोबत)

लेखक मी_देव यांनी रविवार, 25/10/2020 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसापूर्वी माझ्या सौच्या पणजीआजीने दिलेल्या कृतीने हि चकली करून पहिली. मुलाला खूप आवडली. या वेळी पुन्हा करताना व्हिडीओ केला. इकडे भाजणी सहसा मिळत नाही म्हणून यावेळी पीठं आणि मसाला भाजून पीठ तयार केलं. छान झाली.

विजयादशमी शुभेच्छा

लेखक VRINDA MOGHE यांनी रविवार, 25/10/2020 14:24 या दिवशी प्रकाशित केले.
कोवळी आंब्याची पानं विणली तोरणात, पिवळी, केशरी झेंडूची फुलं ओवली दो-यात! तयार केले भरगच्च तोरण, बांधले घराच्या दारात , आज दसरा ! विजयाची जाणीव जागते मनामनात !! आपट्याचं पानं सुवर्ण म्हणून वाटून परंपरा जपतो, अन् मैत्रीचा भाव एकमेकांच्या मनांत जागवतो !! सर्वांना आठवणीने शुभेच्छा देऊन आनंदीत करतो, छोट्या छोट्या अनेक गोष्टींनी नाती बांधून ठेवतो !!

विजयादशमी..!!

लेखक Jayagandha Bhatkhande यांनी रविवार, 25/10/2020 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
विजयादशमी...!! मस्त आरामात पेपर वाचत असतानाच, चिरंजीव वही घेऊन आले. बाबा मला विजयादशमीचा निबंध सांगा. "अरे..आईला विचार रे राजा.." मी प्रामाणिक प्रेमाने म्हटले. अहो, दुसरीतच आहे तो.. पी.एच.डी.चा निबंध सांगत नाहीये. तेवढं जमेल तुम्हाला... माझ्या अस्मितेला लागलेला धक्का सावरत, मी 'हो' म्हटलं.. जुजबी माहिती सांगत लेकाचा पानभर निबंध पूर्ण झाला.. पण पुन्हा मात्र पेपर वाचनात मन रमेना. अरे, हे माझं सुट्टीच्या दिवशीचं वाचनाचं सुख हिरावून कोण घेतंयं..? रामदास स्वामींची आठवण झाली. जगी सर्व सुखी, असा कोण आहे.. आणि त्यांची गंमत वाटली.

गावाकडचे नवरात्र

लेखक नीलकंठ देशमुख यांनी रविवार, 25/10/2020 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
स्मरण रंजन नवरात्र गावातील मोठ्या  चौकात,मध्यभागी एक मोठा आड. चौकाभोवती  देशमुखांची पंधरा सोळा घरे. देशमुख गल्ली. दोन मोठी चिरेबंदी वाडे . पैकी एक आमचा.  भाद्रपद वद्य ( पितृपक्ष) संपायच्या आधी चार पाच दिवस  ,म्हणजे नवरात्र सुरू व्हायच्या आधी घराच्या साफसफाईची लगबग  .    ओसरी,स्वयपाक घर , ओसरी व माडीवरील खोल्या, सगळ्यांच्या भिंतींचे सारवण. स्त्री  मजुरांकडून. अंगणाच्या भिंतींना पिवळी खडी. अंबाडीचे कुंच्याने  किंवा पिकांवर, डी.डी.टी. फवारणीचे फवार्राने. बैठकीचे भिंतींना खालचे अर्ध्या भागास निळा/हिरवा ऑईलपेंट. वरती  डिस्टेंपर.