खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसींगची खोड मोडली
(पार्श्वभूमी: मिपासदस्य अतृप्त आत्मा यांनी नुकतीच खडकवाडी, खडकवासला गावाला भेट दिली. त्या अनुषंगाने तेथील खासदार खासेराव खडके खासेपाटील यांची साहसकथा त्यांना ऐकवावी असे वाटले. )
खडकवासल्याच्या खडकवाडी खुर्द खेड्यातील खडकेवाड्यातील खासदार खासेराव खडके खासेपाटलांनी खडकसिंगची खोड मोडली
खुंखार खासदार खासेराव खडके खासेपाटील यांचा खाजगी खडकेवाडा खडकवासला धरणाच्या खालच्या खडकाळ अंगाला खडकवाडी खुर्द खेड्यात होता.
खासेपाटील यांचा खानसामा खच्चून खटकी होता. त्याला खासेरावांचा मुलगा खगेंद्र डोळ्यात खटकत होता. खगेंद्र खूप खाऊ खात असल्याने खानसामा खार खाऊन होता.
बेडसे लेणी व पवना जलाशय परिसर २०१७
कार्ले, भाजे, बेडसे या लेण्यांच्या त्रिकुटापैकी बेडसे लेणी बघायची बाकी होती. ही लेणी बघूनच २०१७ च्या नववर्षाच्या भटकंतीची सुरुवात करायचे ठरविले. गुगलवर थोडासा शोध घेतला आणि दिवसभराचा कार्यक्रम निश्चित केला. बेडसे लेणी पुर्वाभिमुख आहेत त्यामुळे सकाळच्या वेळी लेण्यांत चांगला प्रकाश असतो व लेणी बघण्यास चांगले पडते असे वाचल्याने आधी लेणी पाहून नंतर वेळ मिळेल त्याप्रमाणे बाकीची भटकंती करण्याचे ठरवले.
दोन्ही मुली व आम्ही दोघे सकाळी नऊला नवी मुंबईहून निघालो.
मनाचिये गुंती
नमस्कार मागील काही महिन्यात जी उलथापालथ माझ्या जीवनात झाली,ती या चार छोट्या लेखात मांडली. त्यामालिकेतील हा शेवटचा भाग.
आपल्या प्रतिक्रिया वरून आपल्या ला हे लिखाण भावले आवडले असे दिसते.छान वाटले.धन्यवाद.हा भाग कसा वाटला कळवावे.
४
मनाचिये गुंती..
गणेश चतुर्थीच्या दिवशी रुग्णालयात गेलो.एंजिओप्लास्टी होऊन,सहा दिवसांनी ,महालक्ष्मीचे शेवटचे दिवशी, घरी परतलो.
माझी जीवनशैली ,प्रकृती ,सवयी इ.लक्षात घेता मला हार्ट एटॅक यावा हा मलाच नाही तर मला ओळखणारे सर्वांसाठी धक्काच.अगदी शिस्तबद्ध नसलो तरी मी बेशिस्त ही नाही.
जिंदगी ख्वाब है.
३.
जिंदगी ख्वाब है..
डोळे उघडले.कुठे होतो हे सुरुवातीला काही कळलेच नाही.
नवीन जागा होती. दोन्ही हातांना सुया टोचलेल्या.त्यांना जोडलेल्या नळ्या तून सलाईन वाटे औषधे सुरू होती.छातीवर पण काही नळ्या होत्या.एका यंत्राला जोडलेल्या. नाकाला ऑक्सीजन मास्क. कॅथेड्रल,डायपर पण लावलेले. मग लक्षात आले. हॉस्पिटलमधील आय.सी.यु.वॉर्ड. बेडवर होतो..
'कसं वाटतंय आता? ठीक आहात?'_नीलू.
'हो.
क्रायसिस?
को ला आणायला जाणे भाग होते. आठ दिवसांची सुट्टीत युनिट वर कामाच्या फ्लो मध्ये काहीही अडचण न येण्यासाठी लागणाऱ्या सर्व बाबींची पूर्तता करून ठेवलीच होती. पण तरी सुद्धा पुन्हा एकदा खात्री करून घेतली. हाफ सेंच्युरी निमित हील स्टेशन चा २ दिवस ३ रात्री नेमका कुठे ते अजुन ठरले नव्हते. मदिकेरी, कुद्रेमुख ची निवड को वर सोडली होती.
....
प्रवास सुख काही नशिबात नव्हते. ३ आगाऊ पोरांनी रात्र भर उच्छाद मांडला आणि झोप अपुरी झाली. को ने ते बरोब्बर ओळखले. जायफळ घातलेला पायस म् ओरपून ८ तासांची झोप पुरी केली.
........
संध्याकाळी पाय मोकळे करायला बाहेर पडलो. सगळा अनुभव वेगळाच होता.
स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग
नमस्कार मित्रांनो
माझी आई , श्रीमती सुलेखा ना. मेहेंदळे,सध्या वय वर्षे ८१ , व्यवसाय स्मरणरंजन, फोनवर गप्पा मारणे,स्तोत्रे पोथ्या वगैरे वाचणे आणि काही प्रमाणात लिखाण करणे. तर बरेच दिवस ती लिहीत असलेल्या आठवणीमधील काही पाने मिपावर प्रकाशित करावीत असा माझा विचार चालू होता आणि तो मी तिला बोलूनही दाखविला होता. त्याप्रमाणे मी दर थोडे दिवसांनी तिला विचारत असे आणि झालेले लिखाण चाळून काही सूचना करत असे. सरतेशेवटी आजपर्यंत लिहून झालेल्या आठवणी थोड्या थोड्या प्रकाशित करूया असे ठरवून आज हा पहिला लेख लिहीत आहे.
तसे म्हटले तर सामान्य माणसाच्या आयुष्यात असामान्य असे काय असणार?
पिक्चर!!
मला लहाणपणी पिक्चर पहायला खूप आवडायचं! टिव्ही समोरून मी हलत नसे. खेडेगावातलं बालपण माझं! मी आजूबाजूला पहायची ती दुनिया अन् टिव्हीतली दुनिया यांत जमिनअस्मानाचा फरक. माझा इवला जीव त्यांत फार रमायचा. घरीदारी या वेडाची फार चेष्टा केली जाई. मला वाटे, आपल्या आयुष्यातपण काहितरी पिक्चरसारखं व्हावं! उन्हात पाऊस पडावा, आपल्याकडे बोलणारा पोपट असावा, पळत असताना आपले केस हिरोईनसारखे उडावे, विस्कटू नयेत, शाळेत वर्गात बसले असताना, वारा आला तरी नेमकी एकच बट गालावर यावी, सगळे केस पिंजारू नयेत, नंतर मोठी झाल्यावर ओढणी वार्याने उडून गेली तर वाटे, आता एखाद्या मुलाच्या तोंडावर जाऊन अडकते की काय?
मिसळपाव