Skip to main content

एक प्रवास -असाही

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 12/11/2020 12:03 या दिवशी प्रकाशित केले.
*एक प्रवास- असाही* आठवडाभराच्या रजेनंतर आज ऑफिसला निघाले. अजून ट्रीपचा शीण गेला नव्हता. जरा जड मनाने आणि जड पायानेच निघाले. पावणेआठ वाजले होते. शेअर ऑटो मिळाली नशिबाने पटकन. रिक्षा अलिकडच्याच चौकात थांबते..पटापट चालत कसली पळतच प्लॅटफाॅर्मला आले. आठ-चौदा उभीच होती. पटकन फर्स्टक्लासच्या डब्यात चढले. सिटस् तर फुल झाल्या होत्या. या ट्रेनने कधीकधीच जाते त्यामुळे या ट्रेनला ओळखीचं कोणी सहसा भेटत नाही. दाराजवळच्या पॅसेजमधे टेकुन उभी राहिले. सहजच पर्स मधे हात घालून पाकिट तपासलं. कार्ड कव्हर काढून पास वगैरे सगळं आहे ना व्यवस्थित बघायला लागले. अन् एकदम दचकले. अरे देवा !! दरदरून घामच फुटला.

रॉकस्टार

लेखक महासंग्राम यांनी बुधवार, 11/11/2020 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
मी त्याला पहिल्यांदा भेटलो २०११ साली, याच दिवशी. जनार्दन, बेजबाबदारपणाचं दुसरं नाव होता तो. फार उनाड. घर व्यवस्थित भरलेलं होतं, घरचा व्यवसाय मोठे भाऊ सांभाळत होते, तशी याच्यावर जवाबदारी नव्हती कसलीच. सकाळी सकाळी कॉलेजमध्ये जायचं, टवाळकी करायची, मित्रांच्या गराड्यात रमायचं हेच काय ते काम. तो गिटार मात्र फार छान वाजवायचा. (आयुष्यात अर्धवट सोडलेल्या गोष्टींपैकी एक म्हणजे त्याला बघून मीही गिटार शिकण्याचा अयशस्वी प्रयत्न केला.) त्याचा आवाजही छान होता, वेगळ्या धाटणीचा. पण काही केल्या आयुष्यातील कला बहरत नाही अशी तक्रार होती त्याची.

शिकण्याचे मानसशास्त्र — वर्ड प्रॉब्लेमस्

लेखक राजा वळसंगकर यांनी बुधवार, 11/11/2020 20:18 या दिवशी प्रकाशित केले.
“The twin goal of mathematics education is the development of critical thinking and problem-solving skills and abilities.” एका अभ्यासलेखामधे हे वाक्य वाचले आणि थबकलो. मार्कांच्या रस्त्यावर झापड लावून धावणाऱ्यांचा मागे कळपवृत्तीमुळे धावताना आपण काहीतरी विसरलो आहोत हे जाणवत होते, काहीतरी मागे ओढत होत आणि थांब, प्लीज थांब म्हणत होत... हाच का तो विचार ... ? मागच्या अनेक FB पोस्ट मधून शिकण्याचे मानसशास्त्र आणि त्यातून डोकावणाऱ्या साहित्याच्या घटकांची "थिअरी" वर लिहिले, आता "प्रॅक्टिकल"! यासाठी वर्ड प्रॉब्लेम हा एक मोठा घटक आहे.

मी पाहिलेला एक चांगला मराठी चित्रपट

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी बुधवार, 11/11/2020 16:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो. डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा. मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट. हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो. १. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे. २. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला. दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव. धन्यवाद

स्मृतींची चाळता पाने --अनगाव

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी बुधवार, 11/11/2020 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
आधीचा भाग-- स्मृतींची चाळता पाने --मुक्काम पोस्ट लालबाग १९४५ हे वर्ष आमच्यासाठी फार वाईट गेले. मी १९४५ मध्ये माझे वडील अल्पशा आजाराने वारले. मी तेव्हा फक्त ६ वर्षांची होते.मला माझे वडील नीटसे आठवतही नाहीत.माझी मोठी बहीण विमल तेव्हा ९ वर्षांची होती तर आई सुशिलाबाई ३० वर्षांची.