Skip to main content

पाणीबाणी

लेखक vcdatrange यांनी शनिवार, 26/12/2020 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
सावर्डे - नाशिक, पालघर अन् ठाणे जिल्ह्याच्या टोकावरलं आदिवासी गावं. . . पुर्णत: जंगलात. तीन डोंगरांच्या मध्ये दरीत वसलेलं. वस्ती १२५ कुटुंबांची. अजुनही बारमाही रस्ता नाही. म्हणजे आता पावसाळ्यात चार महीने गाडी घेवुन या गावात जाता येणार नाही. अशी परिस्थिती होती सन २०१८ पर्यंत. सावर्डे गाव गेल्याच वर्षी रस्त्यानं जोडलं गेलयं, ते स्वातंत्र्यानंतर तब्बल ७२ वर्षांनी. मोखाडा तालुक्यातील काष्टी ग्रामपंचायती अंतर्गत असलेलं सावर्डे गावात पोहोचायला दरीतील घाट उतरुन जावं लागतं.

ज्ञात अज्ञात पंढरपूर ४ सरकार वाडा/ वासकर वाडा

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 25/12/2020 18:54 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञात अज्ञात पंढरपूर ४ सरकार वाडा/ वासकर वाडा अनादी काळापासून भक्तीची पेठ म्हणून सर्वप्रसिद्ध असणाऱ्या पंढरी नगरीत अनेक मान्यवर येवून गेले. काहीनी केवळ दर्शन पूजादी धर्मकृत्ये केली, काहिंनी काही काळ निवास केला काहींनीं कायमचे वास्तव्य केले. यात संत, महात्म्ये, विद्वत्जन , राजे महाराजे, रंक, राव, साधू, भक्त, अभक्त, हौशे, गवशे, नवशे सारेच होते. तसा स्थान महिमा असल्यामुळे पेशवाईमधे पंढरपूरामधे सर्वच सरदारांचा राबता असल्याने त्यांनी पंढरपूरात आपल्या निवासासाठी मोठ मोठे वाडे बांधलेले दिसून येतात. त्यात सर्वात प्रमुख म्हणजे स्वत: छत्रपती आणि पेशवे.

माझ्या टेलिस्कोपमधून गुरू- शनी महायुती बघण्याचा थरार आणि अनुभव

लेखक मार्गी यांनी बुधवार, 23/12/2020 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वांना नमस्कार! नुकत्याच झालेल्या गुरू- शनी आकाशीय महायुतीचे माझ्या टेलिस्कोपमधून घेतलेले फोटो व व्हिडिओज शेअर करत आहे. प्रत्यक्ष बघण्याचा अनुभव हा खूप रोमांचक असतो आणि दोन दिवस लोकांच्या प्रतिक्रियांमधून तो रोमांच जाणवतही होता. फोटोमध्ये त्याची केवळ एक मर्यादित झलक मिळते. ते फोटोज व व्हिडिओज आपल्यासोबत शेअर करत आहे. हे फोटोज व व्हिडिओज मी परभणीमधून माझ्या स्टारट्रॅकर 114/500 रिफ्लेक्टर टेलिस्कोपमधून काढलेले आहेत. आणि टेलिस्कोपशिवायसुद्धा हे दोन्ही ग्रह एकमेकांना चिकटून असलेले बघणं आनंददायी होतं.

अज़ीज़ मलिक - एक रसग्रहण

लेखक कुमार जावडेकर यांनी मंगळवार, 22/12/2020 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
काल-परवाच टीव्ही. वर एक तलत महमूदचं गाणं कुठल्यातरी गलत महमूदच्या आवाजात पुनर्मिसळ केलेलं माझ्या बघण्यात आलं. तो गायक तलत नव्हता हे ऐकताना (नव्हे, ऐकता क्षणीच) कळलं आणि महमूद तरी होता की नव्हता हे कळण्याआधीच मी चॅनेल बदललं. पण तरी ते गाणं ओठांत येत राहिलं आणि त्यामुळे अनेक गोष्टी आठवल्या. आपल्या आवाजाला जरासा रफ्फू केला की आपणही महंमद रफीसारखे गाऊ शकतो असा समज असलेले अनेक शेख महंमद आमच्या बालपणी होऊन गेले होते. अन्वर, शब्बीर कुमार, महंमद अजीज अशी अनेक नावं त्यांनी धारण केली होती. (पुढे त्यातूनच 'सोनू निगम'ची स्थापना झाली आणि बाकीच्या या छोट्या-मोठ्या गायकांची सुट्टी झाली.) असं अनेकदा होतं.

कशाला हवी ही दुकानं?

लेखक Bhakti यांनी मंगळवार, 22/12/2020 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
अक्षरशः १०-१५ वर्षे या वेगवेगळ्या दुकानांतून फिरून मला असे वाटते ,,ते असीम्य ,अदृश्य शक्ती असतांना ह्या दुकानांची गरज ती काय. अगदी अडाणी ,अशिक्षित लोकांना भोंदुच्या दुकानापाशी पाहिले की आपण अस्वथ होतो.मग नकळत वडीलधारी यांच्या मानाखातर सहस्त्रनामी जप करणाऱ्यांच्या दुकानात आपणही गेलोच होतो की...किंवा जातोच की.बुरखा ओढलेला असतो मनातल्या मनात तो दिसत नाही.सरळ उठून निसर्गात जाव वाटत.बर सामान्यांना नाही उमजत तर शहरातील प्रतिष्ठीत,शिक्षित अन्नदानाचे गोंडस नाव घेऊन,देणग्या उधळत या दुकानांना चालूच ठेवतात.बर अन्नदान कोणाला तर आपल्याच जनाला ...मग वृधाश्रम ,अनाथाश्रम का नाही दिसत ? सामान्यांन नंतर सो ..सो

फ्लॅट मध्ये चुलीचा स्वाद

लेखक साहना यांनी मंगळवार, 22/12/2020 03:12 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीवर आपण जेंव्हा काही ऍन बनवतो तेंव्हा लाकडाच्या धुराचा वास त्या अन्नात आपसूक घुसतो. आधुनिक मुलांना कदाचित हा वास आवडणार नाही पण गावांतून शहरांत गेलेल्या अनेक लोकांना हा वास मिस होतो. मक्याचे कणीस, पापड किंवा अगदी "नुस्तें" जरी गॅस वर बनवले तरी त्या लाकडाच्या धुराच्या वासाच्या शिवाय त्याची चव तेव्हडी चांगली वाटत नाही. ह्या शिवाय बिर्याणी, मटण, जंगली गेम मांस ह्याला जर तो थोडा धुराचा वास नाही तर त्याला अजिबात मजा येत नाही. त्यामुळे खालील ट्रिक वापरून आपण अगदी फ्लॅट मध्ये सुद्धा लाकडी धुराच्या वासाचे अन्न बनवू शकता.