Skip to main content

नालायक .

लेखक Jayant Naik यांनी सोमवार, 04/01/2021 17:53 या दिवशी प्रकाशित केले.
नालायक . प्रसिद्ध छायाचित्रकार रमेश जाधव यांना स्वतःबद्दल खूप अभिमान होता. आज सकाळी सुद्धा ते सकाळी आपला नेहमीचा पाळायचा व्यायाम करून घरात आले तेव्हा त्यांच्या चालीतून तो जाणवत होता. ते आत आले तेव्हा त्यांच्या घरचा फोन वाजत होता. ते आपल्या नेहमीच्या रुबाबदार चालीने दिवाणखान्यातील फोन जवळ गेले. “किती वेळ वाजतोय हा कुणास ठाऊक ? घरी काय माणसे नाहीत की काय ?” असे म्हणत त्यांनी फोन उचलला. “ मी रमेश जाधव बोलतोय ..” फोन कानाला लावत ते आपल्या नावाच्या उच्चारात रमेश यावर जास्त जोर देत म्हणाले.

ती जागा (भाग -२,गुढकथा )

लेखक Bhakti यांनी सोमवार, 04/01/2021 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
https://misalpav.com/node/48045(भाग -१) मग काही दिवस माहेरी राहून रमा पुन्हा त्याच घरी आली.आजूबाजूच्या बायका भेटायला आल्या.त्यातला एक म्हणाल्या “ही जागा भाड्याने गेली तेव्हाच आम्हांला आश्चर्य वाटलं...” “का?” रमाने प्रतीप्रश्न केला. “अग इथे एक जोडप राहायचं तुमच्यासारखच ..चांगल चालल होत.

Unsafe Roads : महाराष्ट्र

लेखक जिन्क्स यांनी सोमवार, 04/01/2021 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी काही कामा निमित्त रात्री एकटाच कार ने पुण्याहून सोलापूर कडे निघालो होतो. सोलापूर हायवे एकंदरीत पुण्यावरून निघणाऱ्या इतर महामार्गाच्या मनाने सूनसानच. त्यात पाटस गावाच्या पुढे तुरळक ट्रक ट्रॅफिक वगळता इतर वाहने फारच कमी. रात्री 11:30 च्या आसपास मळद गाव ओलांडल्यावर एका वळणाजवळ गाडी आली असता अचानक डाव्या बाजूने झाडीतून तूफान दगडफेक सुरू झाली. त्यातला एक दगड हेडलँपवर बसला आणि दुसरा बोनेटवर आदळला. दुसऱ्या दगडाच्या आघातामुळे गाडी डावीकडे रस्त्याच्या खाली उतरली. आरश्यातून मागे पाहिले असता 4-5 जण झाडीतून रस्त्यावर येताना दिसले.

लाक्कुंदी आणि दांडेली - भाग २

लेखक एक_वात्रट यांनी सोमवार, 04/01/2021 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस दुसरा: आजचा दिवस आमच्या सहलीतला एकूणच आराम दिवस होता. डंबलचे डोड्डाबसप्पा मंदिर आणि इटगीचे महादेव मंदिर पहाणे एवढेच आजचे आमचे काम होते. मला सहलीत हे असले दिवस जाम आवडतात. जर धावपळच करायची असेल तर मग सहलीला येण्यात काय हशील?
आरामात उठून अगदी सावकाश आम्ही आमचा नाश्ता उरकला आणि बाहेर पडलो. गदगपासून साधारण २२ किमी अंतरावर गदग-मुंदरगी रस्त्यापासून थोडे आत डंबलचे डोड्डाबसप्पा मंदिर आहे. वाटेत काही पवनचक्क्या दिसल्या, तेव्हा तिथे थांबून थोडी छायाचित्रे काढली आणि निघालो.

पुस्तकवेड्यांचं वेड

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 04/01/2021 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
गतवर्षी मार्च ते नोव्हेंबर हा काळ आरोग्य-दहशतीचा होता. त्याकाळात घराबाहेरील करमणूक जवळपास थांबली होती. साहित्य-सांस्कृतिक आघाडीवरही शांतता होती. त्यामुळे घरबसल्या जालावरील वावर जास्तच राहिला. तिथे चटपटीत वाचनखाद्याला तोटा नसतो, पण लवकरच तिथल्या तेच ते आणि प्रचारकी लेखनाचा कंटाळा येतो. आता काहीतरी सकस वाचले पाहिजे असे तीव्रतेने वाटत होते. साहित्यिक पुस्तकांची ऑनलाईन खरेदी मी अद्याप केलेली नाही, कारण मला त्याद्वारे पुस्तक निवडीचा निर्णय घेणे कठीण जाते. प्रत्यक्ष पुस्तक हातात घेऊन थोडेतरी चाळल्याशिवाय मी ते विकत घ्यायचे धाडस करीत नाही. डिसेंबरमध्ये सामाजिक वावर तसा वाढू लागला.

फिश टिक्का मसाला (व्हिडिओ सोबत)

लेखक मी_देव यांनी रविवार, 03/01/2021 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: फिश मॅरीनेट आणि फ्राय करण्यासाठी: फिश फिलेट ५०० ग्रॅम मीठ १/२ टिस्पून हळद १/२ टिस्पून लाल तिखट २ टिस्पून धणेपूड १ टिस्पून मिरपूड १/२ टिस्पून गरम मसाला १ टिस्पून आले लसूण पेस्ट २ टिस्पून लिंबाचा रस १ टेबलस्पून मोहरी तेल २ टेबलस्पून ग्रेव्हीसाठी: तेल १ टेबलस्पून बटर १ टेबलस्पून धणे १ टिस्पून जिरे १/२ टिस्पून कांदा १ मोठा किंवा २ लहान काजू १० ते १२ नग टोमॅटो १ तमालपत्र १ दालचिनी २ लहान तुकडे लवंगा २ आले लसूण पेस्ट १ टिस्पून काश्मिरी लाल तिखट १ टेबलस्पून गरम मसाला १ टिस्पून कसुरी मेथी १ टिस्पून कोथिंबीर मीठ चवीनुसार

मार्गशीर्ष व. ४ स्वामी श्रद्धानंद यांचा खून !

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 03/01/2021 11:46 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले ... स्वामी दयानंद शके १८४८ च्या मार्गशीर्ष व. ४ या दिवशी सुप्रसिद्ध गुरुकुल विश्वविद्यालयाचे संस्थापक व हिंदु समाजाच्या उपेक्षित भागाकडे लक्ष वेधविणारे थोर गृहस्थ स्वामी श्रद्धानंद यांचा अमानुषपणे खून झाला. स्वामींचा जन्म शके १७७८ मध्ये पंजाबांतील तळवण गांवी झाला. यांचे मूळचे नांव मुनशीराम असे होते.

मार्गशीर्ष व. १ रामचंद्र गणेशांचा प्राणत्याग!

लेखक Ashutosh badave यांनी रविवार, 03/01/2021 11:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... मार्गशीर्ष व. १ रामचंद्र गणेशांचा प्राणत्याग! शके १७०२ च्या मार्गशीर्ष व. १ रोजी मराठेशाहीतील सुप्रसिद्ध वीर रामचंद्र गणेश कानडे यांनी वज्रेश्वरीजवळ इंग्रजांशी लढता लढतां प्राणत्याग केला. या वेळी इंग्रजांनी वसई या महत्त्वाच्या ठाण्यावर हल्ला करून ते हस्तगत करण्याचा विचार केला होता. दोनतीन दिवसांपूर्वीच किल्ल्यावर तोफा डागल्या गेल्या होत्या. गॉडर्डनें वसई घेण्याचा निश्चय केला होता, अशा आणीबाणीच्या प्रसंगी नानांनी जुना कसलेला सेनापति रामचंद्र गणेश यास वसईस मदतीसाठी म्हणून पाठविले. रामचंद्र गणेश घाटांतून जात असतां इंग्रज सेनानी हार्टले व मुसा नारन यांनी त्याला अडविले.