Skip to main content

लागा चुनरी मे दाग..

लेखक चिनार यांनी शनिवार, 16/01/2021 21:31 या दिवशी प्रकाशित केले.
लागा चुनरी में दाग.. अनेक वर्षांपूर्वी घरात नविन टेपरेकॉर्डर आल्यावर मोहम्मद रफी, लतादीदी, आशाताई, मेहंदी हसन, गुलाम अली ह्यांच्या कॅसेट्सही लगोलग आल्यात. त्या वयात ह्या प्रभुतींचं गाणं ऐकल्यामुळे 'चांगलं' काय असतं ह्याची उमज येऊ लागली. कॅसेट्च्या त्याच संचात रुपकुमार राठोड ह्यांच्या गझल प्रोग्रॅमची एक कॅसेट होती. ती कॅसेट बाबा वारंवार लावायचे. वो रस्मे तोड के घर मेरे आने वाले है...

बेरी के बेर

लेखक Bhakti यांनी शनिवार, 16/01/2021 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
संक्रांती नंतर दुसऱ्या दिवशी किक्रांत असते.बच्चे कंपनीचा मुरमुरे,बोर,रेवड्या,चॉकलेट लयलुटीसाठी बोरनहाणसाठीचा दिवस असतो. आगगाडीच्या डब्यात बसल्यासारख एक घर झाल कि दुसर घर अस करत करत ५-६ घरी ह्या सोहळ्याची मौज होते.परीच्या घरी कन्येला घेऊन बोरनहाणसाठी गेले .परीभोवती सगळे बाल गोपाल गोलाकार जमले.काही नवखे तर काही तरबेज होते,एकमेकांना सांगत होते ..

ज्ञात अज्ञात पंढरपूर ८ लोकमान्य विद्यालय

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 16/01/2021 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
ज्ञात अज्ञात पंढरपूर ८ लोकमान्य विद्यालय साऱ्या पंढरपूरकरांना परिचित असणारी हि वास्तू आहे लोकमान्य विद्यालयाची. पुर्वीची हि मुख्य इमारत. मुळ इमारत. गावाच्या पुर्वोत्तर बाजूस नदिकाठावर जमिनीवर कमरे एवढ्या उंचीच्या जोत्यावर संपूर्ण २ मजली त्यावर १ खोली किंवा एकाच वर्गाचा तिसरा मजला अशी खाशा व्हिक्टोरियन कालखंडाच्या खुणा दर्शविणारे ब्रिटिश शैलीत बांधकाम असलेली बहु कमानींची दगडी आणि लाकडी वास्तु. आतले वर्गही प्रशस्त, भरपूर उजेड असणारे आणि हवेशीर असे आहेत. त्यातुन नदिकाठावर असल्याने नदीचा गार वारा सदैव वर्गात येत असतो.

आज काय घडले... पौष शु. ३ “मोगलांस कृपावंत झाले!"

लेखक Ashutosh badave यांनी शनिवार, 16/01/2021 08:11 या दिवशी प्रकाशित केले.
raghoba dada शके १६८२ च्या पौष शु. ३ रोजी राघोबादादा यांनी निजामशी उरळी येथे अप्रयोजक असा तह केला. पानपतच्या युद्धात मराठ्यांचा प्रचंड संहार झाला आणि कलिपुरुष राघोबादादा कचखाऊ निघाले. ही संधि निजामाने चांगलीच साधली. त्याने कारवाया सुरू करून मराठ्यांचे मुलूख घेण्यास आरंभ केला. 'अविंधानें लबाडी केली.

पायथॉन ह्या भाषेचा कोणी तज्ञ आहे का ? मदत हवी होती

लेखक सखाराम_गटण्या यांनी शुक्रवार, 15/01/2021 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
Extract vehicle registration numbers based on pattern(s). 3. Each number extracted from input file is fed to https://अबक. कॉम (Peform Free Car Check) 4. Compare the output returned by https://अबक. कॉम/ with the attached car_output.txt 5.

तुन्हा मन्हा जुगुमले...

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 15/01/2021 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे तुले मनावाले जास मी काकोळीतखाल तुन्हा भ्या मा खंगाईसन तुन्ही गोटना उगरा टोकले मी तुन्हामाच रवळी जास... मन्हाच रंगतवरी माले थापन देवानी मी कितली काकोळीत कई आनि मोर्‍हला उच्छाव येवानं आदुगरच मी व्हई गऊ घुमर्‍या तुनी पसरेल- आखडायेल कपारनी गौळ नादमा... मी घांगळी वाजी पाही पावरी वाजी पाही टापरा वाजी पाह्या चिमटा हालाई पाह्या तुन्ही थाळीना नाद आझुनबी आयकू येत नही मी रातभर घुमी र्‍हास...

आज काय घडले... पौष शु. २ श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म !

लेखक Ashutosh badave यांनी शुक्रवार, 15/01/2021 07:58 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... पौष शु. २ श्रीनृसिंहसरस्वतींचा जन्म ! चौदाव्या शतकांत पौष शु. २ या दिवशी दत्त सांप्रदायांतील प्रसिद्ध पुरुष श्रीनृसिंहसरस्वती यांचा जन्म झाला. शिव आणि विष्णु यांची उपासना एकरूपाने करणाऱ्या दत्त सांप्रदायाने महाराष्ट्रांत संस्कृती प्रसाराचे कार्य चांगलेच केले आहे. श्रीपाद श्रीवल्लभांच्या नंतर नृसिंहसरस्वतींचा अवतार झाला. श्रीपाद श्रीवल्लभांनी कुरवपुरास अंबिका नांवाच्या स्त्रीस आशीर्वाद दिला होता की, " पुढील जन्मी तुला अलौकिक पुत्र होईल." ही अंबिकादेवी मरणोत्तर व-हाडांत कारंजगांवी जन्मास आली.

उंदराचा डोह (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी गुरुवार, 14/01/2021 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
उंदरांचा डोह.. शाळा सुटल्या सुटल्या मी नदीकडे निघालो. हा माझा नित्य नेम होता. मी सहसा तो चुकवत नसे. सलग सात आठ तास शाळेत शिकवण्यामुळे, जो शीण अंगभर पसरलेला असतो, तो नदीवर जाऊन निवांतपणे व्यक्त करता येतो. नदीच्या वरच्या अंगाला एक ठिकाण होते. सहसा त्या ठिकाणी कोणी फिरकत नसे. का फिरकत नसे? हा विषय गौण आहे. कारण प्रत्येकाच्या धारणा वेगळ्या असतात. आता काही जणांचे म्हणणे होते की, ते ठिकाण चांगले नाही. तेथे अजब घडामोडी घडतात. तिथे कधी काहीही घडू शकते. प्रत्यक्षात तसा कोणाला काही अनुभव आला नव्हता. पण एखादा म्हणाला ती जागा चांगली नाही, की दुसराही तेच म्हणतो. मग तिसराही.

नुसतं हो म्हटलं म्हणून जुळत नसतं नातं..

लेखक प्राची अश्विनी यांनी गुरुवार, 14/01/2021 15:25 या दिवशी प्रकाशित केले.
नुसतं हो म्हटलं म्हणून जुळत नसतं नातं.. आखून दिल्या वाटेवर रुळत नसतं नातं.. माती हवी मायेची, अन् थोडं खारं पाणी, सुक्या कोरड्या मनामध्ये रुजत नसतं नातं.. जपलं नाही जीवापाड तर मुकं मुकं होतं.. शब्दाविना स्पर्शाविना फुलत नसतं नातं.. रागावून रुसून वरून गप्प बसलं तरी, हाकेसाठी एका, आत झुरत नसतं नातं? दिवस वर्षं सरतात, अगदी कोरडे होतात डोळे व्रण जरी भरले तरी बुजत नसतं नातं..