Skip to main content

कृष्णमयी.

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 28/01/2021 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णमयी ..... चकोर शाह ते टेकडीवरचे झाड पाहिलस? एकटच उभे आहे. कधी पासून माहीत नाही. मला आठवत तेंव्हापासून इथेच असतं .असंच आकाशाच्या कॅनवासवर सुकलेल्या फांद्यानी नक्षी उमटवत. याच्या फांद्याना हिरव्या गार पानांनी नटलेलं कधी पाहिलं नाही, की त्यावरची फळं तोडायला कुण्यामुलांन दगड मारलेला पाहिला नाही. नाही म्हणायला हिवाळ्यात कधितरी एखादा चुकार पतंग याच्या फांद्यात अडकतो. काही दिवस फडफडत रहातो.प्रेमात पडल्यासारखा फांदीला बिलगतो. इतका की झाडाला फुल आलंय असे वाटावे. एक दोन दिवसच. वारं आलं की तो पतंग सुटायची धडपड करतो. त्याच धपडडीत फडफडून फाटून जातो.

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 27/01/2021 18:39 या दिवशी प्रकाशित केले.

‘मी पाहिलेले-अनुभवलेले आखीव माधवनगर’.

1

मनातले माधवनगर -उत्सव-सण-वार...

१.गणेशोत्सव... माधवनगरातील कॉटन मिलमधे गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात असे. त्यात आरती-प्रसाद विसर्जन या भानगडीत न पडता आम्हा सवंगड्यांना त्यावेळचे खास आकर्षण असे ते दर शनिवारी ठेवल्या गेलेल्या विविध कार्यक्रमांचे. त्या काळात एकमेकांच्या घरी जाऊन गल्लीतील सगळे जण बसायला पटकुरं घेऊन रात्री आठ वाजल्यापासून घोळक्याने मिलच्या गेटपाशी रेटारेटी सहभागी होत, आत झुंडीने जात.

सासवड सायकल राईड( १० जानेवारी , २०२१ )

लेखक Chandrashekhar marathe यांनी बुधवार, 27/01/2021 17:27 या दिवशी प्रकाशित केले.
सासवड सायकल राईड( १० जानेवारी , २०२१ ) आज सकाळी पुण्यावरून सासवड सायकल राईड साठी निघालो आतापर्यंत दोन वेळा माझी सासवड राइड हुकली होती त्यामुळे या वेळी मात्र कोणतेही कारण न देता सासवड राईड करायचीच असे मी मनाशी ठरवले होते. काल दिवसभर खूप पाऊस पडल्यामुळे हवेमध्ये गारवा होता. पहाटे पाचला मी सुरुवात केली स्वारगेटच्या समोर एका ठिकाणी चहा घेतला, पुण्यात एक बरे आहे चौका चौकात चहाची अहोरात्र सोय असते. त्यानंतर कॅम्प, गोळीबार मैदान, AFMC कॉलेज, रेस कोर्स ग्राउंड मागे टाकत हडपसरला पोचलो तिथली हॉटेल अजूनही उघडली नव्हती त्यामुळे नाश्ता वगैरे काही मिळाला नाही.

तुम्हे अल्फाजों मे..... २

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 27/01/2021 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी कॉफीचा कप घेऊन येतो आणि म्हणतो. मी का आलो माहिती आहे? काल फोनवर विसरलो होतो. हॅलो म्हणायचं. ते सांगायला.... आज तेरी नजरों से नजरे मिलाने की इजाजत चाहता हुं जीनेसे पहले मरने की इजाजत चाहत हुं. ये मुमकीन नही के खामोंश चला जाऊं तुम्हे अल्फाजों मे बसाने की इजाजत चाहता हुं........ ..................... चकोर शाह.
मागील दुवा http://misalpav.com/node/48162 माझ्या कडे बघताना तुझे डोळे विस्फारतात. तू एक दीर्घ श्वास घेतेस आणि हसत सुटतेस. तू म्हणजे ना अस्सा आहेस म्हणत लटक्या रागाने माझ्या पाठीत एक गुद्दा घालतेस.