Skip to main content

आभाळमाया

लेखक सर्वसाक्षी यांनी शनिवार, 22/03/2008 16:11 या दिवशी प्रकाशित केले.
निसर्गा सारखा चित्रकार नाही! रोज तेच आकाश पण नव्या रुपात, नव्या रंगात रंगलेले दिसते. अनेकदा बघता बघता आकाश आपले रंग बदलत जाते आणि ती आभाळमाया बघता बघता आपणही रंगुन जातो. असाच एकदा कठड्यावर हात टेकुन क्षितिजाकडे पाहत उभा होतो. सुर्यास्ताला वेळ होता, मात्र सूर्य डोंगरापलिकडे गेला होता आणि त्याची प्रभा आकाशाला प्रकाशमान करत होती. अचानक वार्‍याबरोबर ढग जमले. काही फिके तर काही गडद, काही विरळ तर काही दाट. बघता बघता आकाश ढगांनी व्यापले. मोठे विहंगम दृश्य दिसत होते. डोंगराच्या बरोबर वरच्या अंगाला स्वच्छ निळे आकाश, पलिकडे दडलेला सूर्य अलिकडच्या ढगांना प्रकाशमान करत होता.

हिंदू..

लेखक विवेकवि यांनी शनिवार, 22/03/2008 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
माझे अवघे मी पण हिंदू आयुष्याचा कणकण हिंदू, ह्रदयामधले स्पंदन हिंदू तन-मन हिंदू, जीवन हिंदू ! दरीदरीतिल वारे हिंदू आकाशातिल तारे हिंदू, इथली जमीन, माती हिंदू सागर, सरिता गाती हिंदू ! धगधगणारी मशाल हिंदू आकाशाहुन विशाल हिंदू, सागरापरी अफाट हिंदू हिमालयाहुन विराट हिंदू ! तलवारीचे पाते हिंदू माणुसकीचे नाते हिंदू, अन्यायावर प्रहार हिंदू मानवतेचा विचार हिंदू ! महिला, बालक, जवान हिंदू खेड्यामधला किसान हिंदू, शहरांमधुनी फिरतो हिंदू नसानसांतुन झरतो हिंदू ! प्रत्येकाची भाषा हिंदू जात, धर्म अभिलाषा हिंदू तुकाराम अन कबीर हिंदू हरेक मस्जिद, मंदिर हिंदू ! इथला हरेक मानव हिंदू अवघी जनता अभिनव हिंदू, झ

भाषा मराठी..

लेखक विवेकवि यांनी शनिवार, 22/03/2008 15:23 या दिवशी प्रकाशित केले.
मला चा॑गले वाटले म्हणून येथे सादर करत आहे.. सरप॑चानी राग मानु नये..

मी..

लेखक विवेकवि यांनी शनिवार, 22/03/2008 15:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी आहेच असा मी आहेच असा मी आहेच असा मैत्री करणारा मैत्रिसाठी वाट्टेल ते करणारा प्रत्येक मित्राचा विश्वास जपनारा आयुष्यभर घट्ट मैत्रिची साथ निभावनारा मी आहेच असा सतत बोलनारा मित्राना नको ते प्रश्न विचारनारा प्रश्न विचारुन त्याना सतवनारा उत्तरे संग म्हणुन तगादा लावणारा मी आहेच असा मस्त जगनारा सदानाकदा स्वप्नामद्ये रमनारा आपल्यातच आपलपन जपनारा पण इतरांच्या आनंदासाठी स्वतालाही विसरनारा मी आहेच असा मनासारख जगनारा यशाचे शिखर चदताना हाथ देणारा अपयशाचे घाव सोसताना सांत्वन करणारा सुखाच्या रस्त्यावरून जाताना आयुष्य सजवनारा मी आहेच असा सर्वांच ऐकनारा आई वडील याना देव माननारा त्यांचावर जास्त विश्वास ठ

'सेने'तिल काटे...

लेखक चतुरंग यांनी शनिवार, 22/03/2008 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा कवी 'अनिल'यांचे 'वाटेवर काटे..'हे अप्रतिम गीत. (स्वरबद्ध केलंय आपल्या अजरामर आवाजात पं.वसंतराव देशपांडे यांनी!) 'सेने'तिल काटे बोचून धावलो वाटले फुला परि कुजून चाललो जमवुनि 'मन'चेहि कधी, तोच 'हात' फेरूनि कधी आपुलीच मुंबापुरि म्हणत चाललो 'उत्तरे' प्रमाद होत!

मोगरा फुलला...

लेखक दिनेश५७ यांनी शुक्रवार, 21/03/2008 23:44 या दिवशी प्रकाशित केले.
मोगरा फुलला... आपल्या गावाच्या मातीशी असलेलं नातं जपण्यासाठी आणि त्या नात्याचं कृण फेडण्यासाठी मुंबईत कारकुनी आणि सफाईकाम करणार्‍या चाकरमान्यांनी बघितलेलं गावच्या विकासाचं स्वप्नं साकारतं आणि गावकुसाच्या कितीतरी बाहेर, मुंबैची जीवनरेषा असलेल्या रेल्वेलायनीलगत एका इमारतीबाहेरच्या मलूल मातीत रुजलेला एक वेल बघताबघता फोफावत जातो... तो विस्तारतो आणि त्याला कृतकृत्यतेचा बहरही येतो... त्या बहराचा सुगंध आसमंत भारून टाकतो आणि त्यानं झपाटलेल्यांची एक शोधयात्रा सुरू होते... आसपासच्या अनोळखी कोलाहलात, ओळखीचा, आपलासा वाटणारा सूर कानावर पडला, की आपलेपणाच्या, जवळीकीच्या जाणीवा अशाच फुलतात...

'होळी'ची 'होली'

लेखक भोचक यांनी शुक्रवार, 21/03/2008 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
उत्तर भारतीयांपुढे स्पष्टपणे सांगायचं तर हिंदी भाषिकांपुढे मराठी लोटांगणाचे आणखी आणखी एक उदाहरण. आपल्याकडे होळी वेगळी. त्यानंतर धुळवड आणि मग रंगपंचमी असते. होळीच्या दिवशी रंग खेळत नाही. धुळवडीला विशेषकरून फक्त मुंबईत रंग खेळला जातो. उर्वरित महाराष्ट्रात रंगपंचमीलाच रंग खेळला जातो. पण आता होळीलाच रंगपंचमी साजरी करण्याची 'उत्तर भारतीय' परंपरा आपल्या महाराष्ट्रातही रूजू झाली आहे. त्यामुळे होळीची 'होली' झालीय. वास्तविक आपल्याकडे होळीचा अर्थ जाळणे असा आहे, तोच शब्द उत्तर भारतात रंगांशी संबंधित आहे. 'रंगो की होली' तिकडे असते. आपल्याकडे कागदपत्रांची 'होळी' होते.

जोक

लेखक सत्या यांनी शुक्रवार, 21/03/2008 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
टीचर्-'A' for? स्टूडण्ट्-ऐपल टीचर्-जोर से बोलो. स्टूडण्ट्-जय माताजी

काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी

लेखक ॐकार यांनी शुक्रवार, 21/03/2008 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
काटा रुते कुणाला, बोंबील खाती कोणी शिक्षा जिभेस माझ्या भर श्रावणात आहे सांगू कशी कुणाला चव मस्त बांगड्याची? उसळी, फळे, दूधाचा मज शाप, जाच आहे ! काही गिळू पहातो स्मरतो उपास तेव्हा मऊभात पचवणेही विपरीत होत आहे ! उचक्या,ढेकरा की, काहीच आकळेना भुरकून सोलकढी मी एकभुक्त आहे ! मूळ, काटा, बाटा, आणि कविता सुचे यांवरून प्रेरित.