शरद पवारांच्या आवाहनात तथ्य किती?
मला राजकारणातील जास्त कळत नाही. पण एक सामान्य नागरिक म्हणून जे काही माहीत आहे त्यावरून पुढील विवेचन..
शेतकर्यांना भाव मिळत असताना महागाईचा बाऊ नको असे शरद पवार म्हणाले. (पहा बातमी)
स्वत:ला काही करणे जमले नाही किंवा काही करायचे नसले तर अशी विधाने बाहेर निघतात का?
त्यांच्या म्हणण्याप्रमाणे शेतकर्याला खरच भाव मिळत असल्याचे त्यांना दिसत आहे का? मला नाही तसे वाटत. शेतकर्यांना कमी भाव मिळतो. तो माल बाहेर ग्राहकापर्यंत येता येता त्याचा भाव खूप वाढतो असेच दिसते.
भाषा आणि प्रमाण
गेल्या काही दिवसांपासून(ण) मिसळपाव वर शुद्धलेखन(ण) आणि(न) प्रमाण(न) भाषेचा जयघोष चालला आहे. काय आहे हो ही प्रमाण(न) भाषा? प्रमाण कशासाठी हवं? आणि प्रमाणा(ना)चं प्रमाण किती असावं?
'चामुंडराये करविले' श्रावणबेळगोळच्या (हे कर्नाटकात आहे) गोमटेश्वराच्या पायाशी दगडात कोरलेलं पहिलं मराठी वाक्य. त्याकाळी मराठीला प्राकृत म्हणत असत. त्यानंतर आमच्या अमृतातेही पैजा जिंकणार्या मराठीत 'ज्ञानेश्वरी' लिहिल्या गेली. सुरुवातीला मराठीत पद्य रचनाच लिहिल्या जायच्या. लिहायला कमी जागा, गेयता असल्यामुळे सहज मुखोद्गत होत असत आणि सहज प्रसार होई.
(वाटले बरे किती)
आमची प्रेरणा चित्त यांची अप्रतिम गझल वाटले बरे किती
एक अशीही केस...
काळा असल्यावर
सर्वांनाच आवडतो
पांढ-याच्या नशीबात
बायकोचाही नसतो
हे क्रांतिकारकांनो!
हे क्रांतिकारकांनो,
बरं झालं तुम्हीच क्रांतिकारक झाला
देशासाठी आता वेळ आहे कुणाला?
बरं झालं तुम्हीच देशासाठी लढला
खाणं, पिणं, मौजमजेला वेळ आम्हाला दिला
बरं झालं तुम्ही रक्त, मांस सांडलं
प्रत्येकानं आपापलं घर त्यावर बांधलं
बरं झालं तुम्ही चलेजाव म्हटलं
संस्कार नि संस्कृतीला सहज आम्ही सोडलं
बरं झालं तुम्ही तिरंगा फडकाविला
प्रत्येकानं आपापला रंग वेगळा निवडला
बरं झालं तुम्ही वेळीच शहीद झाला
खुर्चीसाठी भांडायला चान्स आम्हाला दिला
चू.भू.दे.घे.
दंव
दंव
ग्रीष्मातली पानगळ बघून
पहाटे पहाटे देव रडला
त्याचा आसवांचा सडा
पाना-फुलांवर अलगद् पडला
माणूस.....इतका भावनाशून्य
कसा कांय देवाकडून घडला?
अश्रू ओळखेनात देवाचे?
म्हणे केव्ह्ढा हा"दंव" पडला !
--------------------------------------------------
उदय गंगाधर सप्रे-ठाणे
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com
आणि
कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/
गजरा.....
गजरा.....
लांब केसांची वेणी उदास वाटते
केसांत फुलं माळ ग जरा
"चेहृयामागेही सौंदर्य आहे !"
डोकावून हळूच सांगेल गजरा
उदय गंगाधर सप्रे-ठाणे
कलास्वाद : http://uday-saprem.blogspot.com
आणि
कवितांजली : http://uday-sapre.blogspot.com/
मिसळपाव