Skip to main content

मजेशीर शब्द

लेखक आर्य यांनी शुक्रवार, 30/05/2008 18:48 या दिवशी प्रकाशित केले.
आज काल भाषाशुद्धी-शुद्धलेखन या आणि अशा बर्‍याच विषयांवर बराच काथ्याकुट करुन झाला आहे. शब्दकोश हा धनकोशापेक्षा वेगळाच आहे! तो वापरल्याने मोठा होतो आणि नुसताच ठेवून दिला तर त्याचा र्‍ह्सा होतो, हाच धागा पकडून ऐक नविन चर्चा पुढे चालू करु. मिपावर फक्त पश्चिम महाराष्ट्रातले नसून जगातल्या विविध भागातले सदस्य आहेत / गेलेत. चला तर मग आपला शब्द संग्रह वाढवूया.

इन्फोसिस कँपस

लेखक आनंद घारे यांनी शुक्रवार, 30/05/2008 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
मैसूर हे एक प्राचीन शहर आहे. महिष्मती, महिषावती वगैरे नांवाने या नगरीचा उल्लेख पुराणात होतो असे म्हणतात. इतिहासकाळात तर त्याला महत्व होतेच. पण हे शहर जुन्या काळातील आठवणीत गुंतून पडलेले नाही. ते नेहमी काळाच्या ओघाबरोबर किंवा एकादे पाऊल पुढेच राहिले आहे. एकविसाव्या शतकात माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात महत्वाची कामगिरी करण्यासाठी ते सज्ज होत आहे याची साक्ष येथील इन्फोसिसचा कँपस पाहिल्यावर मिळते. शहराच्या वेशीवर असलेल्या हेब्बाळ परिसरात इन्फोसिसने आपले एक आगळेच विश्व उभे केले आहे. त्याचा विस्तार करायला भरपूर वावही ठेवला आहे.

सेल मांडीयेला

लेखक अरुण मनोहर यांनी शुक्रवार, 30/05/2008 07:26 या दिवशी प्रकाशित केले.
सेल मांडीयेला सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे विचार विवेक,................गेला पालटूनी विचार विवेक,................गेला पालटूनी एकमेका सांगतील घेई रे सेल मांडीयेला,...............थैल्या घेउन हाती धावती ग्राहक भाई रे..........................|धृ| होतो गाजा फार,................खर्चती तत्पर कापले पार ह्यांचे खिसे रे फुका गेती माल,.................पडला बेकार फुका गेती माल,.................पडला बेकार गीफ्टला समजुनी फ्री जणू रे

(आसपास)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 30/05/2008 03:42 या दिवशी प्रकाशित केले.
सुंदर 'खयाली पुलाव' पकवणार्‍या संजोपरावांचा हा असा 'आसपास' वावर बघून आम्हाला काही कळेनासे झाले की हे असे अचानक का व्हावे? आणि त्या स्तंभितावस्थेतच विडंबन आमच्या 'आसपास' भटकून गेले!

सत्यशोध(एक छोटिशी गोष्ट)

लेखक मन यांनी शुक्रवार, 30/05/2008 03:31 या दिवशी प्रकाशित केले.
नुकतीच पहाट झाली होती. शांत वातावरण थंड हवा होती. आईनं हलकेच त्याला उठवल. तो उठला.बालक उमललं.गोंडस गोबर्‍या चेहर्‍यावर त्यानं पाणी मारलं. आन्हिकं उरकली . केस चापुन्-चोपुन लावले भांग पाडला. आईला त्यानं 'टाटा' केलं हातात सत्य घेतलं आणि शाळेसाठी म्हणुन निघाला, गाणी म्हणत, आपल्याच नादात गुणगुणत. अगदि आनंदात आणि "स्व" च्छंदात. मूर्तिमंत ते बालपणच होतं , निरागसता होती ती निसर्गात उमललेली. आनंदात बागडत चिखलात,कमळावर उड्या मारत,रस्त्यात आवडेल त्या फुलाला हात लावुन पहात तो बालक निघाला. त्या निरागसतेत स्वच्छ-अस्वच्छ गोष्टीच नव्हत्या.

एक महाराज म्हणतो...

लेखक मयुरयेलपले यांनी शुक्रवार, 30/05/2008 01:53 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळ गुरुवार २९ मे २००८ पान ३
हिंदु मुलांनी मुस्लिम, ख्रिश्चन मुलिंशी विवाह करावा- आचार्य धर्मेन्द्र महाराज...
अन्य धर्मीय लोक हिंदु मुलींना फूस लावून त्यांच्याशी विवाह करतात. त्यामुले हिंदुंची लोकसंख्या कमी होत आहे. हे एक षडयंत्र आसुण, ते जनिवपुर्वक मुस्लिम व अन्य धर्मातील लोक करीत आहेत.

आसपास

लेखक सन्जोप राव यांनी गुरुवार, 29/05/2008 22:12 या दिवशी प्रकाशित केले.
उघडा खिडक्या, तोडा बेड्या, गर्जुनि शिणले काही अबोल सत्ता क्रांतीलाही तेंव्हा बधली नाही पान वेगळे मांडुनि बसता प्यादे घोडे हसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गंजकुर्‍हाडी बोलु लागल्या बाह्या सरसावोनी शुष्कपुष्पही मधेच फुलले सुकता सुकता सुकुनी पाठ खाजवुनी एकमेकाची तळवे सुजुनी बसले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले जरा चांदोबा, पुल जरासे, ऐसी सजली स्वप्ने भाषेचे जणु मढे सजवुनी लावा त्याला उटणे अक्षरशत्रू बनुनी जेंव्हा काव्यगुरु नाचले करु पाहिले दैवत आणिक तर्कट होऊन बसले गुलाल फेका, भले बहाद्दर, जिंकलास तू गड्या जुळले अपुले सूर, पिपाण्या ताशे अन चौघड्या दुज्या सुरांचे, हाणा त्याला, को
Taxonomy upgrade extras

जगाच्या शिखरावर ५५ वर्षांपूर्वी!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 29/05/2008 22:09 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या जीवघेण्या चढणीवर मरणाची दमछाक करणार्‍या, कोरडी ठकठकीत हवा असलेल्या, ढगातून डोके वर काढणार्‍या त्या ८८५० मीटर उंचीच्या शिखरावर सकाळी ११.३० वाजता पाय ठेवला आणि नेपाळी शेर्पा तेनझिंग नोर्गे न्यूझीलंडवासी सर एडमंड हिलरी हे जगातले पहिले एवरेस्ट विजेते ठरले, तोच हा दिवस २९ मे! आज त्या घटनेला ५५ वर्षे होऊन गेली. २९ मे १९५३ नंतर आजपावेतो ६३ देशातल्या १२०० पेक्षा जस्त गिर्यारोहकांनी हे अव्हान समर्थपणे पेलले आहे. काहींनी आपला जीव गमावला आहे.