Skip to main content

बुद्धीबळ खेळणारे यंत्र!

लेखक चतुरंग यांनी गुरुवार, 12/06/2008 10:39 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या संपूर्ण बुद्धिबळ कारकीर्दीत फक्त ३६ डाव हरलेल्या आणि सातत्याने आठ वर्षे अपराजित राहिलेल्या माणसाला 'बुद्धिबळ खेळणारे यंत्र' असा किताब मिळाला नसता तरच नवल. बुद्धिबळातला चमत्कार असं ज्याचं वर्णन केलं जातं त्या होजे राऊल कॅपाब्लांका बद्दलच मी बोलतोय. १८८८ मधे दक्षिण अमेरिकेतल्या क्यूबा ह्या देशात जन्मलेल्या होजेचे बुद्धिबळाचे प्राथमिक शिक्षण घरातच वडिलांशी खेळताना झाले. चार वर्षाच्या कापाने वडिलांना घोड्याची एक अयोग्य खेळी करुन त्याला फसवताना पकडले आणि त्यांनी नेमका काय प्रकार केला ते त्यांना नीट समजावून सांगितले!

पुपुर्झा

लेखक पुष्कराज यांनी गुरुवार, 12/06/2008 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
कधीतरी कोणीतरी आपल्या मनात घर करत,कायमचा निवारा नसेलही तो,पण काही काळ तरी आपल मन तिथ रमलेल असत, मनाला वेड लावणारे हे क्षण, रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात असाही निवांतपणा हवाच ना

शिल्पकार गुरू आणि मास्तरांची शिल्पकला..

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 12/06/2008 09:27 या दिवशी प्रकाशित केले.
झालं काय, आमच्या एका नाटकासाठी एक नाटकात काम करणार्‍या कलाकारासारखा दिसणारा पुतळा हवा होता... आता हे म्हणजे जरा अवघडच झालं.. चित्राबित्राचं जमलं असतं पण शिल्प तेही हुबेहूब तसं दिसणारं म्हणजे काय करावं बरं, अशा विचारातच होतो..तेव्हा कळलं , आपल्याच भागात एक शिल्पकार राहतात, ते हे करून देऊ शकतील... ते शाडूच्या मातीपासून प्लास्टर मोल्डिंग पद्धतीने प्लास्टर शिल्प बनवणार होते.. पण त्यांना एका असिस्टंटची गरज होती.. मग काय हो, मी तर आनंदानं बनलो त्यांचा असिस्टंट... ( असल्या गोष्टी इतर कुठे आम्हाला लवकर शिकायला मिळणार?)... . .. हे आमचे गुरू शिल्पकार चंद्रशेखर जोशी...

नाती

लेखक एककिनारा यांनी गुरुवार, 12/06/2008 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
कधितरी मनात उगच विचार येउन जातो,ख्ररच कोनी असत का कुनाच की नाती फक्त मानायला असतात?

**** इंडीया-दी वन नेशन आणि धार्मीक, जातीय व प्रादेशिक अस्मिता ****

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 12/06/2008 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
गेले काही दिवस मी अविनाश धर्माधिकारींचे "अस्वस्थ दशकाची डायरी" नावाचे एक अतिशय जबरदस्त पुस्तक वाचत होतो. आज ते पुस्तक संपुर्णपणे वाचुन, समजून व पचवून पुर्ण झाले. साधरणता १९८० ते १९९० च्या दशकातल्या देशाच्या सुरक्षेला धोकादायक घटना, सामाजीक आंदोलने, राजकीय उलथापालथ व या सर्वात सामान्य माणसाचा सहभाग ह्या सर्व बाबींचा अभ्यास धर्माधिकारींनी आपल्या नजरेतुन व जवळपास स्वत: त्या घटना जवळून पाहून अतिशय समर्पक पद्धतीने केला आहे.

तुझ्या घरासमोरचा रस्ता...

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 11/06/2008 20:41 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्या घरासमोरचा रस्ता, अजून तसाच वळतो का गं? कोपर्‍यावरचा गुलमोहर, अजून तसाच जळतो का गं? तसाच आहे का गं अजून, नदीकाठचा काळा पत्थर? हात हातात घेता क्षणीच, सूर्य तसाच ढळतो का गं? डोळ्यामध्ये डोळे गुंफून, बसत होतो तासन्‌तास न बोलता अजून तुला, अर्थ तसाच कळतो का गं? पार आणखी पिंपळ तिथला, अजून आहे तसाच तेथे? मनात येता उत्कट काही, तसाच तो सळसळतो का गं? वरवर सारे सुंदर तरीही, उरात काही सलते अजूनी असेच काही आठवून, वेडे, जीव तुझा हळहळतो का गं? -अविनाश ओगले

मराठी कलाकारांनी दिल्ली दणाणून सोडली!

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 11/06/2008 20:38 या दिवशी प्रकाशित केले.
५४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमधे मराठी कलाकारांनी आपली ठसठशीत मोहोर उमटवली. वाचा सविस्तर बातमी इ-सकाळला. मधुर भांडारकर, दिलिप प्रभावळकर, स्वानंद किरकिरे, अमोल पालेकर, नीना कुलकर्णी, आरती अंकलीकर, अशोक पत्की, अनिल पलांडे इ. प्रतिभाशाली मराठी कलाकारांचे हार्दिक अभिनंदन!! चतुरंग

भोजशाळा ते भोजपूर - एक विषण्ण प्रवास

लेखक भोचक यांनी बुधवार, 11/06/2008 19:16 या दिवशी प्रकाशित केले.
'कहॉं राज भोज और कहॉं गंगू तेली' या म्हणीतून राजा भोज भेटला होता. तसाच तो 'राजा भोजच्या गोष्टी'तूनही लहानपणीच भेटला होता. पण त्याचा महिमा पाहण्याची संधी मिळाली नव्हती. इंदूरला आल्याच्या निमित्ताने ती मिळाली. आमचे घरमालक ज्या क्षत्रिय समाजाचे आहेत. त्याच समाजाचा राजा भोज होता. त्यांच्याकडून एक पुस्तक मिळालं. त्यात त्याचा सगळा इतिहास दिला होता. दहाव्या शतकापर्यंत भोजाचे साम्राज्य मध्यभारतात पसरले होते. भोज नावाचे अनेक राजे होते. एका राजाचा तर लढाईत मृत्यू झाला होता. त्याच्याविषयीची अशी वेगवेगळी माहिती असली तरी राजा भोज म्हणून जो उल्लेखला जातो, तो कमालीचा कलासक्त होता. विविध विद्यात पारंगत होता.

मक्‍याचा खरवस

लेखक योगिता_ताई यांनी बुधवार, 11/06/2008 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - एक वाटी मक्‍याचे दाणे, अर्धी वाटी दूध, अर्धी वाटी बारीक केलेला गूळ, वेलचीपूड, केशर. कृती - मक्‍याचे दाणे व दूध एकत्र मिक्‍सरमधून वाटून घ्यावे. त्यात गूळ विरघळवून घ्यावा. वेलचीपूड व केशर घालावे. एरवी खरवसासाठी चीक उकडून घेतो त्याप्रमाणे शिटी न लावता कुकरमध्ये उकडून घ्यावे. गार झाल्यावर वड्या कापाव्यात. सध्या जवळजवळ वर्षभर स्वीटकॉर्न उपलब्ध असल्याने झटपट करता येण्याजोगा हा पदार्थ आहे. लहान मुलांनाही आवडेल.