आपली मराठी चालली हो-----परदेशी.
आजच पेपरात ही बातमी वाचली आणि (नसलेले)डोके अधिकच बधीर झाले.८२वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सानफ्रान्सिसकोला भरणार आहे,असा निर्णय सोळा सदस्यांच्या़ कमिटीने घेतला आहे्. हे सदस्य कोण आहेत,किती विरोधी मतदान झाले वगैरे तपशील सां गितले गेले नाहीत याचाच अर्थ काहीतरी गोलमाल आहे.दुसरे असे की संमेलने ही 'बहुजन हिताय,बहुजन सुखाय'भरवायची असतात.अमेरीकेत असे कितीसे मराठी हया संमेलनास हजर राहू शकतील?अमेरीकेत ५ दिवस राहण्याच खर्च ७० ते७५ हजार रु.येणार,आपल्याकडील कितीजण हा खर्च करु शकतील?
मिसळपाव