Skip to main content

असूनी दोस्त करितो दुष्मनी

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 05/08/2008 22:04 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--समीर) केला आहे दुष्टपणा दुष्टानी केले तरी कुठे कमी दोस्तानी येतो काळ आसाही जीवनी असूनी दोस्त करितो दुष्मनी लागे दोस्तीला कुणाची नजर बदल होता तुला नसे ती खबर नाही राहिल्या आणा अन शपथा साथ साथ मरण्याचा एकही इरादा दौलतीला राहती सर्वस्व मानूनी येतो काळ आसाही जीवनी असूनी दोस्त करितो दुष्मनी प्रीतिचा लवलेश नसे तुझ्या नयनी मित्र होऊनी अर्थ मैत्रीचा घे समजूनी दौलत कसली कसली दोस्ती नाती गोती सर्वच नावा पुरती पश्चातापे जे होईल ते अनुभवूनी सच्चाईचा मार्ग ही अंगिकारूनी असूनी दोस्त करितो दुष्मनी श्रीकृष्ण सामंत

उपासाची भजी

लेखक श्रीयुत संतोष जोशी यांनी मंगळवार, 05/08/2008 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य : ४/६ अळकुड्या ; शिंगाडा पीठ ; हिरव्या मिरचीचा ठेचा ; मीठ ; जीरा पावडर ; पाणी ; तळणाकरीता तूप. कृती : अळकुड्या सोलून त्याचे त्रिकोणी तुकडे करून घ्यावे.ते लगेच मीठाच्या पाण्यात ठेवावे नाही तर बुळबुळीत होतात. शिंगाडयाच्या पीठात हिरव्या मिरचीचा ठेचा , चवीपुरते मीठ आणि जीरा पावडर घालून जरा पातळसरच भिजवावे. तूप तापवून मंद आचेवर अळकुड्यांचे तुकडे पीठामधे बुडवून सोडावे. चांगला लालसर रंग येईपर्यंत तळावे.गरम गरम खाण्यातच मजा आहे. अळकुड्या शिजवून घेतल्या तरी चालतील पण मग त्याचे काप करून त्याला पीठ जरा जाड भिजवावे लागेल.

नविन विनोद सदरा बाबत

लेखक सुबक ठेन्गनी यांनी मंगळवार, 05/08/2008 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
नविन विनोद सदरा बाबत मगाशि आलेल्या विनोदावर वर्तमान पत्रातला विनोद म्हनुन टिका केलि गेलि आणि नन्तर ते पान गायब केले.. त्यावर लोकानि टिका केल्या... मला वाटते प्रत्येक विनोद कुठे ना कुठे वाचलेला असतो.. ज्यानि टिका केल्या त्यानि पण विनोद सादर केले आहेत...ते त्यानि कुठे ना कुठे वाचलेले असतिल.. कि त्यानि आपल्या सुपिक डोक्यातुन आलेले विनोद सादर केले ? तर हे असे का केले याचे उत्तर मिलावे.... आपलि हि वेब साइट लोक मनोरजनासाठि आहे.. हेतु साध्य व्हावा हि अपेक्श्या

मालवुन टाक दीप... ई -डंबन

लेखक बेचवसुमार यांनी मंगळवार, 05/08/2008 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
ती "मूड" मध्ये असताना आणि तो मूड मध्ये नसताना"मालवुन टाक दीप"..आणि ती "मूड"मध्ये नसेल तर... (स्व.सुरेश भटांची माफी मागुन...) ---------------------------------------------------------------- मालवू नकोस दीप..चेतवू नकोस अंग.. बंद ठेव राजसा..तुझे "पिसाट" रंगढंग..
होऊनि जरा निवांत..बैस आज धूळखात..
टाक मोडुनी उद्या..रे खुशाल तू पलंग..
दूर दूर तारकांत..दातओठ खातखात.. पछाडतोय चांदण्यांस..दुष्ट चंद्र जंगजंग..
ते तुला बरे कळेल..फक्त तुझेच रे जळेल..
स्व

बत्तीस शिराळा - नागपंचमी

लेखक अमोल केळकर यांनी मंगळवार, 05/08/2008 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
बत्तीस शिराळा सांगली जिल्हाच्या पश्चिमेला असलेल्या वाळवा तालुक्यातील हे खेडे गाव नागपंचमीच्या उत्सवासाठी प्रसिध्द होते. काळाच्या ओघात काही अनिष्ट पध्द्ती बंद करत असताना बत्तीस शिराळ्यातील एक वैशिष्ठपुर्ण उत्सवाची पार रया गेली आहे. पुणे - बेंगलोर महामार्गावर कोल्हापुर कडे जाताना, पेठ नाका ( इस्लामपुर ) पासुन उजव्या बाजुला एक फाटा फुटतो. इथुन साधारण २० कि.मी वर बत्तीस शिराळा वसलेले आहे. सांगली जिल्हातील हा एकमेव प्रदेश जो निसर्गाने समृध्द आहे. बत्तीस शिराळ्या पासुन जवळच चांदोली अभयआरण्य, चांदोली धरण आहे.

आंबट-गोड नाती

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 05/08/2008 16:49 या दिवशी प्रकाशित केले.
आंबट-गोड नाती . चिंचेचा आकडा गं.. शेपटावाणी वाकडा गं.. चिंचेचा आकडा.. वाकडा गं.. पेरा-पेरात गाठी गं.. चिंचोक्या बाटी गं.. पेरा-पेरात गाठी.. बाटी गं.. आकड्याची गोडी गं.. पोरं यडी-खुळी गं.. आकड्याची गोडी.. खुळी गं.. जिभेला हुळहूळ गं.. खाताना कळ गं.. जिभेला हुळहूळ.. कळ गं.. चिंच आंबट-गोड गं.. भली-बुरी चव गं.. चिंच आंबट-गोड.. चवीला गं.. चिंचेचा आकडा.. वाकडा गं.. पेरा-पेरात गाठी.. बाटी गं.. चिंचजशी आंबट-गोड नाती गं.. ===================== स्वाती फडणीस............. ०५-०८-२००८

जत्रा..!

लेखक उपटसुंभ यांनी मंगळवार, 05/08/2008 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
अविनाश ओगले यांच्या "जत्रा" या सुंदर गझलेचे विडंबन... ओगले साहेब क्षमा असावी..! ("वधूवर मेळावा" नावाच्या जत्रेला) उपवर वधू वरांच्या करतात येथ जत्रा. दोनास चार करण्या भरतात येथ जत्रा. नजरा कुमारिकांच्या ठरतात जीवघेण्या, वेठीस बिज्वरांना धरतात येथ जत्रा. झाले ठिकाण जत्रा चेहरे न्याहाळण्याचे. चिरडून सर्व हृदये सरतात येथ जत्रा. वरबाप ना दयाळू हुंड्यास का कठोर, प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा. आता पुढील वर्षी पुन्हा नवीन आशा. स्वर्गातल्याच गाठी स्मरतात येथ जत्रा ? -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

(जत्रा)

लेखक केशवटुकार यांनी मंगळवार, 05/08/2008 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
आजची टुकारी ओगल्यांची जत्रा. टुकारी करायच्या आधी सर्किटरावांच्या या इनिशिएटिव्ह ने प्रभावित झालो (जत्रा) जाल कविकिरडुंच्या करतात येथ जत्रा पडतात विडंबने तरी भरतात येथ जत्रा ओझे संमेलनांचे ठरतेय जीवघेणे वेठीस जालनिश्यांना धरतात येथ जत्रा ती कला का दयाळू झाली अशी कठोर? प्रश्नांसमोर असल्या हरतात येथ जत्रा आल्या भरुन संत्रा, देशी आणि विदेशी मारुन फक्त गप्पा सरतात येथ जत्रा आता पुढील शहरी पुन्हा नवीन ठाल्या चंद्रावरी कधीतर भरतील येथ जत्रा. -केशवटुकार

नको बागेत येऊस

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 05/08/2008 07:40 या दिवशी प्रकाशित केले.
(अनुवादीत. कवी--अनामिक) केशभार असा सोडून नको बागेत येऊस फुलांच्या सावल्यांना नको लज्जीत करूस प्रेमाचे गुणगान नको तू ही गाऊस गीताचे भ्रमराकडून नको हंसे करून घेऊस प्रेमाचे भ्रमराला असे कसले ज्ञान मी काय सांगू? कळ्यानांच तू विचार लफंगा असे हा भूंगा शिकवील तो मग तुला त्याचीच नकली कला अन घेशील नंतर तूं माझाच पंगा शोभे न तुला हे असे बोलणे पावित्र्य प्रेमाचे असे विटवीणे देशी का मज तू साथ तिथे हे क्षीतज जिथे पूरे पूर्ण झुकते येईन मी ही तुझ्या संगती नको वाटेत होऊस तू कधी वेगळा प्रेम आपुले पाही हा जमाना सगळा श्रीकृष्ण सामंत

चाहूल

लेखक अनिरुद्ध अभ्यंकर यांनी मंगळवार, 05/08/2008 03:09 या दिवशी प्रकाशित केले.
हळूवार तुझे पाऊल मला चाहूल तरीही उराशी होईल पहाट नको जाऊस थांब जराशी उतरो न कधी ही धुंद श्वासात गंध रात्रीचा हा असाच चालो नसा नसात उत्सव प्रीतीचा आकंठ बुडूदे डोळ्यात तुझ्या देहात मला खोल ते खुजे लाजरे शब्द नको स्पर्शाने बोल हे स्वप्न जरी वाटे कशास खोटे बोलू तुझ्याशी ठेवलीत जपून मी फुले सापडलेली उशाशी - अनिरुद्ध अभ्यंकर