Skip to main content

"खेळ खेळूया सारे आपण"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 27/08/2008 10:56 या दिवशी प्रकाशित केले.
आज खूप दिवसानी प्रो.देसाई तळ्यावर भेटले.बरेच दिवस मी एकटाच तळ्यावर फिरायला जायचो.भाऊसाहेब आपल्या मुलाकडे काही दिवस राहयाला गेले होते ते मला त्यांच्या मुलीकडून कळलं होतं. मला म्हणाले, "संध्याकाळची मी तुमची खूप आठवण काढायचो.मुलाच्या घरी सुद्धा फिरायला खूप जागा आहे,पार्क्स आहेत पण असं तळं नाही." मी म्हणालो, "भाऊसाहेब,तुमच्या गैरहजेरीत मी काही कविता केल्या आहेत.पुढल्या खेपेला मी तुम्हाला वाचून दाखवीन." भाऊसाहेब म्हणाले, "आज मला तुम्हाला माझ्या लहानपणाची एक गमतीदार गोष्ट सांगायची आहे. ज्याची मी तुम्हाला गोष्ट सांगणार आहे तो गृहस्थ अलिकडेच मला एका दुकानात भेटला होता.प्रथम मी त्याला ओळखलं नाही.सहाजी

मुक्तसुनित ना शुभेच्छा!

लेखक प्राजु यांनी बुधवार, 27/08/2008 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, मिपाचे सन्माननीय सदस्य, मिपाच्या संपादकीय लेखनाचे पहिले मानकरी तसेच बनीला अमेरिकेची सफर घडवून युरोपला जाणार्‍या विमानात बसवून दिलेले आणि गायन हा एक सुप्त गुण अंगी बाळगणारे मुक्तसुनित उर्फ राजेंन्द्र बापट यांना संपूर्ण मिपा परिवारा तर्फे वाढदिवसाच्या (२७ ऑगस्ट) हार्दिक शुभेच्छा. मुक्तसुनितराव, बनीला युरोप टूर घडवून आपण आपल्या वाढदिवसानिमित्त आम्हालाच भेट द्यावी ही विनंती. :) परमेश्वर आपल्याला उदंड आयुष्य देवो..!! - प्राजु

(...आदिम घास...)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 27/08/2008 00:47 या दिवशी प्रकाशित केले.
हा थरकाप उडवणारा...आदिम ध्यास.. हीच आमच्या आदिम घासामागची प्रेरणा! ;) ...आदिम घास... ================================ अमूर्त अनाकलनीय कवितांपासून.. लपूनछपून.. स्वत:ला वाचवत.. फिरत होतो, अगदी तेव्हापासून! मी टाळत होतो... प्रत्येक असह्य कविता... जीवघेण्या प्रतिकांतून.. उपमांच्या कराल जबड्यांतून.. थरकाप उडवणार्‍या रुपकांपासून.. दूर.. दुबळ्या वाचकासारखं जगत..! त्याच विडंबनाच्या ध्यासापोटी.. दुर्बल वाचकाचा लेखक झाला.. लेखकाचा झाला विडंबक... लेखणीत चळ, शब्दात घोळ असलेला... चक्रम.. विक्षिप्त..! आणि त्या बरोबरच जन्माला आली.. वक्रोक्तीतली हूल...

पहिल्या मराठी विश्व साहित्य संमेलनाध्यक्षांची 'मिसळपावसाठी' एक धावती मुलाखत

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी मंगळवार, 26/08/2008 21:09 या दिवशी प्रकाशित केले.

डॊ.गंगाधर पानतावणे          डॊ.गंगाधर पानतावणे आणि प्राचार्य ठाले पाटील डॉ.गंगाधर पानतावणे    सोबत प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील अमेरिकेत होणार्‍या पहिल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष प्रख्यात साहित्यिक, विचारवंत व समीक्षक डॉ. गंगाधर पानतावणे यांची आम्ही दि.

...आदिम ध्यास...

लेखक स्वाती फडणीस यांनी मंगळवार, 26/08/2008 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
...आदिम ध्यास... ================================ अजस्र अवाढव्य श्वापदांपासून.. लपूनछपून.. स्वत:ला वाचवत.. फिरत होतो, अगदी तेव्हापासून! मी शोधत होतो... एक सुसह्य विश्व... जीवघेण्या पंज्यांतून.. मृत्यूच्या कराल सुळक्यांतून.. थरकाप उडवणाऱ्या गर्जनांपासून.. दूर.. दुबळ्या उंदरासारखं जगत..! त्याच सुरक्षिततेच्या ध्यासापोटी.. दुर्बल उंदराच मांजर झालं.. मांजराचा झाला वाघ... पंज्यात बळ, जबड्यात सुळे असलेला... सक्षम.. सशक्त..! आणि त्या बरोबरच जन्माला आला.. गर्जनेतला ललकार... सार्वभौमत्वाची आग..! स्वार झाली... गर्जणार्‍या दर्यावर.. पिसाळलेली आयाळ काबूत घेत.. गोठवणारी..

चुंबकीय क्षेत्र आणि प्राण्यांची उभी रहाण्याची दिशा

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी मंगळवार, 26/08/2008 14:20 या दिवशी प्रकाशित केले.
आजच बी.बी.सी.वर ही बातमी वाचली. बातमीचा सारांश असा की, प्राणी चरताना, झोपताना साधारणतः दक्षिणोत्तर असतात. आणि याचा संबंध संबंधित शास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी लावला आहे, वारा इत्यादिंचा नाही. मला प्रश्न असा पडला की आपल्याकडे पूर्व-पश्चिम झोपावं असं सांगतात. दक्षिणोत्तर झोपलं तर दक्षिणेला डोकं करू नये असं सांगतात. याचा संबंधही पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्राशी असावा असं मला बरीच वर्ष वाटत होतं. कुणाला याबद्दल जास्त माहिती आहे का?

पाहुनी तुमची सोंगेढोंगे

लेखक शंकर पु. देव यांनी मंगळवार, 26/08/2008 13:56 या दिवशी प्रकाशित केले.
पाहुनी तुमची सोंगेढोंगे मात्र कशी येईल दया । बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।। कशाला हवा झगमगाट एक भक्तीचा पुरेदिवा प्रत्येकाच्या मनामनात माणुसकीची ज्योत लावा तुमच्या इथल्या मांडणात उत्सवाची जाते रया बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।१।। नको मात्र फुलांचे ढीग वहा एकच लालफूल फुलांच्या या ओझ्याखाली माझा दातच केलात गुल ओंकाराचे रूप पहाव्या मोकळी ठेवा माझी काया बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।२।। प्रेमाने नाव घ्या कशाला बोंबलून करता आरती फेकून तुमचे आवाज शप्पथ वाटे लवकर जावे वरती उदबत्त्यांच्या धुरात मी तुमच्या कानी अत्तर काया बंद करा बोंबलणे गणपती बाप्पा मोरया ।।३।। दर वर्षी दहा द

गोपाला गोपाला... देवकीनंदन गोपाला......!

लेखक मृगनयनी यांनी मंगळवार, 26/08/2008 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
द्वापारयुगी मथुरानगरीचा राजा होता 'कंस'..... सदा छळे तो सज्जना, करी अति विध्वंस.... अत्याचारांचा भार न पेलवला धरणीमातेला.... दुष्टाच्या निर्दालना, जन्म घेण्या...ती विनवी प्रभुला... या कंसाची, पाठची बहीण होती 'देवकी'... पुढे 'वसुदेवा'ची ती राणी झाली लाडकी... वरातीच्या रथाचे सारथ्य पत्करले होते कंसाने... बहिणीची पाठवणी करत होता मानाने.... इतक्यात, घनगंभीर आवाजात, एक आकाशवाणी वदली... ऐकून ती, कंसाची जणू पाचावर धारण बसली... "कंसा, तुझी लाडकी बहीण आता तुझीच वैरिणी बनेल. देवकीच्या 'आठव्या' गर्भाकडून तुझा मृत्यू घडेल." ऐकून ती आकाशवाणी, चवताळला, संतापला कंस... नवपरिणित दांपत्याला मग घडला बंदिवास

शिशु वर्ग

लेखक विनायक प्रभू यांनी मंगळवार, 26/08/2008 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
शिशु वर्गात कशि धमाल असते. नावाला जागायच. तसाच आण्खी एक शिशु वर्ग जन्माला आलाय. ३ते ४ वर्शाचे असावे.शिक्षण शुल्क समिती नाव ह्या बाळाचे. इंजिनियरींग आणि मेडिकल च्या बेसावध पालकांवर अचानक शि आणि शु करणे हा आवड्ता कार्यक्रम. काशिबाइ नवले ह्या खाजगी मेडीकल विद्यालयाची फी २.२ लाख प्रवेश फी पहिल्या वर्शी. दुसर्या वर्शि अचानक ह्या समितीने ही फी ४.४ लाख केली. विथ रेट्रोस्पेक्टिव इफेक्ट. म्हणजे पहिल्या वर्शाचे पण भरायचे. म्हण्जे एका वर्शि हिशोबात न धरलेले ४.४लाख पालकंना उभे करावे लागणार. एका पालकांना हार्ट अटॅक आला.