Skip to main content

टोचणी-२ (अंडरटेकर)

लेखक विनायक प्रभू यांनी शनिवार, 20/09/2008 16:43 या दिवशी प्रकाशित केले.
टोचणी १ अर्धवट होता. तेव्हा पुर्ण करायला धीर झाला नाही. आज तो पुर्ण करत आहे. मला पायलट व्हायचे होते. ९वी १०वी व ११वी त सुट्टीत काम करुन ऍड्मिशनचे सुरुवातीचे पैसे जमा केले होते. त्यात ११वी च्या घशघशीत स्कॉलरशीप चा समावेश होता. आई गेली आणि स्वप्न कोमेजले. आई २ एप्रिल १९७२ ला पहाटे गेली. वडिलांच्या मांडीवर प्राण सोड्ले गीता वाचता वाचता. वडिल गेले बरोबर १२ वर्षांनी २ एप्रिलला बरोबर त्याच वेळी. आम्ही भावंडे हा योगायोग मानत नाही. जाणकारानी प्रकाश टाकावा. आई गेल्याचा निरोप आला स़काळी ७ वाजता. मी झोपेत होतो.

मैत्री व प्रेमातील फरक ओळखा

लेखक पारोळेकर यांनी शनिवार, 20/09/2008 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
विकी आणि प्रिया दोन्ही एकाच कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला शिकणारे विद्यार्थी. कॉलेजात सोबतच जायचं, यायचंही सोबत हा त्यांचा जणू नित्यक्रमच झाला होता. तसे ते दोघेही समजूतदार होते. एकमेकांच्या सुख दुःखात सहभागी होणं, आलेल्या अडचणी सोडवणं एवढंच नव्हे तर आर्थिक सहकार्य देखील ते एकमेकांना करत असत. कोणालाही अभ्यासात काही अडचणी आल्यात तर ते एका ठिकाणी बसून त्यावर चर्चा करत असत. प्रियाला सगळ्या मित्रामध्ये सर्वांत आधी आठवण यायची ती विक‍ीची आणि विकीचा इतर मित्रापेक्षा प्रियावरच अधिक विश्वास होता. विकी व प्रियाचे एकमेकांच्या घरी जाणे येणे सुरूच असायचे.

परवानगी

लेखक निशा यांनी शनिवार, 20/09/2008 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! मी एक लायब्ररीयन आहे. आमच्या लायब्ररीत संपुर्ण भारतातून ९० पेपर येतात. माझ्या वाचनात आलेले लेख, कविता, बातम्या मी तुमच्या सोबत शेअर करु इच्छिते. मी असे लेखन करु शकते का?

(सदैव माणसा, पुढेच जायचे )

लेखक अमोल केळकर यांनी शनिवार, 20/09/2008 14:34 या दिवशी प्रकाशित केले.
सदैव माणसा, पुढेच जायचे भविष्य ना पुन्हा कधी बघायचे सदा तुझ्यापुढे, असे महा दशा सदैव फसवी टॅरोट्ची दिशा हळूच ग्रह हे,राशीस ग्रासती मधेच या नाडी, निर्गाठ मारती बारा जागेतुनी, हळूच जायचे प्रलोभने तुला हे स्वामी दाविती ही जन्मकुंडली तूलाच बाधिती, मंगळ, शनी हा तुला न थांबवी न चंद्र ग्रहणे, आयुष्य घडवी न भविष्य तुझे, असे घडायचे सदैव माणसा, पुढेच जायचे भविष्य ना पुन्हा कधी बघायचे ( 'भविष्याच्या अंतरंगात' डोकावणारा ) अमोल --------------------------------------------------------- मुळ गाणे - सदैव सैनिका, पुढेच जायचे न मागुती तुवा, कधी फिरायचे

नाडी भविष्य - एक चिकित्सा

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 20/09/2008 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी ...प्रश्नोत्तरातून सुसंवाद या माझ्या पुस्तकातील काही भाग अवलोकनासाठी ठेवत आहे. चर्चा जरुर व्हावी. वस्तुत: हा विषय किती प्राधान्य क्रमावर असावा ?

नाशिक येथे महापुर

लेखक मिंटी यांनी शनिवार, 20/09/2008 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकर.... आज सकाळी मिपावर काथ्याकुट मधे विकास यांचा "पाणीच पाणी चहुकडे" हा लेख वाचला. त्यानंतर ई-सकाळवर नजर फिरवताना या संदर्भात आणखी माहिती मिळाली. या संदर्भातील आणखी माहिती आणि छायाचित्रे इथे टाकत आहे. (स्त्रोत - ई-सकाळ) मिपाच्या नियमांमधे हे बसत नसेल तर हा लेख उडवावा ही तात्यांना नम्र विनंती. सविस्तर माहिती - http://www.esakal.com/esakal/09202008/SpecialnewsEDDB762911.htm पुरपरिस्थिची छायाचित्रे -

दिल्लीमधे दोन दहशदवाद्यांना कंठस्नान

लेखक चंबा मुतनाळ यांनी शनिवार, 20/09/2008 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या म.टा. मध्ये ही बातमी वाचली. ह्या एनकाऊंटर बद्दल दिल्ली पोलिसांचे कौतूक केले पाहिजे वगैरे ठीक आहे, परंतु इंस्पेक्टर मोहनचंद्र शर्माला शहीद मानने कितपत ठिक आहे? ह्याने बुलेट्प्रुफ जॅकेट घातले नव्हते! जर दहशदवाद्यांशी लढायला जाताना पुरेसा संरक्षक पेहेराव केला नसला तर दोष कुणाचा? दहशदवाद्यांचा नक्कीच नाही! बातमीत म्हटल्याप्रमाणे अतिरेक्यांकडून ८ गोळ्या झाडण्यात आल्या त्यातल्या तीन गोळ्या इं. शर्मांना लागल्या. दुसरी बाब म्हणजे, जो अतिरेकी पोलिसांच्या हातात जिवंत सापडला, तो योगायोगाने आजमगड जिल्ह्यातील समाजवादी पार्टीच्या उपाध्यक्षाचा मुलगा आहे!

म्हणी रिमिक्स! :)

लेखक भाग्यश्री यांनी शनिवार, 20/09/2008 05:53 या दिवशी प्रकाशित केले.
हॅलो सगळे मिपाकर ! अभिजितचा म्हणींचा धागा भलताच लोकप्रिय ठरला .. त्यावरून हा खेळ आठवला.. एका संस्थळावर पाहीला होता.. या खेळात, दोन वेगळ्या म्हणी एकत्र करायच्या आहेत.. :) उदा... हातच्या कंकणाला खळखळाट फार.. ! :) असेल हरी तर जमतील भुते..! :) चला, येऊद्या अजुन विनोदी म्हणी! :)