Skip to main content

मिपाकरांच्या वाचनखुणा.

लेखक टर्मीनेटर यांनी बुधवार, 31/03/2021 20:10 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मिपाकरांनो, आपल्या सर्वांच्या आवडत्या मिसळपाव.कॉम ह्या संकेतस्थळाला यंदा पंधरा वर्षे पूर्ण होत आहेत. पंधरा वर्षांच्या मिपाच्या यशस्वी वाटचालीत अनेक लेखक/लेखिकांनी उत्तमोत्तम कथा, कादंबऱ्या, लेख, लेखमालिका लिहून मोलाचे योगदान दिले आहे. मिपावरच्या एकूण धाग्यांची संख्या आता पन्नास हजाराचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचली आहे. इतक्या मोठ्या साहित्य खजिन्यात दडलेली/कालौघात विस्मृतीत गेलेली कित्येक मूल्यवान रत्ने शोधून काढून वाचणे हि नवीनच नाही तर जुन्या वाचकांसाठीही गवताच्या गंजीत हरवलेली सुई शोधण्या एवढी कठीण गोष्ट आहे.

अदा बेगम - भाग ५

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 31/03/2021 08:26 या दिवशी प्रकाशित केले.
अदा बेगम - भाग ५ ------------------------- पुढल्या एका छोट्या वस्तीच्या अलीकडे , गावाबाहेर एक मारुतीचं देऊळ होतं. देवळाच्या पटांगणात गोसाव्यांचा एक जथा पथाऱ्या टाकून पडला होता. तोच जथा !.... ज्या मध्ये अदा होती. ती नुसतीच पडलेली होती . तिला झोप येत नव्हती . तिला हिरोजी आठवत होता ... रात्रीच्या गडद निळ्या आकाशात पाहताना तिला वाटत होतं - चांदण्या खूप असल्या तरी चंद्र एकच असतो . त्या शांततेत तो टापांचा आवाज घुमत होता. सगळेच जागे झाले. बाबुलजी पुढे झाला . त्याने घोडा धरला. घोड्यावर कोणी स्वार पडलेला होता . दोघा गोसाव्यांनी त्याला खाली घेतलं. हिरोजीला.

अदा बेगम - भाग ४

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 30/03/2021 22:07 या दिवशी प्रकाशित केले.
अदा बेगम - भाग ४ ------------------------ महाराष्ट्रात बऱ्याच घडामोडी घडल्या होत्या. राजांच्या कारवाया चालूच होत्या . शांतता कशी ती नव्हती . शेवटी स्वराज्याचा यज्ञ जो मांडला होता. शाहिस्तेखानाचा पराभव, जसवंतसिंहाचा पराभव, सुरत आणि अहमदनगरची लूट यामुळे औरंजेबाचा भडका उडाला होता. शिवाजीचा बंदोबस्त केला नाही तर दख्खन ताब्यातून जाईल हे जाणण्याइतका तो धूर्त होता. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी त्याने दरबारातला मोठा अनुभवी सरदार निवडला - मिर्झाराजे जयसिंग ! पातशहाने त्यांना भरपूर द्रव्य देऊन पाठवलं. मोठी फौज दिली आणि सोबतीला दिला दिलेरखान. तोही मातब्बर सरदार होता. युद्धनिपुण. लढाऊ बाण्याचा.

अदा बेगम - भाग ३

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 30/03/2021 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
अदा बेगम - भाग ३ --------------------------- प्रवासाला सुरुवात करण्यापूर्वी अदा आणि बाबुलजी वाड्यावर गेले . वाडा नव्हताच तो .नुसता एक दगड - मातीचा ढिगारा उरला होता. तो भग्न झाला होता ,जळाला होता . अदा त्याच्याकडे डोळ्यात पाणी आणून बघत होती .डोळ्यात साठवून घेत होती. ती त्याच वाड्यात लहानाची मोठी झाली होती .तिथेच तिने यौवनात पदार्पण केलं होतं . ते दोघे त्यांच्या खास दालनात पोचले. त्याची शान लयाला गेलेली. एकदम तिला- जणू घुंगराची छमछम ऐकू आली .तिला नूरआपा आठवली.

तुमचे हे काय करतात?

लेखक आजी यांनी मंगळवार, 30/03/2021 16:12 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतीही स्त्री कुठेही जात असली, कुणाला भेटत असली, कुठंही उपस्थित असली तरी तिला एक प्रश्न हमखास विचारला जातो, किमान काही काळापूर्वीपर्यंत विचारला जायचा, तो म्हणजे "तुमचे मिस्टर काय करतात?" हा प्रश्न विचारला जातो सहज, पण जणू त्या स्त्रीची संपूर्ण "औकात" जोखण्यासाठी विचारल्यासारखा हा प्रश्न असतो. ह्या एका प्रश्नाच्या उत्तरावरुन तिचं संपूर्ण स्टेटस विचारत्याला कळतं. नवरा डाॅक्टर, इंजिनिअर असेल तर फारच उत्तम. प्रथम श्रेणी, प्रथम पसंती. "आम्ही तिकडे (यूएस, युरोप आदि) ला असतो. आत्ता इकडे इंडियात आई गेल्या म्हणून आलोय." हे उत्तर म्हणजेही उच्च दर्जा.

सावली

लेखक सरीवर सरी यांनी मंगळवार, 30/03/2021 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
असं कधी झालंय का? आपली सावली ..राहिलय उभी किती तरी वर्षांची पानं उडून गेली काळाची काजळमाया सरून गेली.. तरी अवचित ही सामोरी राहिलय उभी.. मी तिला पाहते,मनभरून न्याहाळते समोरूनी ती पुढली वाट चालू लागते सांगाव वाटे तिला ही वाट अशी कठीण असते कशाला धावते आत तरी हात हाती घेते? ती चालत राहते ...कधी माझ्याकडे पाहत हसते.. मी बघत राहते.. हळूच हसते

मदत पाहिजे - उत्तर भारतात प्रवास आणि COVID चे नियम

लेखक विकास... यांनी सोमवार, 29/03/2021 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार नमस्कार लय लांबड लावत नाय मुद्द्याचं चालू करतोय हा तर सगळं काही बंद पडून १ वर्ष झालय आणि कुठेतरी जायचंय असं म्हणून नुसतं एक्सेल वर प्लॅन बनवून बनवून आणि मॅप वर बघून बघूनच सगळं फिरून झालं (आणखी कोणी समदुःखी असेल तर बोलते व्हा) मग बस्स आता एकच उपाय मिपावर मदत मागायची हा तर १००-१ प्लॅन पैकी एक  प्लॅन खाली देतोय,  जर का कोणी तिकडे* गेलं असेल तर माहिती सांगावी * तिकडे म्हणजे पुणे ते  - दिल्ली विमानतळ, ISBT, New Delhi  रेल्वे स्टेशन आणि इथून पुढे आणि परत असा प्रवास केला असेल तरी अनुभव सांगावा पुणे  - दिल्ली - विमान प्रवास दिल्ली - डेहराडून - बस/रेल्वे&nbsp

अदा बेगम - भाग २

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी सोमवार, 29/03/2021 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
अदा बेगम - भाग २ ------------------ शिवाजीमहाराज वेशीवर येऊन ठेपले होते. सुरतच्या पूर्वेला असलेल्या बुऱ्हाणपूर दरवाजाजवळ फौजेची छावणी पडली. पण सुभेदार इनायतखान गाफील राहिला . कारण त्याला कळलं होतं की मोगलांचा मराठा सरदार तर पुढे चाललाय अहमदाबादला. मोगली सरदाराला मदत करायला. तिथे झालेलं एक बंड मोडण्यासाठी. ही आवई तर खुद्द राजांनीच थोडीशी आधी उठवलेली. सुभेदार इनायतखानाला निरोप गेला. सामोपचाराने खंड ठरवता येईल. गिल्ला करण्याची , जाळपोळ करण्याची, नासधूस करण्याची काही गरज नाही. पण इनायतखानाकडून उत्तर आलं नाही , ना कुठल्याही फिरंग्यांकडून . तांबडं फुटलं. पक्ष्यांची किलबिल सुरु झाली.

कोविड अनुभव

लेखक MipaPremiYogesh यांनी सोमवार, 29/03/2021 19:39 या दिवशी प्रकाशित केले.
कोविड अनुभव तसे पहिले तर आता लोकांना नवीन नाहीये तरीही मी हे लिहिण्याचं कारण कि कोणाला थोडासा तरी फायदा होऊ शकेल. तारीख १२ मार्च , माझ्या मुलाचा वाढदिवस. पुरणपोळीचा प्लॅन चालू होता आणि फोन खणखणला कि तडक हॉस्पिटल मध्ये या. माझ्या सासर्यांना वेगळ्या कारणासाठी ऍडमिट केले होते तिकडून फोन होता. आम्ही ब्रेकफास्ट चा घास तसाच ठेवला आणि हॉस्पिटल ला गेलो. ICU मधले डॉ म्हणाले कि त्यांना covid डिटेक्ट झालाय आणि इकडून शिफ्ट करावे लागेल. आमच्या पायाखालची जमीनच सरकली. मेव्हणी आणि मेव्हण्याला फोन केला. ते पण आले. डॉ ची चर्चा केली ते म्हणाले आम्ही चौकशी करतो कुठे जागा मिळेल तशी.