Skip to main content

..बाकी खरंच काही नाही

लेखक पद्मश्री चित्रे यांनी शुक्रवार, 03/10/2008 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण मला आता ,मुळी सुद्धा येत नाही उगीच डोळे भरुन येतात, बाकी खरंच काही नाही.. फूल बघुन मला आता कुणी सुद्धा आठवत नाही हळुच नजर वळवते मी, बाकी खरंच काही नाही.... चिम्ब पाउस आला की आपली भेट आठवत नाही भिजणं मात्र टाळते मी ,बाकी खरंच काही नाही... पहाट जेव्हा सरत असते ,तुझं स्वप्न पडत नाही झोप मात्र निघुन जाते ,बाकी खरंच काही नाही... एकटं एकटं वाटतं पण ,तू मुळीच आठवत नाहिस विसरलेच नाही तुला मी ,बाकी खरंच काही नाही...
Taxonomy upgrade extras

भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास

लेखक मृदुला यांनी शुक्रवार, 03/10/2008 04:17 या दिवशी प्रकाशित केले.
वनपर्वाच्या ३०७व्या अध्यायात सूर्य म्हणतो, "हे कुंती, कन्या शब्दाची उत्पत्ती कम् धातूपासून झालेली असून त्याचा अर्थ हव्या त्या पुरुषाची इच्छा धरू शकणारी असा आहे. कन्या स्वतंत्र आहे. स्त्रिया व पुरूष यांच्यामध्ये कोणताही प्रकारचा आडपडदा नसणे हीच लोकांची स्वाभाविक स्थिती असून, विवाहादिक संस्कार सर्व कृत्रिम आहेत. यास्तव तू माझ्याशी समागम कर. ..." - इतिहासाचार्य वि. का. राजवाडे. भारतीय विवाहसंस्थेचा इतिहास हे पुस्तक आज जालावर सापडले.

शेव

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 03/10/2008 02:10 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वात सोपी आणि झटकन होणारी म्हणजे शेव्....तसेच पटकन खाऊन संपणारी..:) साहित्यः १ वाटी तेल १ वाटी पाणी अंदाजे ४ वाट्या बेसन (हरभरा डाळीचे पीठ) शक्यतो ताजे आणि बारीक तिखट,मीठ, हळद ओव्याची पूड कृती: १. तेल आणि पाणी एकत्र करून फेटावे, हँड ब्लेंडर चा उपयोग करावा. पांढरे होईपर्यंत फेटावे. २.त्या तेलात १ च.ओवापूड, मीठ, ४ च.तिखट, पाव हळद घालावी व त्यात मावेल तेवढे बेसन घालावे व पिठ भिजवावे जास्त घट्ट नको. ३.पसरट कढईत तेल गरम करावे. शेवपात्रात वरील पीठ घालुन डायरेक्ट कढईतच शेवेचा चवंगा पाडावा.

पाकातले चिरोटे

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 03/10/2008 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
पाकातले चिरोटे साहित्यः २ वाट्या मैदा. पाव चमचा मीठ ४ टे.स्पून कडकडीत तेल २ टे.स्पून डालडा तळण्यासाठी तूप किंवा रिफाइंड तेल पाकासाठी २ वाट्या साखर केशर / केशरी रंग (ऐच्छिक) कृती: १.मैदा चाळून मीठ व तेलाचे मोहन घालून मऊ भिजवावा. भिजवताना १टे.स्पून दही घालावे. २.परातीत डालडा घेऊन हलके होईपर्यंत फेटावे, पांढरेशुभ्र झाले कि कोमट करावे. ३.मैद्याचे १० गोळे करून, तांदुळाची पिठी वापरून त्याच्या पोळ्या कराव्यात. ओल्या फडक्याखाली झाकून ठेवाव्यात. ४.मैद्याची एक पोळी घेऊन त्यावर फेटलेला डालडा कडेपर्यंत हाताने लावावा.त्यावर दुसरी पोळी ठेऊन त्यावर डालडा लावावा. असे पाच पोळ्यांवर लावावे.

अनारसे

लेखक स्वाती राजेश यांनी शुक्रवार, 03/10/2008 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
दिवाळी म्हटली कि फराळाची तयारी अगोदर पासूनच सुरु होते. भाजाणीच्या पिठापासून ते अनारशाच्या पिठापर्यंत. माझी आई अनारशाचे पिठ घरीच तयार करत असे. तिची रेसिपे इथे देत आहे. साहित्यः १ किलो जाडा, जुना तांदुळ १ किलो पिवळा गुळ कोल्हापुरी वेलदोडा, जायफळ पावडर २ टे.स्पून साजुक तूप पाव किलो खसखस कृती: १. तांदुळ स्वच्छ धुवून पाण्यात ३ दिवस भिजवून ठेवावेत, पाणी दररोज बदलावे. २.पाणी निथळून, कॉटनच्या कापडावर सावलीत वाळत टाकावेत. दमट असतानाच मिक्सवर किंवा खलबत्त्यात कुटावेत. चाळणीने पिठ चाळावे. ३.गुळ किसणीने किसावा किंवा बारीक करावा. वरील चाळलेल्या पिठात मिसळावा.

माझे सत्याचे प्रयोग

लेखक ऋषिकेश यांनी गुरुवार, 02/10/2008 23:23 या दिवशी प्रकाशित केले.
टिपः सदर लेखातील हिरव्या रंगातील तिरपी अवतरणे मुस्त सारांश आहे. भाषांतर नाहि मोहनदास करमचंद गांधी नावाचा माणूस पोरबंदरला आजच्या दिवशी जन्माला आला. पुढे हा मुलगा शिकला, आफ्रिकेला गेला. तिथल्या वंशभेदाबरोबर लढला, आफ्रिकेत प्रसिद्धी मिळवून जेव्हा हा माणूस भारतात परतला तेव्हाही भारत पारतंत्र्यातच होता. टिळकांच्या नसण्याने संपूर्ण भारताला एकत्र बांधणार्‍या नेत्याची कमी होती.

कविता म्हणजे रे काय?........ भाऊ

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 02/10/2008 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
कविता म्हणजे काय? असा प्रश्न खूप लोक विचारतात.माझा विचार मी थोडक्यात देतो.कवितेला प्रतिक्रिया देणं ही एक चांगली गोष्ट आहे."मला ही कविता आवडली किंवा मला आवडली नाही" अशी प्रतिक्रिया समजण्यासारखी आहे. कधी कधी काही वाचक कविता लिहायलाच सुचवतात किंवा एखादी कविता वाचून झाल्यावर उपदेश पण करतात.

अरे `देवा'!

लेखक आपला अभिजित यांनी गुरुवार, 02/10/2008 21:55 या दिवशी प्रकाशित केले.
वाढदिवस म्हणजे बुद्धीत वाढ आणि आयुष्यातील कालावधीत घट होण्याचा दिवस, असं म्हणतात. काही जण मात्र त्याला अपवाद असतात. ते स्वतःला चिरतरुण म्हणवून घेतात आणि म्हातारपणी पोरकटपणा करायला मोकळे होतात. त्यामुळं त्यांचे वाढदिवस जवळ आले, की छातीत धस्स होतं. अंगाला दरदरून घाम फुटतो आणि घशाला कोरड पडते. पुन्हा कुठला तरी नवा संकल्प जाहीर करून आपल्या माथी मारणार की काय, असा झोप उडवणारा प्रश्‍न सतावू लागतो. यंदाही असंच झालं...एव्हरग्रीन, चिरतरुण, चॉकलेट हीरो म्हणवणाऱ्या आणि अवघे 85 वयोमान असलेल्या एकेकाळच्या समस्त चित्रपटरसिकहृदयसम्राटाचा वाढदिवस होता.