Skip to main content

(आनंदाने)

लेखक चतुरंग यांनी बुधवार, 08/10/2008 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
अजब यांना 'आनंदाने' कविता करताना बघून मला राहवले नाही, अर्थात तत्काळ विडंबन धर्माला जागणे क्रमप्राप्त होते! ;) पुन्हा पुन्हा तो कविता रचतो, आनंदाने सरसावुन मी लगेच बसतो, आनंदाने... शब्द बदलणे अवघड नसते माझ्यासाठी बोरू त्याचा तोच झिजवतो, आनंदाने... जालावरती टुकार कविता तुडुंब मिळती जुन्या नव्या मी सर्व उसवतो, आनंदाने... "विडंबुनी ही कविता तुजला काय मिळाले? " चडफडणारे प्रश्न ऐकतो, आनंदाने... पूर्वी काव्ये छोटी-मोठी भादरायचो; आता गजला तासत सुटतो, आनंदाने... लिखाण तुमचे आनंदातच चालू राहो विडंबने ही 'रंग्या' करतो, आनंदाने... चतुरंग
Taxonomy upgrade extras

भुतेखेते-हडळी अनुभव

लेखक येडा खवीस यांनी बुधवार, 08/10/2008 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, मिसळपाववरील सन्माननीय आणि उच्चविद्याविभुषित मंडळींपैकी कोणाचा "भुते-खेते-हडळी" अशा गोष्टींवर खरोखर विश्वास आहे का? मी स्वत: एक व्यावसायिक "घोस्टबस्टर"( मांत्रिक) X( असल्याने अर्थात माझा विश्वास तर आहेच पण अनुभवही आहेत. अर्थात हे अनुभव बरेच व्यक्तिसापेक्ष आणि वादग्रस्त असु शकतात त्यामुळे ते शेअर करणे शक्य नाही किंवा करेनही वेळ आल्यावर.... तुम्हाला कधी अशा शक्तिंचा अनुभव-त्रास झालाय का? ~X( अशा शक्तिंच्या अस्तिवाबद्दल तुम्हाला काही प्रश्न आहेत का?

म्युच्युअल फंड आणि शेअर्स काही निरिक्षणे

लेखक मनिष यांनी बुधवार, 08/10/2008 15:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पोर्टफोलीओ आज (घाबरत, घाबरत) बघितला त्यावर आधारीत काही निरीक्षणे - जेव्हा सेन्सेक्स २१००० होता, तेव्हा मला जवळजवळ ४५-५०% नफा होता शेअर्स मधे तर म्युच्युअल फंडात ३५% नफा होता. आज सेन्सेक्स 10800 आहे तेव्हा मला शेअर्स मधे ५०-५५% तोटा आहे तर म्युच्युअल फंडात २५% तोटा -- त्यातील SBI MAGNUM BALANCED FUND सिप मधे केवळ ८.५% तोटा. माझा निश्चय -- म्युच्युअल फंडात जास्त पैसे टाकणार! शेअर्स मधे फक्त मोजके काही चांगले शेअर्स ह्या तोट्यात उचलणार. तुमचे काय मत आहे?

वाईन क्रीम

लेखक स्वाती दिनेश यांनी बुधवार, 08/10/2008 15:05 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या त्सेंटाआजीच्या आजीची ही 'रेशिपी' लिखाळमंडळी आमच्याकडे आले असताना केली होती.तेव्हा चवीसाठी त्यांच्याकडे विचारणा करा,:)
साहित्य - ५०० मिली व्हाइट वाइन, १०० ग्राम ( साधारण १ वाटी भरुन) साखर, एका लिंबाचा रस, १ चिमूट मीठ, २ अंडी, २ चमचे मोंडामिन किवा आरारुट किवा स्टार्च कृती - लिंबाचा रस काढणे. मोंडामिन थोड्या पाण्यात विरघळवून घेणे.गुठळ्या झाल्या तर त्या मोडणे.त्यात चिमूटभर मीठ घालणे.

हे असं का होतंय?

लेखक सरपंच यांनी बुधवार, 08/10/2008 14:55 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, सर्वात आधी आज मिसळपावच्या सेवादात्याच्या खंडीत सेवेमुळे तुम्हा सर्वांना झालेल्या त्रासाबद्दल मिसळपाव तर्फे दिलगिरी व्यक्त करतो. मिसळपाव दिवसागणीक वाढतं आहे. रोज नवीन सदस्य येत आहेत. आणि हजर असणार्‍या सदस्यांची संख्या सुध्दा वाढती आहे. सध्या खर्‍या अर्थाने सक्रिय असणार्‍या सदस्यांच्या संख्येत दुप्पट किंवा तिप्पट सुध्दा वाढ झाली तरी आपला सेवादात पुरून उरेल एवढी क्षमता आहे. मात्र गेले काही दिवस कधीतरी अचानकच भेट देणार्‍या अतिथींची संख्या खूप वाढते. सेवादात्याला झेपणार नाही एवढ्या मागण्या केल्या जातात. हे नैसर्गीक नाही अशी शंका आहे. असो.

मला भावलेली कविता

लेखक mina यांनी बुधवार, 08/10/2008 14:27 या दिवशी प्रकाशित केले.
अजूनही निळया जांभळ्या नदीला आंबेवनाची सावली भेट पहिलीवहिली अकल्पित भेट दुरस्थपणाची गर्भरेशमी क्षणाची सौदामिनीच्या बाणाची देवघेव. गुलबक्षीच्या फुलानी गजबजले कुपण वेचू लागला श्रावण मोरपिसे। ओल्या आभाळाच्या खाली इद्रचापाचे तुकडे तुझा करपाश पडे जीवनास. कधी रेताडीचे रस्ते कधी मोहरली बाग कधी प्रासादास आग कर्पुराच्या। सप्तसुरातुनी गेले माझ्या जीवनाचे गीत तुझ्या सारगीची तात साथ झाली. बर्फवाट शिशिराची आता पुढलिया देशी तुझ्या मिठीची असोशी अजूनही. -कवी कुसुमाग्रज
Taxonomy upgrade extras