Skip to main content

<strong>नव्या भोंडल्यातले एक गाणे</strong>

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 21/10/2008 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
चारोळी, त्रिवेणी दोघी बहिणी काव्यात नव्हतं तिसरं कोणी काव्याची गेयता चोरली कोणी मी नाही चोरली कवितेनी चोरली विडंबनदादा येईल गं दादाच्या मांडीवर बसीन गं दादा तुझी कविता चोरटी अन् मला म्हणते पोरटी घातली काठी कवितेच्या पाठी काव्यातून, काव्यातून चारोळी मोठी.. फुटली कविता झाल्या चारोळ्या नवागतांनी वाजवल्या टाळ्या ...

वाघनखं (भाग १)

लेखक घाशीराम कोतवाल १.२ यांनी मंगळवार, 21/10/2008 15:10 या दिवशी प्रकाशित केले.
"आई गं SS !! हा दुधवालासुद्धा ना! किती जोरानं बडवतोय दार", मी डोळे किलकिले करत दुधाचं भांडं घ्यायला उठणार, एवढ्यात कुणीतरी दार उघडल्याचा आवाज झाला आणि 'हुश्श' करीत मी पुन्हा गादीवर मान टाकली. " अरे कुठे गेल होतास?" ," ठरल्याप्रमाणं आज तिसरा आणि शेवटचा दिवस. उद्यापासून आपली पुन्हा भेट नाही. आज उठल्याबरोबर कपाट उघडायचं, दोन कपडे गोळा करायचे आणि तडक गाव गाठायचं". "आणि हो, एक महत्त्वाचं विसरलोच. वसंतरावांच्या पेटीतली वाघनखं गळ्यात बांधायची आणि मगच घराबाहेर पडायचं, एवढं पक्कं ध्यानात ठेव." "तुला सांगितल्याप्रमाणं दादु गुरव तिथं हिंदळ्यात तुझी केंव्हापासुन वाट बघतोय.

वाचा आणि थंड बसा

लेखक भोचक यांनी मंगळवार, 21/10/2008 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या 'नई दुनिया' या इंदूरमधील सर्वाधिक खपाच्या वर्तमानपत्रात आलेल्या अग्रलेखाचा मराठी तर्जुमा. वाचा आणि थंड बसा. केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी मुंबईत रेल्वेच्या परीक्षेसाठी आलेल्या उत्तर भारतीय विद्यार्थ्यांवर केलेल्या हल्ल्याप्रकरणी राज ठाकरे यांना मनोरूग्ण असे संबोधले आहे. लालू यांनी संतापाच्या भरात हे वक्तव्य केले असले तरी राज यांना 'मनोरूग्ण' म्हटल्याने त्यांनी केलेले गुन्हेही कायद्याच्या कक्षेत माफ ठरतात हे लालू विसरलेले दिसतात. कारण कायदाही तेच सांगतो. राज यांनी केलेला गुन्हा हा काही कोणत्याही व्याधीतून आलेला नसून ती एक अतिशय नियोजनबद्ध कृती आहे.

गोविंदराव पटवर्धन

लेखक व्यंकु यांनी मंगळवार, 21/10/2008 09:46 या दिवशी प्रकाशित केले.
गोविंदराव पटवर्धन एक उत्कृष्ट ऑर्गनवादक होते.त्यांच्यासंबधी ऐकलेले काही प्रसंग: 1) एकदा कोकणात काही वर्षापूर्वी एक नाटक होतं साथीला गोंविंदराव होते आणि वयाच्या पंच्याहत्तरीत असलेले छोटा गंधर्व गायला आले होते तेव्हा एका पदाच्या वेळी गोविंदराव आणि तबलजी गंधर्वाँधा कैक वेळ समेवर यायलाच देत नव्हते त्यावर छोटा गंधर्व गोविँदरावांना म्हणाले, "अरे गोविंदा माझं वय पंच्याहत्तर आहे आता मी दमलोय आता थांब" गंधर्वाँची ही वाक्य गोविंदरावानी ऑर्गनवर जशीच्या तशी उतरवली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला. 2)पूर्वी नाटकं उघड्यावर आणि बत्तीच्या उजेडात होत. असंच एका उत्सवाच्या प्रसंगी नाटकाचं आयोजन करण्यात आलं साथीला गोवि

मराठी संकेतस्थळ

लेखक उदय यांनी मंगळवार, 21/10/2008 08:59 या दिवशी प्रकाशित केले.
Open Directory Project (www.dmoz.org) साठी मिसळपाव चे नाव लवकर च त्यात टाकण्यात येईल. इतर काही मराठी संकेतस्थळ सुचवायचे असेल तर कृपया इथे लिहावे. धन्यवाद.

दुरून डोंगर साजिरे

लेखक आनंद घारे यांनी मंगळवार, 21/10/2008 02:22 या दिवशी प्रकाशित केले.
"बडा घर पोकळ वासा ", "नांव सोनूबाई, हाती कथिलाचा वाळा ", "वरून कीर्तन आंतून तमाशा " अशा "दिसतं तसं नसतं " या अर्थाच्या किंवा जे दिसतं आणि जे असतं यातला विरोधाभास दाखवणार्‍या अनेक म्हणी प्रचारात आहेत. "दुरून डोंगर साजिरे " ही तशीच एक म्हण आहे. या म्हणीचा "जवळ जाता दर्‍या खोरी " हा उत्तरार्ध प्रचलित आहे. त्यातल्या खोल दर्‍या जरी भयावह वाटल्या तरी त्यांची सांगड खोर्‍यांबरोबर कां घालावी? खोर्‍यांमध्ये झुळुझुळू वाहणारे पाण्याचे प्रवाह असतात, त्यांच्या काठाने झाडाझुडुपांचे विश्व बहरलेले असते, त्यांच्या आधाराने विविध प्राणी आणि पक्षी रहात आणि संचार करत असतात.

(कुंतलांचा पसारा)

लेखक चतुरंग यांनी मंगळवार, 21/10/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा - मिपाची कवयित्री प्राजू हिची 'आठवांचा पसारा' ही सुंदर कविता! 'चतुरंगप्रयातात' हे विडंबन करण्याचा प्रयास केलेला आहे.. उवा जाहल्या, कुंतलांचा पसारा रिठ्याने कशा आज डोळ्यांत धारा सुगंधीच मेंदी असावी उशाशी उडू लागला रंग हा आज सारा कसा आणला 'वीगही' मी लपूनी गळू लागला केशसंभार सारा उडाली पहा रातची झोप माझी कुणा वैद्यकाचा मिळे ना सहारा जरी टाळतो मी तुझ्या आलयांना तुला नापिता पाहु येतो शहारा चला संपला भार या डोसक्याचा मिळाला वयाने मला हा इशारा चतुरंग