चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान!
सर्वांना नमस्कार. सर्व जण ठीक असतील अशी आशा करतो. काल १७ एप्रिलला संध्याकाळी आकाशामध्ये चंद्राने केलेलं मंगळाचं सुंदर पिधान बघता आलं. काही काळ मंगळ चंद्राच्या पलीकडे लपला होता आणि नंतर समोर आला. म्हणजेच हे चंद्राने केलेलं मंगळाचं पिधान- अर्थात एक प्रकारचं ग्रहण होतं.
सूर्यास्ताच्या आधीच मंगळ चंद्राच्या पलीकडे गेलेला होता. ठीक ७:२१ ला चंद्राच्या बिंबापलीकडून मंगळ परत समोर आला. माझ्या टेलिस्कोपमधून ह्याचे फोटोज व व्हिडिओज घेता आले. नुसत्या डोळ्यांनीही हे दृश्य बघता आलं.
मिसळपाव