Skip to main content

ढग

लेखक अनुस्वार यांनी मंगळवार, 27/04/2021 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
कुणाच्या आयुष्याचा दोर कधी तुटेल आणि कुणावर नशीब कधी मेहरबान होईल या गोष्टी सदैव अंधाराच्या मुक्कामाप्रमाणे मानवाला अज्ञातच राहतील. परंतु असे आहे म्हणून जेवढे हाती उरते त्या आयुष्यालाच बेभरवशाचे करण्यात काय अर्थ आहे? सध्या अविश्वास आणि अस्वस्थतेने आपल्याला अशी घट्ट मिठी मारलीये की प्रत्येक श्वासावर आणि कृतीवर त्यांचा प्रभाव जाणवतो आहे. आनंद, समाधान, हास्य या नैसर्गिक भावनांचा प्रसवदर कमालीचा खालावला आहे. आपल्या मनातली स्वतंत्र विचारांची अमानुष भ्रूणहत्या कळसाला पोहोचली आहे. आपल्याला सगळं काही स्वतःचं आणि स्वतःकरिता हवं आहे केवळ विचार सोडून.

जीवनसाथी

लेखक आकाश खोत यांनी मंगळवार, 27/04/2021 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी इंग्लंडच्या राणीचे पती, प्रिन्स फिलिप यांचा वयाच्या ९९व्या वर्षी मृत्यु झाला. राणीचे पती असूनही त्यांना राजा नव्हे तर प्रिन्सच म्हटले गेले, तो एक वेगळाच विषय. त्यांच्या शाही इतमामात झालेल्या अंतिम संस्काराच्या कार्यक्रमाचे सविस्तर वृत्तांकन झाले. त्यात इंग्लंडच्या राणीचा कोव्हीडच्या मर्यादेमुळे इतरांपेक्षा वेगळे आणि एकटेच बसलेला फोटो पाहुन मन हेलावले. त्या राणीचे स्वतःचे वय ९५ आहे. राणीच्या आणि प्रिन्स फिलिप यांच्या लग्नाला ७३ वर्षे होऊन गेली. ७३. माझ्या वयाच्या दुपटीपेक्षाही काही वर्षे अधिक.

आमचीबी आंटी जन टेस

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 26/04/2021 22:50 या दिवशी प्रकाशित केले.
आमचीबी आंटी जन टेस गावात कायबी काम नव्हतं आजकाल. सगळे निसते बशेल. कोरूनामुळं नाम्याचं रसाचं गुर्‍हाळबी बंद पडेल व्हतं. त्येच्यायच्या त्या कोरूनाच्या. सकाळ संध्याकाळचा आमच्यावाला आड्डा आसा बंद पडेल. वावरातबी कांदे काढेल व्हते, आन या येळेला भाव काय मिळाला नाय. टॅक्टरचा हप्ता घरातून द्यावा लागला, आता बोला. या कोरूनाची आंटी जन टेस करून घ्या, आंटी जन टेस करून घ्या म्हनून मलेरीया डाक्टर आन आशाबाई गावात फिरत व्हती. मलेरीया डाक्टर लई बाराचं हाय बरं का आमच्या आरोग्य शेंटरवरचं. कायम आशाबाईला बरूबर घेवूनच फिरतं लेकाचं.

फाल्गुन व.३० संभाजी राजांची हत्या!

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 26/04/2021 11:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... संभाजी महाराज शके १६१० च्या फाल्गुन व. ३० रोजी छत्रपति संभाजी राजे यांची हत्या वडू (बुद्रुक ) येथे औरंगजेब याने अत्यंत अमानुषपणे केली! सुमारे सव्वा महिन्यापूर्वी म्हणजे माघ व. ७ रोजी मुकर्बखानाने औरंगजेब बादशहाच्या सांगण्यावरून संभाजी राजे व कलुशा या दोघांना संगमेश्वर येथे कैद केले होते.

फाल्गुन व. १३ विष्णुशास्त्री चिपळणकर यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 26/04/2021 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
चिपळूणकर शके १८०३ च्या फाल्गुन व. १३ रोजी अर्वाचीन मराठी वाङ्मयांतील प्रसिद्ध निबंधलेखक व टीकाकार विष्णुशास्त्री चिपळुणकर यांचे निधन झाले. अव्वल इंग्रजीतील प्रसिद्ध पंडित कृष्णशास्त्री चिपळुणकर यांचे हे जेष्ठ चिरंजीव. कॉलेजमध्ये असतांनाच यांना विद्याव्यासंगाचा नाद लागला.

फाल्गुन व. १४ ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन !

लेखक Ashutosh badave यांनी सोमवार, 26/04/2021 11:04 या दिवशी प्रकाशित केले.
आज काय घडले... फाल्गुन व. १४ ज्ञानकोशकार केतकर यांचे निधन ! शके १८१८ च्या फाल्गुन व. १४ रोजी महाराष्ट्रीय ज्ञानकोशकर्ते, समाजशास्त्रज्ञ, संशोधक आणि नवविचारप्रवर्तक पंडित डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांचे निधन झाले. हायस्कूलमध्ये असल्यापासूनच यांच्या बहुश्रुतपणामुळे शिक्षक यांना 'एन्सायक्लोपीडिया' असे म्हणत. येथील शिक्षणक्रम अपुरा असतांनाच ते १९०६ मध्ये अमोरिकेस गेले. आणि तेथील कार्नेल विद्यापीठांत समाजशास्त्राचा अभ्यास त्यांनी सुरू केला. आणि थोड्याच अवधींत बी. ए., एम् . ए., पीएच. डी. या पदव्या त्यांनी मिळविल्या.

धारूर, धर्मापुरी आणि अंबेजोगाई - १

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 25/04/2021 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
या वर्षी २६ जानेवारी मंगळवारी येत असल्याचं कळताक्षणीच मी २५ जानेवारीची सुट्टी टाकून दिली. मी सुट्टी टाकताच, या चार दिवसांत आपण बार्शीला (तिच्या माहेरी) जात आहोत असं बायकोनं जाहीर करून टाकलं. आता बार्शीला जातोच आहोत तर आजूबाजूचं एखादं ठिकाण पदरात पाडून घ्यावं असा सूज्ञ विचार मी केला आणि इंटरनेट धुंडाळायला लागलो. राज्यात कुठलीही घटना घडली की विरोधी पक्षनेते आपल्याला या घटनेचा फायदा कसा करून घेता येईल याचा शोध घ्यायला लागतात, तसाच मी कुठे जायचं असेल तर आजूबाजूला काय पाहता येईल याचा शोध घ्यायला लागतो. मी ट्रेकक्षितिजची वेबसाईट उघडली आणि माहिती काढू लागलो.

होबार्टचं भूत

लेखक सरिता बांदेकर यांनी रविवार, 25/04/2021 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
होबार्टचे भूत सौ सरिता सुभाष बांदेकर फ्लाईट होबार्टला लॅंड झालं,चेक ईन् बॅग नव्हतीच त्यामुळे लगेच बाहेर पडायला मिळेल असं वाटत होतं. एक्झिटच्या दिशेने बाहेर पडताना एक कुत्रा जवळ येऊन घुटमळायला लागला, त्याच्या मागोमाग एक ॲाफिसर हजर. सर, मॅडम जरा बाजूला चला.त्या ॲाफिसरचे शब्द ऐकल्यावर आम्हाला काही कळेचना की याला आपल्या बॅगमध्ये कसला वास आलाय. बॅगची चेन उघडून कुणी काही टाकले तर नाही??पण तेव्हढ्यात त्यांनी सांगितले तुमच्याकडे काही खाण्याने पदार्थ आहेत का?? तेव्हा हसावे का रडावे तेच कळेना. मग मी त्यांना सांगितले की होय आमच्याकडे क्रोसॅंट आणि फ्रूट्स आहेत.

सध्या मी काय पाहतोय ? भाग ५

लेखक मदनबाण यांनी शनिवार, 24/04/2021 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
समांतर :- सुहास शिरवळकर यांच्या पुस्तकावर [ कादंबरी ] आधारित ही मराठी आणि हिंदीत असलेली वेब सिरीज एक मास्टर पीस आहे. मी ही पहिल्यांदा हिंदीत आणि नंतर मराठीत पाहिली. मला मराठीत ही वेब सिरीज अधिकच जास्त आवडली. कुमार महाजन आणि चक्रपाणी यांच्या आयुष्या बद्धल असलेली ही सिरीज तुम्हाला खिळवुन ठेवते.