Skip to main content

रायगडची प्रसिद्ध पोपटी

लेखक A1April यांनी गुरुवार, 22/01/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
रायगडची प्रसिद्ध पोपटी कुकरमध्ये १ किलो वालाच्या गावठी शेंगा + मीठ + मसाला + ओवा + अंडी + बटाटा + रताळी + चिकन + कांदे मिक्स करणे. यामध्ये पाणी मुळीच टाकू नये, सगळे पदार्थ वाफेवर शिजतात. गॅसवर ३ शिट्ट्या द्याव्या. हा पदार्थ गरम गरम खायचा. सॉलीड, जबरदस्त टेस्टी लागतो. तुम्हाला नक्की आवडेल. मला तुमचे अनुभव जरूर सांगा. माझ्या तोंडाला लिहितानाच पाणी सुटले आहे. हा पदार्थ गावामध्ये मडक्यामध्ये शिजवतात. शहरामध्ये मडके मिळणार नाही म्हणून कुकर वापरावा. AJIT THAKUR a1april@rediffmail.com

छोट्यांसाठी वॉलपेपर

लेखक अमोल केळकर यांनी गुरुवार, 22/01/2009 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या दीड वर्षाच्या मुलीला आतापासून संगणकाचा लळा लागला आहे. बालगीते मस्त एन्जॉय करते. तिच्यासाठी बालगीतातील/ नर्सरी रिम्स सिडी तील तयार केलेले काही वॉलपेपर तीला खुप आवडतात. ही घ्या काही तुमच्या कडील छोट्यांसाठी.

(ठुमरी)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 22/01/2009 13:53 या दिवशी प्रकाशित केले.

पुलस्तिंची सुरेख  ठुमरी ऐकली आणि आमच्या लेखणीने पुन्हा ठेका धरला

उधार देण्या मित्र कुणीही उरला जिगरी नाही
पूर्वी होती येथे आता ती ही टपरी नाही

'रखमा' सगळ्या जमल्या आणिक मी लाथांनी भरलो
शोधत आहे अंगावर जी  जागा दुखरी नाही

मास्तर म्हणती चविष्ट आहे हे  प्रौढांचे शिक्षण
'स्वथ निरामय' जगणे घडते शाळा छपरी नाही

नवी स्थळे आली ना बसला शुद्धचिकित्सा धंदा
चौपाटी वा बजबजपुर ही अमुची टपरी नाही

सोशीक..!

लेखक उपटसुंभ यांनी गुरुवार, 22/01/2009 12:20 या दिवशी प्रकाशित केले.
संपली जवळीक ना ! तूसुद्धा अगतीक ना ! आत लाव्हा घुसळतो वरुन सारे ठीक ना ! फावले त्यांचे कसे ? भेकडांचे पीक ना ! काय दुःखाला हवे ? आसवांची भीक ना ! भाव आहे चांगला वेदनेला वीक ना ! कान का किटले असे ? तेच ते बौद्धीक ना ! रांग नाही दर्शना, हरपला लौकीक ना ! जिंकल्या दैवासही दाद द्याया शीक ना ! जीवना माझ्यापरी, हो जरा "सोशीक" ना ! -- अभिजीत दाते
Taxonomy upgrade extras

भुते

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 22/01/2009 11:06 या दिवशी प्रकाशित केले.
भुते **भुता बद्दल आपणास काय माहिति आहे का? **भुताचे पाय उलटे असतात का? **उदमांजर नावाच भुत लहान मुलांना पळवुन नेते का? **भुतांचे फोटो काढले गेले आहेत ते खरे आहे का?..आपणा पैकी कुणी पाहिले आहे का??[भुत किंवा फोटो} **हडळ/ डाखीण दिसायला खुप सुंदर असते असे म्हणतात..आपणास काहि अनुभव आहे का? **आसरा, इर, वीर, पिशाच्च, खवीस, वेताळ, गिरा, सटवा‌ई, जखा‌ई, जखीण, कैदाशीण, ड्रॅक्युला, ब्रह्मसमंध, चकवा..डेमन,भानामति..मुंज्या भुत्या..या व्यतिरिकत आपणास आणखि भुते माहित आहे का???? **एखादि स्री जर बाळंत पणात गेली तर तिचे भुत होते व त्याला कैदाशिण असे म्हटले जाते..हि कैदाशिणीला लहान मुले आवडतात...या बद्दल जाणकार

इसकाळचे नवे रूप..

लेखक भाग्यश्री यांनी गुरुवार, 22/01/2009 05:34 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच पाहीलं.. सकाळच्या साईटचे रुपडे बदलले आहे! छान दिसतेय आता.. टॅब्स, तुमचा जिल्हा निवडता येणे, असे सगळेच रुप आवडले. पूर्वी फार लवकर वाचून व्हायचा सकाळ.. आता भरपूर बातम्या,विषय इत्यादी भरगच्च आहे असं पहिल्या पानावरून वाटतं.. कदाचित मांडणीमुळे असावे. फाँट बदलूनच घ्या, म्हणजे बदललेला इसकाळ कळेल वगैरे म्हणत आहेत तिथे, पण फाँट काही मला डाउनलोड करता आला नाही! रनटाईम एरर आली, एकंदरीत स्लो झाल्यासारखी वाटली साईट.. :( कदाचित काही दिवसात होईल ठीक.. वेल, तसा काथ्याकुट करण्यासारखा विषय नाहीए. पण एक्साईटमेंट मधे अरे लोकांनी हे पाहीलं का?

पायमोजा

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 21/01/2009 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला जेंव्हा पायात मोजा घालायचा असतो तेंव्हा बहुतेक लोक आधि डाव्या पायात पायमोजा घालतात व नंतर उजव्या...असे का? याला काहि खास शाश्त्रीय किंवा मानस शाश्त्रीय कारण असेल का? यावर कुणी प्रकाश टाकु शकेल का? अविनाश

राऊरकेला

लेखक SwanandSolanke यांनी बुधवार, 21/01/2009 23:17 या दिवशी प्रकाशित केले.
दिड वर्षांपूर्वी मला स्वप्नात देखिल वाटले नव्हते की, मी एम् टेक करण्यासाठी ओडिसा राज्यात जाईल. ज्या राज्याचा उल्लेख फक्त महानादीच्या पुरापूरता आणि रथ यात्रेपूरता येतो, त्याच राज्यात एक भारत सरकारच्या कायद्यानुसार राष्ट्रीय महत्वाचे इंजीनियरिंग महाविद्यालय आहे, राष्ट्रीय तंत्रद्न्यान संस्था, राऊरकेला , हे त्याचे नाव. असो, मी मिसल पावचा नुकताच सदस्य झालो, भटकंती हा माझ्या अनेक छंदान्पैकी एक, म्हणुन सुरुवात करतांना या राज्याचे सौंदर्य मी आपल्या समोर ठेवत आहे. ओडिसा राज्य जितके निसर्गसुन्दर तितकेच कमालीचे विरोधाभासी आहे.