Skip to main content

नवल - पुस्तक परिचय

लेखक पाटिल यांनी रविवार, 25/07/2021 10:26 या दिवशी प्रकाशित केले.
नवल. जानेवारी २०२१ मध्ये प्रकाशित झालेली प्रशान्त बागड यांची ही पहिलीच कादंबरी आहे.. फारा दिवसांच्या प्रतीक्षेनंतर ते हाती आलं होतं...

बर्लिनचा 'सिटी पॅलेस' अवतरला नव्या रुपात

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 24/07/2021 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीची राजधानी बर्लिनच्या मधूनच वाहणाऱ्या स्प्रे नदीच्या किनाऱ्यावर ‘स्टाड्टश्लोस’ (सिटी पॅलेस) म्हणजेच ‘हम्बोल्ड्ट फोरम’ (Humboldt Forum) उभारण्यात आलेला आहे. या नवनिर्मित राजवाड्याचा उर्वरित भागही 20 जुलै 2021 पासून सामान्य लोकांसाठी उघडण्यात आला आहे. बर्लिन शहराच्या स्थापनेला 2012 मध्ये 775 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने एकेकाळी बर्लिनची ओळख असलेल्या या राजवाड्याची पुन:उभारणी करण्याची योजना जर्मन सरकारने आखली होती. ‘स्टाड्टश्लोस’ला ‘बेर्लिनर श्लोस’ म्हणूनही ओळखले जात होते. याच्या पुन:उभारणीचा विचार मांडला जाऊ लागला तेव्हापासूनच ही संपूर्ण योजना सतत वादात सापडत राहिली.

|| गे आये ऑलिम्पिकामाते ||

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी शुक्रवार, 23/07/2021 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
|| गे आये ऑलिम्पिकामाते || बा गजानना, मारोतीराया - भीमसेना.... ग्रीकांच्या क्रेटॉस देवा... अथेन्सच्या राणा झीअसा.... जापान्यांच्या सोजोबो देवा.... आज तुमां सांगणो करतंव महाराजा ! दर चार वर्षाप्रमानं आमी तुमची जी काय वेडीवाकडी सेवा केलेली हा... ती मान्य करूं घ्या... त्यात काय चूक-अपराध झालो असंल... तं लेकरांक क्षमा करा...आणि अलास्कापासून जपानपर्यंत आणि हिंदुस्तानापासून सेनेगलपर्यंत सर्वांची रखवाली करा.. सांभाल करा वो महाराजा | आजपासून टोक्योमध्ये जो ऑलिम्पिक खेलांचा घाट घातला असा... तो जगभरातली पोराटोरा, म्हातारे कोतारे, बायाबापड्या साजारो करतत.

सिलींडर ५

लेखक नीलकंठ देशमुख यांनी शुक्रवार, 23/07/2021 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर ५ आडगाव फाटा आणि बैलगाडी ब-याच अंतरावर . गाडीवाल्याला ओरडून ओरडून ओरडून आवाज दिले.पण तो बहुतेक झोपलेला.सिलीडर तिथपर्यंत कसे न्यायचे? खरेतर मामानी सिलिंडर गाडीपर्यंत न्यायला मदत केली असती.ते तयार ही होते.आपणच लग्न जमले असे सांगून पायावर कुर्‍हाड मारून घेतली.आता पश्चाताप करून काय उपयोग? बराच विचार केल्यावर युक्ती सुचली.सिलिंडर आडवे केले,व लहान मुले गाडी गाडी खेळतात तसे ढकलत नेऊ लागलो.

"सावरकर एकोज फ्रॉम फॉरगॉटन पास्ट "

लेखक चौकस२१२ यांनी शुक्रवार, 23/07/2021 08:12 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रम संपथ या लेखकाचे सावरकरांवरील पहिले पुस्तक प्रसिद्ध झाले त्याचे नाव होते "सावरकर एकोज फ्रॉम फॉरगॉटन पास्ट " त्याचा दुसरा भाग पण आहे "सावरकर या कॉंटेस्टेड लेगसी" अतिशष्य स्पष्ट शब्दात आपले विचार मांडणारे व्यक्ते हि ते आहेत द प्रिंट च्या शेखर गुप्ता यांनी त्यांची घेतलेली हि मुलख्खात नक्की पहा https://www.youtube.com/watch?v=mem1aZu13Wg&t=1353s हि मुलखात पाहिल्यावर मला दोन गोष्टी वाटल्या १) शेखर गुप्ता ना एक तर पश्चताप तरी झाला असावा कि त्यांनी संपथ यानं बोलवले किंवा २) त्यांच्या आतापर्यंतचं विचारसरणी

"योगा" ची बाजारपेठ (Yoga Inc. $ € ¥ £ ₹)

लेखक चामुंडराय यांनी गुरुवार, 22/07/2021 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरराष्ट्रीय योगदिनानिमित्त एका दैनिकाच्या आंतरजालीय आवृत्तीत प्रकाशित झालेला "योगाची बाजारपेठ Yoga Inc." हा माझा लेख इथे देत आहे. इतरत्र प्रकाशित झालेले साहित्य इथे देणे मिपाच्या नियमांत बसत नसेल तर हा लेख उडवावा अशी संपादकांना विनंती. टीप : लेखाबरोबर प्रकाशित केलेली सर्व प्रकाशचित्रे त्या दैनिकाने लेखाला जोडली आहेत. मी केवळ लेख पाठवला होता. "योगा" ची बाजारपेठ (Yoga Inc.

अशा सांजवेळी...

लेखक श्रीगणेशा यांनी गुरुवार, 22/07/2021 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
एक नवीन मराठी गाणं ऐकण्यात आलं... "अशा सांजवेळी" सुंदर शब्दरचना, सुमधुर संगीत आणि तितकाच सुरेल आवाज. सर्व अगदी जुळून आलं आहे. (संगीतकारांच्याच शब्दात) बासरी आणि मोहनवीणा या वाद्यांच्या मधुर आवाजाने गाण्याची सुंदरता अजूनच बहरली आहे. गाण्याची YouTube लिंक: https://www.youtube.com/watch?v=Stcrt7_mPKY मिपाकरांनो.. एखादं भावलेलं नवीन गाणं ऐकलं असेल तर इथे नक्की सांगा.

सिलींडर ४

लेखक नीलकंठ देशमुख यांनी गुरुवार, 22/07/2021 08:33 या दिवशी प्रकाशित केले.
सिलींडर ४ लग्नघरातून सुटका झाल्यावर,टेम्पोजवळ व-हाडाची वाट पाहात थांबलो.ड्रायव्हर क्लिनर बिड्या ओढत उभे होते.साडेचार वाजतआले होते.हळूहळू एक एक करत किरकोळ व-हाडी,किरकोळ सामानासह टेम्पोकडे येऊ लागले.काही वेळाने,बॅंडचा आवाज येऊ लागला.कपाळी मुंडावळी,हाती मोत्याच्या नारळाची दुरडी घेतलेला,डोक्यावरचे टोपी मुळे जास्तच बावळट दिसणारा नवरदेव,मागे कणकेचे दिवेअसलेले ताम्हण हाती घेतलेली करवली,वरमाय व इतर महत्वाची माणसे वाजत गाजत वरातीने आली.नशीब ,त्या काळी लग्न कायदेशीर ठरण्यासाठी वराती समोर नाचायचा विधी अनिवार्य नव्हता.नाहीतर रात्रीचे बारा इथेच वाजले असते.सामान आणि पॅशींजर टेम्पोत चढवणे,बसवणे मोठे अवघड काम

कविता

लेखक VRINDA MOGHE यांनी बुधवार, 21/07/2021 22:47 या दिवशी प्रकाशित केले.
खोल ह्रदयात उमटला, नादमय विणेचा झंकार, सावळे रूप विठाईचे, जाहले नयनात साकार !! मकरकुंडले डुलती कानी, पीतांबर झळके कटीवर, वारक-यांची वाट पाहत, उभा ठाकला विठू वीटेवर !!

डोक्याला शॉट [सप्तमी]

लेखक गड्डा झब्बू यांनी बुधवार, 21/07/2021 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वपिठिका भडकलेल्या तपास अधिकाऱ्यांनी माझ्या खाजगी पर्णकुटीचा नाजुक दरवाजा दयाच्या मदतीशिवाय सहजपणे तोडला आणी आत घुसुन मला व बुसाबाला खेचुन एकमेकांपासुन वेगळे केले त्यावेळी आमची तीन दिवस आणि तीन रात्रींसाठी लागलेली अखंड रूदन समाधी भंग पावली!