१.धंदा करायची इच्छा बाळगर्याला आमंत्रण लागत नाही. गुडद्यात ताकद असली की पुरे.
२. बँकेकडुन थोडे कर्ज घेतले की तो कर्ज घेणार्याचा त्रास असतो. भरपुर घेतले तर तो त्रास कर्ज देणार्या बॅकेचा असतो.
___________________________________________________________
नोकरीचा खूप कंटाळा आला. खणखणीत पगार, जेवणखाण, इतर सेवा मोफत असुनसुद्धा. असंख्य वेळा तेच तेच बोलुन अक्षरशः वैतागलेलो होतो. लोकांच्या 'टाइम्ज , मोशन, अॅक्शन 'चे प्रश्न संपायचेच नाहीत. दर दहा पेशंट मागे ४ जण 'वेळ' वाढवायच्या विनंती घेउन यायचे. ७ दिवसाच्या नोटीस ने नोकरी सोडली. साहेब वैतागला. 'स्टार बॅट्समन' रीटायर होणार होता.