Skip to main content

पुन्हा पेशवाई?

लेखक विकास यांनी शुक्रवार, 10/07/2009 05:58 या दिवशी प्रकाशित केले.
काय चाललयं काय महाराष्ट्रात आणि ते ही पुंण्यात? पाण्याचे निमित्त करत पेशवाई आणायचा घाट घालणे चालले आहे असे वाटू लागले आहे...तसे वाटायचे कारण काय? आजच्या म.टा. मधील ही बातमी: पेशवाई पाणी योजना पुण्याला तारतील? आता ती बातमी पूर्ण तेथे वाचता येईलच पण नजरेखालून घालता यावेत म्हणून काही मुद्दे देत आहे:
पुणेकरांना प्रथमच पाणीकपातीला सामोरे जावे लागत असताना पेशवेकाळातील पाणीपुरवठ्याच्या योजनांचा शोध आता पालिकेने सुरू केला आहे.

निळूभाऊंकरता प्रार्थना..

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 09/07/2009 17:43 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या सहजसुंदर अभिनय कौशल्याने गेली अनेक दशकं तमाम मराठी रसिकांची मनं जिंकलेले, आणि उत्तम कलेसोबतच संवेदनशील सामाजिक जाणीव असलेले गुणी कलाकार, एक अत्यंत सर्जनशील, सहृदय व्यक्तिमत्व निळू फुले म्हणजेच तुम्हा-आम्हा सर्वांचे लाडके निळूभाऊ गेले काही दिवस आजारी आहेत.. त्यांना श्वसननलिकेच्या कर्करोगाने ग्रासलेले असून सध्या ते रुग्णालयातील अतिदक्षता विभागात असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्या यातना कमी व्हाव्यात आणि त्यांच्या प्रकृतीस लौकरात लौकर आराम वाटावा हीच ईश्वरचरणी सार्‍या मिपा परिवारातर्फे प्रार्थना...! तात्या.

दखल

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 09/07/2009 17:13 या दिवशी प्रकाशित केले.
येक कविता लिहु पाहता ऐसे होते लिहिता लिहिता शब्द अटत जाती हाती येता उरते केवळ शुष्क गाथा. न लिहिता ऐशी कविता मनात होई त्याचा चोथा काय करु सांग मनमिता कसा लिहु माझ्या मनगीता घेऊन माझी झाडाझडती शब्द बापुडे आडवे जाती कठोर वज्रापरी करुनी छाती येताजाता मला भिवविती लिहिली कोणी ऐशी कविता सांगेल का कोणी रचयीता धैर्य आणिले कोठून मांडण्या हीन आणि हिणकस म्हणण्या लिहीने मीही म्हणतो तैसे बोटचेपे अवघड आणिक पेना वरती टोपण जैसे वसन भरजरी विकेन शब्द उगाच वाचक करेल अब्द होईल कविता माझी ऐशी नसेल दुसरी इतःपर तैशी खातरी माझी ही मोजावी माझ्याच शब्दांस मी दाद द्यावी कुणा वाटे त्यास आग लावावी कुणा वाटे त्

"ह्या भेटीने माझ्या सन्मानाचं सार्थक झालं."

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 09/07/2009 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
"सुजाता, तुझा सन्मान होण्यास खरोखरंच तू पात्र आहेस.माझी ही भेट तू घरी गेल्यावर उघडून बघ." सुजाताचा ह्या वर्षाची उत्तम शिक्षिका म्हणून तिचा तिच्या शाळेत सन्मान केला गेला.सुजाताची आई त्याच शाळेत अनेक वर्ष शिक्षण देण्याचं पुण्य कार्य करून निवृत्त झाली होती.मी तिला आमच्या घरी बोलवून पार्टी दिली.जेवण वगैरे झाल्यावर मी सुजाताशी गप्पा केल्या. "सुजाता तू तुझ्या आईमुळे शिक्षिका व्हायला प्रवृत्त झालीस का?" असं सरळ प्रश्न केला. मला म्हणाली, "मला वाटतं,जे ज्ञान आत्ता उपलब्ध आहे आणि उद्या विकसित केलं जाणार आहे त्यांच्या मधलं शिक्षक हे एक प्रवेश-द्वार आहे.

भारतीय शिक्षणव्यवस्था जागतिक बातमीत...

लेखक बहुगुणी यांनी गुरुवार, 09/07/2009 00:53 या दिवशी प्रकाशित केले.
...yet again for the wrong reasons!! नेचर मेडिसीन या विख्यात नियतकालिकात वेशीवर टांगलेली ही लक्तरं: मूळ वृत्त स्त्रोतः पण हे फक्त या दोनच मेडिकल कॉलेजेस पुरतं किंवा एका विद्यापीठापुरतं नक्कीच मर्यादित नाही, इतर ठिकाणच्या भ्रष्टाचाराचं काय? शिक्षण मंत्रालयाने इतरही ठिकाणी पाठपुरावा करायला सुरूवात केली आहे असं या वृत्तात म्हंटलं आहे, ते खरंच होईल तो सुदिन!

आणखी शिकून काय करु?....

लेखक अजय भागवत यांनी बुधवार, 08/07/2009 23:31 या दिवशी प्रकाशित केले.
ही स्लाईड मला आवडते- मी ती अधून-मधून वापरतो. त्यातील मुळ वाक्ये येथे मराठीत भाषांतर केलेली आहेत. ह्या धाग्यावर काथ्याकूट झालाच पाहीजे असे नाही, पण सोयीचे वाटले म्हणून काथ्याकुट निवडले.

पुरोगामी/लिबरल म्हणजे तरी काय?

लेखक नितिन थत्ते यांनी बुधवार, 08/07/2009 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
(दोन दिवसांच्या अ‍ॅब्स्टेन्शननंतर पुन्हा - नवीन नावाने - प्रवेश) सध्या मिपावर विविध धाग्यांच्या निमित्ताने 'पुरोगामी असणे' हा विषय चर्चिला जात आहे. पुरोगामी लोकांनी व्यक्त केलेल्या मतांबाबत काही सदस्यांच्या भावना तीव्र होऊन त्यांनी त्यांचा धिक्कार करणार्‍या सह्या निर्माण केल्या. ज्यांनी या सह्या आपल्या प्रतिसादात वापरल्या ते प्रतिगामी आहेत का? तर नाही त्यांच्यातल्याच अनेकांनी 'स्त्रियांचे कपडे' टाइप अनेक धाग्यांवर पुरोगामी म्हणता येतील अशा स्वरूपाची मते व्यक्त केली आहेत. त्यामुळे माझ्या मनात जे वैचारिक मंथन झाले त्याचे हे प्रकटन आहे.

खुळ्या भिंगोर्‍या

लेखक नीधप यांनी बुधवार, 08/07/2009 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
मगाशी एका पुस्तकाची माहीती टाकली त्या धाग्यावर आणि माझी एक जुनी कविता आठवली. माझ्या ब्लॉगवर आहे. ती परत इथे डकवतेय.
Taxonomy upgrade extras