Skip to main content

गोकुळ अष्टमी  ..स्त्रीला भेटत राहतो कान्हा

लेखक Bhakti यांनी सोमवार, 30/08/2021 07:16 या दिवशी प्रकाशित केले.
कृष्णा ..सावळा..बासुरीवाला..राधेचा सखा..अगदी लहानपणापासून आपण याची अनेक रूपे पाहत मोठे होत आलो आहोत.मुलींना त्याच बासारीधारक रूप आवडतं. लहान असताना कान्ह्याच्या रम्य नटखट गोष्टी ऐकल्या आहेत.अजूनही छोटा कान्हा माती खातो तेव्हा यशोदामय्या त्याला दरडावून तोंड उघडायला सांगते  तिला विश्वरूप ब्रम्हांड दिसते आणि तिला भोवळ येते.हि गोष्ट फार फार आवडते.

पारनेर -१ (ढोकेश्वर लेणी )

लेखक Bhakti यांनी रविवार, 29/08/2021 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या इतकी व्यस्तता झाली आहे की १०-२० किमीची भटकंतीही सुसाह्य झाली आहे.घर की मुर्गी दाल बराबर सारख ण करता आसपासच्या ठिकाणांना करोनातला आधार म्हणून डावलून कसे चालेल.टाकळी ढोकेश्वरची लेणी (गुहा) पाहण्याचा सूटसुटीत बेत आखला . “श्रावण मासातली हिरवाई पाहत रस्ता कापत होतो.रस्त्याच्या दुतर्फा देवबाभाळाची आणि पिवळ्या रंगांच्या फुलांनी मांडव घातला होता.शेतातली पिकं,झेंडूची फुले ,सूर्यफुल मन मोहित करीत होती.एक हिरवाईने नटलेला डोंगर दिसला येतांना थांबूया इथे ठरवले.हवेत आल्हाददायक गारवा जाणवत होता.मनोमनी पावसाची इच्छा बाळगत होते. एक तासांत ढोकेश्वर कमान आली.गावापुढचा रस्ता कच्चा थोडा होता.तलावाचा पूल

सद्गुणांचं संचित

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 29/08/2021 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
अंतरी अधिवास करून असलेल्या तरल भावना, भावनांच्या वर्तुळात विहार करणाऱ्या सरल संवेदना, कृतीचे किनारे धरून वाहणारा सोज्वळपणा, नीतिसंमत संकेतांना प्रमाण मानणारा सात्विक विचार अन् त्या विचारांना असलेले मूल्यांचे भान, त्यातून जगण्याला लाभलेले नैतिक अधिष्ठान, कार्याप्रती असणारी अढळ निष्ठा, विसंगतीपासून विलग राहणाऱ्या विचारांना प्रमाण मानत जीवनाचा नम्रपणे शोध घेऊ पाहणारी नजर अन् नजरेत सामावलेलं प्रांजळपण, या आणि अशा काही आयुष्याला अर्थ प्रदान करणाऱ्या धवल गुणांचा समुच्चय कोण्या एकाच एक व्यक्तीच्या ठायी असू शकतो का? नक्की माहीत नाही. पण बहुदा नसावाच.

वरदान

लेखक भागो यांनी रविवार, 29/08/2021 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
वरदान संध्याकाळचे सहा वाजले की माझी पाऊलं अपोआप हॅाटेल सवेराकडे वळतात. आज पण मी समोरचे कागद बाजूला सारून, कपडे करून बाहेर पडलो. माझ्या नेहमीच्या हॅाटेलच्या मध्ये जाऊन चहा पीत बसणे हा माझा आवडीचा टाइम पास होता. ह्या हॅाटेलची रचना मोठी सुरेख आहे. काही टेबल आंत होती तर काही बाहेर मोकळ्यावर. ज्याची जशी आवड त्याप्रमाणे लोक बसत असत. मी नेहमी बाहेर एका ठरलेल्या जागी जाऊन बसतो. ह्या जागेवरून रस्त्यावरची रहदारी अगदी सहज नजरेस पडते. मी येईपर्यंत शेट्टी त्या टेबलावर रिझर्वची पट्टी लाऊन ठेवत असे. माझ्यापासून शेट्टीच्या हॅाटेलचा खास फायदा होत असेल असे नाही.

नियोजन आर्थिक आपत्तीचे !

लेखक kvponkshe यांनी शनिवार, 28/08/2021 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
============================================================================================ ॐ श्रीं ह्रीं श्रीं नम्:”, “ऊँ श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसीद प्रसीद श्रीं ह्रीं श्रीं ऊँ महा लक्ष्म्यै नम्:” हा मंत्र म्हणून श्री यंत्राची विधिवत पूजा केल्याने घरात लक्ष्मी स्थिर राहते आणि सर्व प्रकारच्या आर्थिक संकटांपासून तुमचे रक्षण होते. ============================================================================================ असो ! आपण सगळेजण खूप कष्ट करून पैसे कमावतो. आपल्याला आनंद मिळावा म्हणून तो खर्चून विविध मार्गांद्वारे आपण आनंद मिळवतो.

लोणावळा ते पुणे

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 28/08/2021 10:34 या दिवशी प्रकाशित केले.
व्हिस्टा डोमच्या ‘दख्खनच्या राणी’तून लोणावळ्यापर्यंत प्रवास केल्यावर आता वेळ होती, परतीला ‘01007 दख्खन विशेष एक्सप्रेस’मधून पुण्याला परतण्याची. त्यासाठी मी लोणावळ्याच्या फलाट एकवर येऊन बसलो होतो. लोणावळ्यात हलका पाऊस सुरू होताच, शिवाय स्थानकातून आजूबाजूला दिसणारे हिरवेगार डोंगर ढगांमध्ये अर्धे लपलेले दिसत होते. सध्या आरक्षणाशिवाय कोणालाही रेल्वे प्रवासाची परवानगी नसल्यामुळे लोणावळ्याच्या तीनही फलाटांवर थोडीशीच वर्दळ दिसत होती. एरवी ’15 ऑगस्ट’ म्हटल्यावर या फलाटांवर किती गर्दी दिसली असती. वर्दळ नसल्यामुळे स्थानकावरचे स्टॉलही साडेआठ वाजताही बंदच होते.

वजिर सुळका ट्रेक.

लेखक इरसाल कार्टं यांनी शुक्रवार, 27/08/2021 15:27 या दिवशी प्रकाशित केले.
ठाणे जिल्ह्यातील 'माहुली' हा किल्ला ट्रेकर्ससाठी एक आवडता ट्रेक आहे. त्यातही तो मुंबईकरांना जवळ. मुंबई-नाशिक राष्ट्रीय महामार्गाला लागून असलेला हा गड त्याच्या सुळक्यांसाठी प्रसिद्ध आहे. त्यातीलच एक सुळका म्हणजे 'वजीर' सुळका. माहुली गडाचा पसारा हा दक्षिण उत्तर असा पसरला असून त्याच्या दक्षिणेला अनेक सुळके आहेत. यातील सगळ्यात शेवटचा सुळका म्हणजे वजीर. माहुली किल्ल्याचाच भाग असला तरी वजीर सुळक्याचा ट्रेक हा माहुली किल्लयाच्या ट्रेकपासून पूर्ण वेगळा आहे. तसेच, वजीर ट्रेक हा तुलनेने खूप सोपा ट्रेक आहे.

माळशेज घाट आणि खिरेश्वर .

लेखक कंजूस यांनी शुक्रवार, 27/08/2021 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावणाच्या निमित्ताने आणि लॉकडाऊनमुळे देवळे बंद आहेत शंकराची. म्हणजे नावाजलेली बंद आहेत. पण हे खिरेश्वर पाहता येईल. कालच माळशेज घाट परिसर फिरून आलो. खूप पाऊस नसणे आणि अजिबात नसणे याचा मध्य गाठून जावे लागते. म्हणजे धबधबे, सृष्टीसौंदर्य दोन्ही मिळते. सध्या लॉकडाऊनमुळे पर्यटनाच्या जागा फारच थोड्या शिल्लक आहेत. धार्मिक स्थळेही बंदच आहेत. मित्रांचा भीमाशंकर ट्रेकचा ( खांडस मार्गे) आग्रह होता पण देऊळच बंद असल्याने एकूण फसणार हे सांगून माळशेज घाटातले खिरेश्वर सुचवले. जवळच्या खिरेश्वर गावाजवळचे म्हणून हे नाव. परंतू नागेश्वर हे नाव आहे. इथूनच एक वाट हरिश्चंद्रगडाकडे जाते. दोनवेळा गेलो आहे.

अभियांत्रिकीचे दिवस-६.. 'जिव्हाळा' विशेष..!

लेखक पाटिल यांनी गुरुवार, 26/08/2021 20:50 या दिवशी प्रकाशित केले.
[हॉटेल 'जिव्हाळा' मेन्यूकार्ड: चिकनथाळी -- फक्त ६० रूपै] त्या शहरातली नेहमीसारखीच एक मोकळी संध्याकाळ आणि त्यात कुंद कुंद पावसाळी हवाही फारच उदास पडलेली...! आणि शिवाय दुपारी बॅकलॉगचा एक पेपर देऊन दु:ख फारच अनावर झाल्यामुळे, आम्ही सगळे ताबडतोब 'मैफिल बार अँड रेस्टॉरंट' येथे जाऊन बसलो. अर्थात, त्यावेळी व्हाईट मिसचीफ व्होडका, साधं पाणी आणि चकण्याला उदाहरणार्थ चणा-डाळ-कांदा वगैरे मिक्स करून, एवढंच परवडण्यासारखं होतं..! शिवाय व्होडकाही समजा स्वस्तातलाच आणि पिण्याची पद्धतही समजा रानटी, घपाघप आणि 'टॉप टू बॉटम' वगैरे...!

शाळा आणि "ती"

लेखक चक्कर_बंडा यांनी गुरुवार, 26/08/2021 17:45 या दिवशी प्रकाशित केले.
                   नावसुद्धा माहीत नसलेली रानफुलं फुलायची त्या माळरानावर, जिथं ती शाळा होती. त्या फुलांच्या ताटव्यांमधून पायवाट काढीत ती चालत यायची. स्वप्नचं जणू तरंगत येतंय हवेतून असं वाटायचं. सायकलवरून रोज घामाच्या धारा लागेपर्यंत, नेटाने किल्ला लढवत रहायचो मी, ती बसलेल्या वडापला गाठण्यासाठी.... ती मात्र खिडकीतून अनोळखी कुतुहलाने पहायची नेहमीचं, सर्कशीतील विदूषकाकडे पाहावं तसं !! कधीतरी ती वेणीत फुलं माळून यायची, मग मी माळरानावरील फुलं गोळा करून खिशात ठेवायचो.. !!!