वाचता वाचता
कालच एका दमात प्रा. दामोदर धर्मानंद कोसंबींच्या Myth and Reality या इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद वाचून संपवला आणि एक बर्याच वर्षांची कोसंबींचे लिखाण वाचण्याची इच्छा पूर्ण झाली. पुस्तकाचा परिचय करून देणं माझ्या (मराठी) लेखनक्षमतेच्या आवाक्याबाहेर आहे. पण माझ्या एका मानववंशशास्त्रज्ञ असलेल्या फ्रेन्च मित्राने सांगितलेल्या एका सत्याची पुन: एकदा प्रचीती आली. त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. तो म्हणतो की, जगभर गैरसोयीचा इतिहास पुसून टाकायचे काम केले जाते. पण हे पुस्तक वाचल्यावर गैरसोय निर्माण करणारे विद्वान पण कसे अडगळीत जातात हे बघायला मिळते. आतापर्यंत प्रा.
मिसळपाव