Skip to main content

डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट .

लेखक शशिकांत ओक यांनी रविवार, 29/05/2011 00:07 या दिवशी प्रकाशित केले.
डॉ. जी. जॉन सॅम्युएल - द्राविड भाषाभ्यासक पंडित यांची भेट ....
"सध्या सर तमिळभाषेला जागतिक पातळीवर अभिजात भाषेचा मान मिळवून देण्यासाठी संशोधन कार्य करतायत, त्यात अत्यंत व्यस्त आहेत. तुमची अपॉईंटमेंट आहे का? काहीही झाले तरी १५ मिनिटांपेक्षा जास्त वेळ काही मिळणार नाहीए." आम्हाला रिसेप्शनवरच कडकडत्या तमिळमिश्रीत इंग्रजी उच्चारांमधून समज दिली जाते.

कच्चे मुर्ग की बिर्याणी

लेखक सानिकास्वप्निल यांनी शनिवार, 28/05/2011 04:51 या दिवशी प्रकाशित केले.
मास्टरशेफ संजीव कपूर ह्यांच्या खाना खजाना मध्ये ही पा़कृ पाहीली होती , तीच करुन बघीतली आणी इथे देत आहे :) साहित्य चिकन मुरवण्यासाठी: १/२ किलो साफ करून तुकडे केलेले चिकन २-३ टेस्पून आले+लसुण पेस्ट २ कप दही १ कप तळलेला कुरकुरीत कांदा १/२ कप बारीक चिरलेला पुदीना १/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर १ टीस्पून वेलचीपूड २ टीस्पून लाल तिखट १ १/२ टीस्पून गरम मसाला १ टेस्पून लिंबाचा रस १ हिरवी मिर्ची चिरून मीठ चवीनुसार १-२ टेस्पून तुप .

देवाचिये द्वारी...

लेखक धन्या यांनी शुक्रवार, 27/05/2011 23:46 या दिवशी प्रकाशित केले.
देवाचिये द्वारी उभा क्षणभरी । तेणे मुक्ति चारी साधियेल्या ॥ हरि मुखे म्हणा हरि मुखे म्हणा । पुण्याची गणना कोण करी ॥ असोनि संसारी जिव्हे वेगु करी । वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ॥ ज्ञानदेव म्हणे व्यासाचिया खुणा । द्वारकेचा राणा पांडवा घरी ॥ ज्ञानीयांचा राजा ज्ञानदेवाने लिहिलेल्या हरिपाठाच्या सत्तावीस अभंगांपैकी हा पहिला अभंग. हरिपाठ म्हणजे (हरि या) देवाचे नामस्मरण. देवाच्या भक्तीचे अनेक प्रकार आहेत. नवविधा भक्ती वगैरे...

मुंबई क्विझ...१..

लेखक गवि यांनी शुक्रवार, 27/05/2011 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईशी आपल्या सर्वांचा संबंध कधी ना कधी येतोच. मुंबईत राहात नसलो तरी. आणि त्यातल्या त्यात मुंबईत राहणार्‍यांचा तर अर्थात रोजच. पण, मजसहित सर्वच मुंबईत राहणार्‍या माणसाची थोड्याफार फरकाने कुत्र्याने चावा घेतल्यासारखी धावपळीची लाईफस्टाईल असते. अशा लाईफमधे अक्षरशः मानेच्या वर नजर उचलून आजूबाजूला बघणेही कधीकधी जमत नाही. एक छोटीशी फोटो क्विझ सुरु करु धजावतोय. मुंबईतील ठिकाणे ओळखा. सध्या चारच प्रतिमा टाकतोय. अगदी साध्या कॅमेर्‍याने काढलेल्या आहेत. फोटोग्राफीचे कौशल्य म्हणून अजिबात पाहू नये ही विनंती. ओळखण्याचा प्रयत्न कराल? १.

त्याची भेट

लेखक चाणक्य यांनी शुक्रवार, 27/05/2011 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
तो मला अचानकच भेटला. साधारण वर्षभरापूर्वीची घटना असेल. खरतर तारीख मा़झ्या लक्षात रहायला हवी होती. कारण त्याची भेट हि मला बर्‍यापैकी बदलून टाकणारी घटना होती. थंडीचे दिवस होते. ऑफिस च्या कामाने वैतागलो होतो. फारच लोड आला होता. त्यातून सततच्या टूरिंगमुळे जरा होमसिक ही झालो होतो. अश्याच एका सोमवारी ऑफिसच्या कामासाठी सकाळी लवकर निघायच होत. रविवारी संध्याकाळी जाम कंटाळा...नव्हे सगळ्याचा अगदी उबग आला होता. रात्री डोळ्याला डोळा काहीलागेना. Mid-life Crisis आयुष्यात फारच लवकर व्हायला लागला होता बहुतेक. कारण आपण काय करतोय? आपल्या आयुष्याचा उद्देश काय वगैरे प्रश्न पडायला लागले होते. (अजुनही पडतात).

डल्लासविषयी माहिती हवी आहे

लेखक गणा मास्तर यांनी शुक्रवार, 27/05/2011 11:29 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, मागची २ वर्षे आम्ही पोटापाण्याच्या गडबडीत असल्याने मिपावर येउ शकलो नाही. (ऑफशोअरला लई काम असते बुवा). तर सांगायचा मुद्दा असा की नोकरीनिमित्त आम्हाला डल्लास (टेक्सास) येथे १-२ वर्षाकरता जावे लागणार आहे. मी किंवा माझे कोणी मित्र, परिचित अमेरिकेत गेलेले नसल्याने मल मिपाकरांकडुन थोडी मदत हवी आहे. मी माझे प्रश्न शंका खाली विचारल्या आहेत, जमेल तितके शंका समाधान करावे अशी विनंती. १. डल्लास शहर राहण्यासाठी कसे आहे.(गुन्हेगारी, वर्णद्वेष आहेत का) २. डल्लासमध्ये राहण्यासाठी सुयोग्य परिसर कोणता? (कामाचे ठिकाण बहुतेक चेस सेंटर असणार आहे). ३.

राजाराम रेग्याचे प्रकरण

लेखक हुप्प्या यांनी शुक्रवार, 27/05/2011 04:01 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.hindu.com/2011/05/26/stories/2011052667061400.htm डेव्हिड कोलमन हेडली नामक नाव धारण करणारा एक पाकिस्तानी, इस्लामी, जेहादी अमेरिकन कोठडीत पोपटासारखा बोलू लागला आहे. त्याच्या कबुलीजबाबातून राजाराम रेगे नामक एक गूढ बाहेर पडले आहे. हा माणूस नक्की कोण आहे? उद्धवचा पब्लिक रिलेशन्स ऑफिसर आहे असे त्याने हेडलीला सांगितले होते. " माझी कनेक्षन पार वरपर्यंत आहेत. आणि आपल्याकडे १० हजार कोटी रुपयांच्या प्रोजेक्टस आहेत. आपण दोघेही मिळून भरपूर कमाई करु या" अशा मजकूराची इमेल रेग्याने हेडलीला पाठवली.

मासे २६) कडकड्या/करकर्‍या

लेखक जागु यांनी शुक्रवार, 27/05/2011 01:16 या दिवशी प्रकाशित केले.
हा आहे कडकड्या, बाजारात जाऊन कोळणीने वाटा लावलेला तिथेच मोबाईलमधुन फोटो काढल्याने क्लियर नाही आला. तळण्यासाठी साहित्य: कडकड्या च्या तुकड्या हिंग, हळद मसाला मिठ तेल लसुण पाकळ्या (ऑप्शनल) ठेचुन पाककृती: तेल सोडून तळण्यासाठी लागणारे सगळे जिन्नस एकत्र तुकड्यांना कालवुन घ्या. तवा गॅसवर चांगला गरम करा. तवा जर निट तापला नसेल तर तुकड्या चिकटतात. मग तव्यात तेल सोडून हव्या असल्यास लसुण पाकळ्या टाकुन त्या बाजुला सारुन तुकड्या सोडा.