गाजराचा हलवा
तुमच्या लक्षात आलंच असेल की हा केवळ 'गाजर हलवा' नाहीये तर रितसर गाजराचा हलवा आहे ;)
लहानपणापासून मला गाजराचा हलवा फार आवडतो. आणि सध्या फ्युजन म्हणून गरम-गरम हलवा आणि त्यावर व्हॅनिला आइसक्रिम मिळते, ते तर...
...... नेहमीसारखा...
आवडायला लागलाय मला आता तो कर्नकर्कश्य गोंगाट... कारण विसरायला लावतो तो मला स्वतःला...
कुठेतरी त्या गोंगाटात दाबले जातात माझे हुंदके... एवढे कि स्वतःचेच स्वतःला ऐकू येत नाहीत...
एकटेपणा खायला उठतो... एकटा असलो कि भूतकाळाच्या आठवणी फेर धरून नाचू लागतात भोवती..
जशी गिधाड घिरट्या घालतात आभाळात... वाट पहात कि कधी होतोय लाचार... मग तोडतात लचके...
त्या वेळी मग मुठीत निखारे दाबून, गुढग्यात डोकं खुपसून बसतो...नेहमीसारखा...
जगायलाच विसरलोय आता..
आता तर मला पावसाचीसुद्धा भीती वाटायला लागलीय...
सरीबरोबर त्याच्या कोसळतात तुझ्या आठवणी अंगावर...
त्या वेळी डोळे झाकून चिंब भिजण्याचा प्रयत्नही मी करतो...
चार आणे
काही गोष्टी असतात छोट्या, त्यांच्या असण्याने किंवा असताना फारसा फरक पडलेला नसतो / पडत नाही. मात्र तरीही त्या गेल्या / नसल्या कि मात्र चुकल्यासारख होतं. मागे टाइपराइटरने शेवटचे कडकटट केले आणि आज 'चार आणे' बंद होत आहेत.
माझ्या लहानपणी (म्हणजे वीसेक वर्षांपूर्वी) ह्या चार आण्याला किंमत होती.
वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा
वेगळ्या वाटेवरचा कोकणदिवा
शनिवारी अचानक संध्याकाळी ६.०० वा. फोनाफोनी झाली, आणि आज रात्रीच कोकणदिव्याला जाऊ असं ठरल. आत्तापर्यंत बरेच वेळा रायगडाच्या टकमक टोकावरुन समोरचा कोकणदिवा पाहिला होता, पण प्रत्यक्षात जायची वेळ काही कधी आली न्हवती. अहो रायगडासारखा तेजस्वी तारा असताना या लुकलुकणा-या दिव्यावर कशाला कोण जातो. पण आता आमची वय झाली असल्याने (वय ३४) आणि शक्यतो तेच गड परत परत करायचे नाहीत असं ठरवल असल्याने (भिमाशंकर, राजमाची, हरिश्चंद्रगड ई. ई. सन्माननीय अपवाद वगळता) कोकणदिव्याला फिक्स केल. धावाधाव करुन सामान गोळा केलं आणि रात्री ८.०० वा. व्ह्यन घेऊन निघालो.
रागिणी MMS
काल 'रागिणी MMS' हा बहुचर्चित (?) यशस्वी वैग्रे विशेषणे लागलेला आणि सेक्स थ्रिलर अशी जाहिरात झालेला चित्रपट पाहण्यात आला. यशस्वी थ्रिलर चित्रपटात जे काही असावे लागते ते ह्यात सगळे असूनही हा चित्रपट मनाची पकड घेत नाही. चित्रपटाला अगदीच टुकार म्हणता येणार नाही पण एकदा बघून पश्चात्ताप होणार नाही असे म्हणता येईल. हा खरेतर एक भयपट आहे कारण ह्यात भुताचा वावर आहे. भूत आहे, हिंसा आहे, खून आहे, झपाटणे आहे, भिती आहे आणि.... आणि सेक्स देखील आहे.आंबाडयाची चटणी
आंबाडे पाहील्यावर अनेक जणांच्या लहानपणीच्या आठवणी जाग्या होतात. लहानपणी हे कोवळे आंबाडे खायला मजा यायची. झाडावर दगडे मारुनही आम्ही आंबाडे पाडायचो. मग त्याला मिठ मसाला लावुन खायचे. ती गम्मतच वेगळी होती. पिकलेले आंबाडे त्यांचा स्वाद मला खुप आवडायचा. आंबाडे मिठ घालुनही मुरवत ठेवायचो. आंबाड्यांचा सिझन गेला की मग आंबाड्यांची कोवळी पाने आणि त्यांचे देठ चावुन तो स्वाद मिळवण्या पर्यंत उपद्व्याप चालायचे. अश्याच आंबाड्याची आता चटणी पाहुया.
Crab meat cutlet
साहित्यः
रेडी क्रॅब मिट स्टिक्स - १ पॅकेट
ब्रेड क्रम्ब्स - १/२ वाटी
अंडे - १
आले-लसुण पेस्ट - २ चमचे
तिखट - २ चमचे
हिंग - १/२ चमचा
हळद - १/२ चमचा
धणे पावडर - १ चमचा
लिंबु - १/२
मिठ चवीनुसार
तेल
कृती:
१. रेडी क्रॅब मिट स्टिक्स ह्या frozen मिळतात. त्या defrost करुन घ्याव्यात.
(हा फोटो internet वरुन घेतला आहे)
२. ह्या सर्व स्टिक्स पॅन मधे थोड्या तेलावर shallow fry कराव्यात.
३.
(हा फोटो internet वरुन घेतला आहे)
२. ह्या सर्व स्टिक्स पॅन मधे थोड्या तेलावर shallow fry कराव्यात.
३.
मिसळपाव