Skip to main content

शशक'२०२२ - जॉन डो

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 11/05/2022 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
कुळकुळीत आभाळ, दिवसभर रिपरिप चालूच. मनावर देखील शेवाळंच. मी एकटाच या गच्चीवर. अस्वस्थ. पोलिसांनी याच एरियात स्पॉट केलेल्या सीरियल किलरबद्दल सततच्या बातम्या खाली घरातल्या चालू असलेल्या टीव्हीवर उत्तेजित आवाजात कोणी होतकरू पत्रकार ओरडतोय. इतक्यात खाली दरवाज्याची बेल वाजते. सावधपणे खाली डोकावलं तर रेनकोटमधे निथळत उभी एक पोरगेली आकृती दिसतेय. मी वेळेत खाली दुबकून लपतो. नीट हालचाली केल्या पाहिजेत. शिडीवरुन मागच्या अंगणात उतरुन तिथून पुढे आलो तरच त्याला बेसावध ठेवून मागून घाव घालता येईल. एकच चान्स आहे मला. मी टाकीमागे लपवलेली दाभण उचलतो. अस्वस्थता कमी होत चाललीय, ती सुखद उत्तेजित अवस्था आलीय.