Skip to main content

परा काकांच्या पुस्तकाचे प्रदर्शन. कोण कोण येतंय?

लेखक आदिजोशी यांनी गुरुवार, 08/12/2011 11:01 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वप्रथम पराकाकांचे अभिनंदन. ह्या पुस्तक प्रकाशन समारंभाला कोण कोण येताय? आणि कुठून? म्हणजे जमल्यास एकत्र जाता येता येईल. प्रकाशन स्थळ :- उन्नती गार्डन मैदान, देवदया नगर, ठाणे (पश्चिम) कार्यक्रमाची वेळ :- संध्याकाळी ७.०० वाजता

मासे ३६) घोये

लेखक जागु यांनी बुधवार, 07/12/2011 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः घोये मासे७-८ किंवा त्याचापेक्षा जास्त. हळद पाव चमचा मसाला ७ चमचा मिठ गरजे पुरते तेल तळण्यासाठी थोडा लिंबू रस (ऑप्शनल) आले-लसुण वाटण (ऑप्शनल) पुर्वीच्या काळच्या लेंग्यासारखे वाटतात ना ? :हाहा: कृती : माश्यांचे शेपुट, पर, खवले काढावीत. पोटाच्या जागेवर चिर पाडून आतली घाण काढून मासे ३ पाण्यांमधून स्वच्छ धुवुन घ्यावेत.

सस्नेह निमंत्रण

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 07/12/2011 14:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, माझ्या 'संगणकावर मराठीत कसे लिहाल?' या पहिल्या वाहिल्या मराठी पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी दिनांक १०/१२/२०११ रोजी माननीय श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांच्या हस्ते होणार आहे. तरी ह्या आनंदाच्या प्रसंगी सर्व मिपाकरांची उपस्थिती आवश्यकच आहे. मिपाकरांच्याच आशीर्वादाने, प्रेमाने आणि पाठिंब्याने आज हे यश मिळत आहे.

कोड ऑफ कंडक्ट

लेखक सोत्रि यांनी बुधवार, 07/12/2011 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
"ह्या देशात लोकशाही आहे की सरंजामशाही"? मी वाफाळता चहा घेता घेता एकदम आवेशात बोललो. "काय झाले सक्काळी सक्काळी", आमचे अर्धांगं. "अरे, आता आमच्या बोलण्या चालण्यावर बंधने आणण्याची तयारी चाललीय ह्यांची.", मी. "मी अजून पेपर वाचलेला नाही, मेलं सकाळी उठल्यापासून तुमची आणि मुलांची उठबस करावी लागतेय, लोकशाही नाहीच आहे इथे.", उंच आवाजात आमचे अर्धांगं कडाडले. त्या आवाजाच्या "उंची" वरून जाणवले की आता आपल्या कोंडलेल्या भावनांना ऐकण्यासाठी जर श्रोता हवा असेल तर बायकोशी मांडवली करण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. मी लगेच आवाजात जरा मार्दव आणले.

पण........!

लेखक फिझा यांनी बुधवार, 07/12/2011 10:16 या दिवशी प्रकाशित केले.
तुझ्यासाठी राखून ठेवले होते शब्द, परवा शब्दांची ची एकच घाई उडाली, कागदावर उमटण्यासाठी त्यांची अगदी रांगच लागली भेटणार होतास तू , ठरवले होते म्हणूनच , सांगावे सारे सारे तुला,.......पण ............. न धाडता फक्त लिहिलेली पत्र एक न अनेक, वाचावीत घडा घडा ऐकत राहशील तू फक्त या आशेने सांगत राहावे सारे सारे तुला.......पण....... विणले होते धागे ,गुंतले होते मन कळत होते फुलांनाही आता उमलणे , वाटेवर डोळे लावून बसलेल्या राधेला सतावणे , येशील तेव्हा सांगेन खरे सारे सारे तुला.....पण...... अनोळखी म्हणून भेटलास खरा आत्ताच ओळख झाली म्हणालास खरा जे माझे नव्हते कधीच, मी गमावून बसले होते, तू म

खुणा

लेखक अज्ञातकुल यांनी बुधवार, 07/12/2011 09:23 या दिवशी प्रकाशित केले.
विझल्यात खुणाही सरल्या गाथा उरले गीत व्रणांचे आकाशी तुटल्या तार्‍यांचे खेद कुणाला आता स्वेद ओघळे भाळावरती पाउल पुढचे पडता आग निवळण्याआधी भडके परतुन जाता जाता भंगुरतेचे स्वप्न अनोखे रेखिव घडले लेणे अभंग त्याचे गुणगुणतांना शिरी वाहिले मेणे गोत विखुरले शब्दस्वरांतुन गोत्र एक ते विरघळले पात्र किनारे विस्तारुन अवघ्यांचे सागर झाले .......................अज्ञात ७/१२/२०११
काव्यरस

इंग्लिश, हिंग्लिश आणि मन्गलिश

लेखक ए.चंद्रशेखर यांनी बुधवार, 07/12/2011 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
आंतरजालावर सध्या गाजत असलेल्या 'कोलवेरी डी' या गाण्याबद्दल बोलताना या गाण्याचे गायक धानुष यांनी हे गाणे टंग्लिश या भाषेत असल्याचे सांगितले आहे. टंग्लिश ही कोणती भाषा? याचा खुलासा करताना, तमिळ ढंगाने उच्चारलेले इंग्रजी शब्द या गाण्यात असल्याने या गाण्याची भाषा टंग्लिश आहे असे आपण म्हणतो आहोत असे त्यांनी सांगितले आहे. तसे बघायला गेले तर जगातल्या ज्या ज्या देशात इंग्रजी भाषा बोलली जाते त्या सर्व देशात (अर्थातच इंग्लंड हा देश सोडून) त्या देशाची खास इंग्लिश भाषा तयार झालेली आहे.