Skip to main content

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 02/01/2012 22:52 या दिवशी प्रकाशित केले.
तात्या, तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा! आत्ताच तुझा लेख वाचला. लेख वाचता वाचता अचानक डोक्यात किडा वळवळला आणि वर वाचलेलं 'विसोबा खेचर' हे नाव आणि २ जानेवारी ही तारिख.... झण्णकन डोक्यात प्रकाश पडला, आज तुझा वाढदिवस! पुन्हा एकदा शुभेच्छा! तुझा गाववाला साक्षी

नव्या वर्षात खर्‍या शुभेच्छा, आपण द्याव्या आपल्याला!

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 02/01/2012 21:58 या दिवशी प्रकाशित केले.
नववर्ष (मग ते एक जानेवारी पासून सुरू होणारं विदेशी असो वा बिहु, उगादी, बैसाखी, वा गुढीपाडव्यासारख्या दिवसांपासून सुरू होणारं भारतीय असो) म्हणजे आप्तेष्टांना शुभेच्छा देण्याची एक संधी. ती बर्‍याच प्रकारे साधली जाते. याच सुमाराला नित्याच्या शुभेच्छादर्शक निरोपां/विरोपांसह काही चांगलं, अनपेक्षितपणे वेगळं असं लिखाणही पहायला मिळतं. असंच एक लिखाण माझ्या एका बहुश्रुत मेव्हण्याने (अमितने) मला पाठवलं.

आप के हसीन रुख..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 02/01/2012 21:34 या दिवशी प्रकाशित केले.
आप के हसीन रुख.. (येथे ऐका) यमन रागाच्या पार्श्वभूमीवरचं नय्यरसाहेबांचं रफिसाहेबांनी गायलेलं एक शांत, तरल, सुरेख गाणं.. गिटारने दिलेली लय आणि पियानोचे सुंदर तुकडे. मोजका वाद्यमेळ.

आयुष्य म्हंजे

लेखक निश यांनी सोमवार, 02/01/2012 11:09 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य म्हंजे... एका चांगल्या महागड्या हॉटेलातील जेवण, बील दुसरा कोणी भरणारा असेल तर आनंद देणार व आपल्याला भराव लागणार असेल तर घाम फोडणार... आयुष्य म्हंजे... पहिल्या पगारातुन मुलाने आईवडिलाना प्रेमाने आणलेलि भेटवस्तु व ति भेटवस्तु घेताना मुलाच्या कौतुकाने आलेले आइवडिलांच्या डोळ्यातले आनंदाचे अश्रु... आयुष्य म्हंजे... त्याच मुलाकडुन लग्न झाल्यानंतर बायकोला आइवडिल घरात नको म्हणुन म्हातार्‍या आईवडिलाना वॄधाश्रमात पाठवणारा तोच मुलगा व वॄधाश्रमात जाव लागत म्हणुन मनापासुन घाबरलेले तेच त्याचे आईवडिल व त्यामुळि आलेले त्यांच्या डोळ्यातील दुखाने आलेले अश्रु... आयुष्य म्हंजे... ऑफीसातील कामाच्या

गोल्डन फ्राइड प्रॉन्स

लेखक सुजित फाळके यांनी सोमवार, 02/01/2012 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
माझी मिसळ-पाव वरील पहिली पाककृती माझी प्रिय बायको दीप्ती हिच्यासाठी... साहित्य: १. टाइगर प्रॉन्स २. बेसन ३. मैदा ४. तिखट व मीठ (चवीनुसार) ५. कोथिंबीर ६. लिंबू पाकृ: १. एका भांड्यात ३/४ बेसन व १/४ मैदाचे मिश्रण एकत्र करून घ्यावे. २. ह्या मिश्रण मध्ये पाणी, मीठ व तिखट टाकून थोडे घट्ट मिश्रण तयार करावे. ३. ह्या मिश्रण मध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर व लिंबू पिळून एकत्र करून घ्यावे. ४. त्यात प्रॉन्स टाकून थोड्या वेळ फ्रिड्ज मध्ये ठेवावे. ५.

शांतिनिकेतन- काही प्रकाशचित्रे

लेखक अन्या दातार यांनी सोमवार, 02/01/2012 10:28 या दिवशी प्रकाशित केले.
मागे शांतिनिकेतन या धाग्यात वचन दिल्याप्रमाणे आज तिथले काही निवडक फोटो इथे डकवत आहे. शांतिनिकेतन मध्ये कला विभागात लहान मुलांना संस्कृतीदर्शन व्हावे यासाठी काही भित्तीशिल्पांची निर्मिती करण्यात आली आहे.