Skip to main content

बंडुचा धंदा.. :)

लेखक कॉमन मॅन यांनी सोमवार, 13/02/2012 17:36 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व पात्र व प्रसंग काल्पनिक.. नेहमीप्रमाणे दर ५ सालांनी महापालिका निवडणुका येतात, तशा त्या यंदाही आल्या. महापालिका निवडणुका म्हणजे बंडुचं ५ सालातून एकदा भरघोस उत्पन्न मिळण्याचं पिक. या वर्षीही बंडुने पेरणी-लावणी-कापणी म्हणून जे काय करतात ते सारं केलं आणि त्याला पुन्हा एकदा ५ लाखांचं भरघोस उत्पन्न मिळालं आणि बंडू आज सकाळीच कोकण रेल्वे पकडून चाराठ दिवसांकरता बायको आणि लेकीला घेऊन गोव्याला मस्त मजा करण्यासाठी रवाना झाला! :) बंडु आपल्या विभागात, विशेष करून विभागातल्या 'अबक' समाजात तसा फेमस माणूस. सुशिक्षित, सगळ्यांना मदत करणारा, नेहमी हसतमुख असा.

क्लिक्स...

लेखक चिगो यांनी सोमवार, 13/02/2012 17:06 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी.. मी काढलेली काही छायाचित्रे आपल्यासमोर मांडतो आहे.. १. आसाममधल्या नगाँव शहरात एका कलाकाराकडून घेतलेलं हे लघु-शिल्प.. मला व्यक्तिशः ह्यातील रंगसंगती खुप आवडली.. २. नगाँवजवळच एका जागी फिरायला गेलो असता (बायकोने) काढलेला हा फोटो.. ३.

प्रेमात पुरुष मागासलेला!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 13/02/2012 16:54 या दिवशी प्रकाशित केले.
‘धुंवाधार’ प्रेम करणं पुरुषाला अजूनही उत्तमप्रकारे जमत नाहीच. प्रेम असं केलं पाहिजे की ज्याची मनावरही अन् तनावरही खोल जखम व्हायला पाहिजे. ती ठसठसणारी किंवा भळभळत राहणारी असली पाहिजे. तेच खरे प्रेम. नाहीतर आज प्रेम केलं, उद्या तिनं झिडकारलं, परवा ती दुसऱ्याचबरोबर नांदू लागली हे काही पुरुषाच्या दृष्टीने चांगले घडत नाहीये बरं का! आजकाल कौटुंबिक न्यायालयात प्रलंबित राहणारी असंख्य डिव्होर्सची प्रकरणे कशाची द्योतके आहेत? प्रेम करण्यात पुरुष खूपच मागासलेला आहे असेच म्हणावे लागेल. जो एका स्त्रीला हवं ते प्रेम भरभरून देऊ शकत नाही तो कुठेतरी कमी पडतो आहे हे निश्चित. पूर्वी असं नव्हतं का? होतं.

"आय विल ऑल्वेज लव यू, व्हिटनी ह्यूस्टन"

लेखक प्रास यांनी सोमवार, 13/02/2012 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
१९९२ सालच्या एप्रिल महिन्यात मी एका मोठ्या संकटातून पार झालो. अनेक दिवसांचा माझ्यावरचा 'पालकीय' पहारा त्यावेळी उठला. मी त्यावेळेपूर्वी हवा तेवढा झोपू शकत नव्हतो, खेळू शकत नव्हतो, इतकंच काय तर अगदी हवं ते पुस्तकही वाचू शकत नव्हतो. माझ्या या सगळ्या आवडत्या गोष्टींवर बंधनं टाकण्यात आली होती. माझ्यावर तोपर्यंत शेजार्‍यापाजार्‍यांपासून सतत कुणी ना कुणी लक्ष ठेऊन आहे असंच वाटायचं. बारावीची परीक्षा देत होतो ना मी त्या वर्षी! एप्रिल महिन्यात ती संपली आणि मी एका स्थानबद्धतेतून मला हवं तसं वागण्यासाठी मुक्त झालो.

जळ्ळा मेला पुरुषाचा जन्म !!

लेखक सुहास.. यांनी सोमवार, 13/02/2012 16:45 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्व-प्रकाशित जळ्ळा मेला जन्म पुरूषाचा हे वाक्य डिक्या ने दुसर्‍या(भरलेल्या) ग्लासाच्या पहिल्या घोटानंतर इतक्या आवेशात उच्चारले की आसपासची टेबलं हादरली ! चणे-फुटाण्याच्या वाट्या वाहुन गेल्या, मद्यावरील टेबलप्रेमी...आपल हे...टेबलावरील मद्यप्रेमी मंडळीमध्ये खळबळ माजली, वेटर लोकांनी किचनच्या दिशेन धुम ठोकली आणि खुद्द मॅनेजर पंख्यावर जावुन बसला.

मी एकटी

लेखक प्रिया ब यांनी सोमवार, 13/02/2012 16:16 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकटी आयुष्य एकत्र अनुभवायचं वचन तू विसरलास मला एकटीला सोडून न जाणे का तारा झालास.. कदाचित नाही ओळखता येणार मला इतक्या असंख्य चांदण्यात पण तू मला बघशील वरून अशी खात्री असते मनात रोज इथे येते मी तुला शोधायला या गगनात तुझं अस्तित्व भासतं मला फक्त काळोखात भोवताली काळाकुट्ट अंधार आणि वर मोकळे आकाश निशा झाली आहे माझी सोबती, नको वाटतो आहे हा प्रकाश प्रयत्न चालू आहेत स्वतःला धीट करण्यासाठी खंबीर होऊन एकटीने जगण्यासाठी.. पटत आहे की जिद्दीने दुःख हलके नक्कीच होणार नाही चालणार सतत आश्रू ढाळून कारण आसवांची चव ही नेहमीच खारट असणार ~~ प्रिया

संबंधित मिपाकरांना विनम्र आवाहन - महापालिका निवडणुकीत अवश्य मतदान करा..

लेखक कॉमन मॅन यांनी सोमवार, 13/02/2012 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
संबंधित मिपाकरांना विनम्र आवाहन - येत्या गुरुवारी - १६ फेब्रुवारी रोजी महाराष्ट्रातल्या मुंबई, पुणे, नाशिक, आदी एकूण १० महानगरपालिकांमध्ये आपापल्या प्रभागासाठीच्या 'नगरसेवक' पदाकरता निवडणुका जाहीर झालेल्या आहेत. तरी सर्व संबंधित मिपाकरांना आम्ही विनम्र आवाहन करतो की सर्वांनी या निवडणुकांमध्ये आपला मतदानाचा हक्क अगदी अवश्य व आग्रहाने बजावला पाहिजे.

अमराईतला निवडुंग,

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 13/02/2012 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
डुबुक डुबुक डुबुक डुबुक, डराव डराव डराव डराव, काव काव काव काव, म्याव म्याव म्याव म्याव, तडतड ताशा, धडधड गाज, ढोल वाजतो मठ्ठ स्वरात, वृषभ त्वचा ही पॉवरबाज, वॄषोदर उतरे माडी आज, पंकज भार्या जगास तारी, मोहनमर्कट वन्दा भारी वृषणे ठेचा घाला दोरी, मंडुकरावही चाबुक मारी, पिवळा शेंबुड वाहे भळभळ, अश्वथामा करतो जळजळ, तरुणाईची बिभित्स सळसळ, गाभार्‍यातील पिसाट वळवळ, गुरुवर्यांना सुटते खाज, गुरुकुलातला नंगा नाच, ज्ञानरज्जुला पतंग माज, शरपंजरीवर मदीरा पाज, जगणे थोटे, सारे खोटे, नर्मदेतले दगड गोटे, लोचट कुत्रा पायही चाटे, जनमृत्युचे घालत खेटे, रामाला शरयूने गिळले, शामराव बाणाने निमले या स
काव्यरस

पिल्ले ..!!

लेखक प्रकाश१११ यांनी सोमवार, 13/02/2012 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
अचानक फोन आला. तुमच्या अंगणातील झाडाखाली कुत्रीने पिल्ले टाकली आहेत .. काल संध्याकाळी मी दादाच्या घरी गेलो होतो. घरातून निघताना काम्पौंडचा दरवाजा आतून कडी लावून बंद केला होता. मग कुत्री आत घुसली कशी .? कोणी गेट उघडले ..? का उघडले ..? उघडले तर बंद का नाही केले ..? अशा अनेक प्रश्नांनी मन भरून गेले . आता त्या कुत्रीला नि त्या पिल्लांना बाहेर काढणार तरी कसे ..? माझी रात्र खराब होऊन गेली. गेल्या दोन चार दिवसा पासून कुत्री गेट जवळच झोपत होती. तेथेच रेंगाळत होती. पण ती गर्भार आहे ह्याची मला तरी सुतराम कल्पना नव्हती .आणि असे कधी दिसले, वाटलेही नव्हते .