Skip to main content

ईश्वर , विज्ञान आणि श्रद्धा..

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 14/02/2012 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल ईश्वरावर श्रद्धा असणे हे मागासलेपणाचे लक्षण समजले जाते. बर्याच वेळा ती अ॑धश्रद्धाच ठरवली जाते. ईश्वराच्या अस्तित्वाचा कि॑वा नस्तित्वाचा स्वतः अनुभव घेतल्याशिवाय असे विधान करणे चुकीचे ठरेल. एखाद्या वैज्ञानिकाने जाहीर केले की गॉड पार्टिकल्स आहेत, मग आम्ही लगेच विश्वास ठेवतो. पण युगायुगापासून वेदा॑नी सा॑गितलेल्या प्रक्रुतीच्या तीन मूलभूत तत्वा॑वर् (..सत्व, रज, तम..) विश्वास ठेवणे ही आम्ही अ॑धश्रद्धा मानतो. विश्वाचे कार्य विज्ञान सा॑गेल ते आम्ही खरे मानतो. पण कारणस्वरूपी परमात्म्याच्या अस्तित्वाचा पुरावा लागतो..तोही इ॑द्रियानी गोचर होणाराच.

म्हणून..

लेखक गवि यांनी मंगळवार, 14/02/2012 15:14 या दिवशी प्रकाशित केले.
काही नाही रे भेंचोत.. आमचं नुसतं फ्रेंडलीये.. असं सगळ्या गँगला म्हणत म्हणत आणि आतल्या आत मोहरत जे काही केलं तेव्हाही व्हॅलेंटाईन डे येऊन गेले असणार बरेच.. लक्षात आलं नाही.. आमचं कॅलेंडर वेगळंच होतं.. म्हणून.. तेव्हाही सुरुवात झाली होती.. ग्रीटिंग कार्डांची चार्पाच दुकानं फोडायला.. पण फरक पडला नाही.. कारण ग्रीटिंग घ्यायचं नव्हतंच.. ग्रीटिंगबिटिंग कशाला.. भावनांचं प्रदर्शन नुसतं.. म्हणून.. चॉकलेटं.. हार्टशेपची नव्हती.. तिला दिलं होतं मी.. रावळगाव मला वाटतं.. अन तिनंही मला.. कॉफी बाईट.. रॅपर पडून आहे कपाटात खास कप्प्यात.. ठेवून उपयोग नसला तरी फेकायचं कुठे..

टॅटिंग

लेखक जयवी यांनी मंगळवार, 14/02/2012 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
टॅटिंग..... माझं अतिशय आवडतं काम. लग्न व्हायच्या आधी बरंच काही केलं होतं........अगदी मान मोडेस्तोवर बैठक........ चक्क ४-४ तास एका जागी बसून. लग्नानंतर इतका वेळच मिळाला नाही. बर्‍याच वर्षांनी पुन्हा शटल हातात घेतलं.........

बेडसे लेण्या.....

लेखक मनराव यांनी मंगळवार, 14/02/2012 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस बेडसे लेणी पाहुन येण्याचे मनात होते पण योग जुळुन येत नव्हता. मित्राला शनिवारी फोन करुन विचारलं तर तो चालेल म्हणाला आणि अखेर या रविवारी तो (योग) आला. लेणी जवळच असल्यामुळे भल्या पहाटे उठुन जाण्याचा प्रश्नच नव्हता.

चिंब पावसानं .......!!

लेखक जेनी... यांनी मंगळवार, 14/02/2012 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्याना प्रेम दिवसाच्या मनापासून शुभेच्छा .....त्या निमित्ताने .....माझ्याकडून एक छोटीशी भेट .. माझ्या लिखाणाला ज्या छोट्याश्या लेखातून सुरुवात झाली ..ते माझ्या आयुष्यातल .....माझ पाहिलं लिखाण ... म्हणजे " चिंब पावसान ....!!

मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या सर्वांना शुभेच्छा आणि नीलकांतचे आभार..!

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 14/02/2012 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपाकरांना मधुबालाच्या जन्मदिनाच्या आणि प्रेमदिनाच्या अमेकोत्तम शुभेच्छा..! आणि त्याचसोबत मी नीलकांताचे व प्रशांतचे देखील अनेक आभार मानतो की त्यांनी केवळ माझ्या आग्रहाखातर व माझ्या मनासारखे मुखपृष्ठ आज मिपावर चढवले.. :) सोबत मधुबालाला अत्यंत प्रिय असलेले मथुरा-पेढे येथे आपल्या सर्वांकरता येथे देत आहे..! :) सर्वांना पुन्हा एकदा शुभेच्छा... तात्या.

"सुब्याच्या मिश्या ........!!"

लेखक जेनी... यांनी सोमवार, 13/02/2012 21:26 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी आई ने झोपेतून उठवल...हल्ली सुट्टीच्या दिवशीही कोणी झोपू देत नाही ..का? तर नेमक सुट्टीच्याच दिवशी पाहुणे येणार असतात बघायला ..