Skip to main content

बहारो फूल बरसाओ - ३

लेखक विजुभाऊ यांनी बुधवार, 06/07/2022 09:28 या दिवशी प्रकाशित केले.
माया माझ्याकडे पहाते. थोडी हसते. हसताना तीचे डोळे अधीकच पाणीदार दिसतात. ओठांना लावलेल्या ड्रीम रोझ लिप्स्टीक मुळे तीचे दात ही एकदम जहिरातीतल्या मुलीसारखे वाटताहेत. "अगं चला , चला, तिकडे गुरुजी खोळंबलेत. नवरदेव येऊन उभा देखील राहिला. झालं ना सगळं. बघ गं मीरा, काही राहिलं नाही ना. मायाच्या आईची लगबग सुरू आहे. मागील दुवा http://misalpav.com/node/50355 नेत्री दोन हिरे प्रकाश पसरे अत्यंत ते साजिरे. शुभमंगल सावधान..... सावधान ची सम पकडून लोक अक्षता फेकतात.

किल्ले जीवधन

लेखक चक्कर_बंडा यांनी सोमवार, 04/07/2022 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
२५ -२६ सप्टेंबर २०२१ ही भटकंती तशी मागील वर्षी केली आहे, पुन्हा पावसाला सुरुवात झालीय, अपेक्षा आहे कि आवडेल जीवधन !!! ऐन घाटमाथ्यावरचा उभ्या बेलाग कडय़ावरील दुर्ग. सहय़ाद्रीचा भेदक भूगोल, सातवाहनांच्या पाऊलखुणा आणि प्राचीन नाणेघाटाची सोबत या साऱ्यांनीच हा गड भारलेला आहे. पुणे जिल्हय़ातील जुन्नरपासून २७ किलोमीटरवर, प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी आणि घाटघर गावाच्या परिसरात असलेला हा पूर्वाभिमुख किल्ला प्राचीन नाणेघाटाच्या व्यापारी मार्गाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आला होता. नाणेघाटापासून जीवधन किल्ला अगदी हाकेच्या अंतरावर आहे.

पृथ्वी एक अंतराळयान

लेखक भागो यांनी सोमवार, 04/07/2022 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
तुम्हाला मनातून अंतराळ वीरांचा हेवा वाटत असेल. लहानपणी अनेक स्वप्ने असतात. त्यापैकी एक म्हणजे अंतराळवीर होण्याचे! जुल व्हर्नचे ‘चंद्रावर स्वारी’ पुस्तक वाचले असणारच. पण पुढे मोठे झाल्यावर तुम्ही अंतराळवीरांच्या ट्रेनिंगची चित्रफित बघितली असेल किंवा हॉलीवूडचे चित्रपट बघितले असतील. मनातल्या मनात तुम्ही विचार केला असेल, “नको रे बाबा, त्यापेक्षा आपला ९ ते ५ जॉब चांगला आहे.” पण.... तुम्हाला कदाचित कल्पना नसेल पण आपण सगळेच अंतराळवीर आहोत! तुम्ही, तुमची प्रिया पत्नी, चिरंजीव गोट्या, शेजारचे काका-काकू, सोसायटीचा वॉचमन? येस, तो सुद्धा. आणि आपले अंतराळयान आहे पृथ्वी.

महाराज की जय..

लेखक आजी यांनी सोमवार, 04/07/2022 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या नोकरीच्या निमित्ताने मी एका गावी राहात होते. माझ्या कडे एक १५/१६ वर्षांची मुलगी कामाला होती. वरकाम करायची. मी तिला शाळेतही घातलेली होती. तिच्या शिक्षणाचा खर्च मीच करायची. तिची आई माझ्याकडे काही जास्तीचं काम निघालं तर ते करायला यायची. तिचा नवरा दारुड्या होता. काबाडकष्ट करून मुलीचं,नवऱ्याचं आणि स्वतःचं पोट भरत होती. नेहमीचं चित्र. एके दिवशी मी तिला विचारले,"उद्या माळा झाडायचाय. येशील का?" तर ती म्हणाली,"मला हजार रुपये उसने द्या. मला भगताकडं जायचंय."मी म्हटलं "का ग?भगताकडं का? तुला काही होतंय का?" तिनं उत्तर दिले,"मला बाया आल्याती. उतरवायच्या आहेत." मला काही कळलं नाही.

विजेची गोष्ट ७: तारेतील विद्युत संदेशांची 'इलेक्ट्रिक' भाषा आणि आद्य 'मशीन भाषा' कार सॅम्युएल मोर्स

लेखक अनिकेत कवठेकर यांनी रविवार, 03/07/2022 08:23 या दिवशी प्रकाशित केले.
आज विक्रमाच्या राज्यात काही वेगळ्या प्रकारच्या म्हटलं तर जंगली आणि म्हटलं तर जादूगार वाटाव्या अश्या काही माणसांविषयी फार बोलबाला झाला होता, आजकालच्या भाषेत ते लोक त्यांच्या कारामतींमुळे खूप 'वायरल' झाले होते.  जिकडे तिकडे त्यांचीच चर्चा. नाविन्यपूर्ण गोष्टींची हौस असलेला विक्रम राजा त्यांना ना भेटता तरच नवल होतं. या लोकांचे विशेष म्हणजे यांना प्राण्या पक्ष्यांची, झाडांची, मगरी -विंचवाची भाषा अवगत होती म्हणे. प्रत्यक्ष बघावे म्हणून राजाने त्यांचा प्रयोग सीमेवरच्या संरक्षित अरण्यात ठेवला होता आणि काय तो प्रयोग झाला .. एका अजस्त्र गोरिला माकडाशी त्यांमधील एक माणूस बोलत होता..

त्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणी

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 02/07/2022 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे आणि सिकंदराबाददरम्यान धावणारी शताब्दी एक्सप्रेस 20 मार्च 2020 पासून बंद आहे. या जुलैमध्ये देशात पुन्हा धावायला लागणाऱ्या गाड्यांच्या यादीत या शताब्दीचं नाव नाही. ही शताब्दी सुरू होण्याची वाट पाहून मीसुद्धा कंटाळलो आणि या शताब्दीनं मी केलेल्या शेवटच्या प्रवासाच्या आठवणींना उजाळा देऊ लागलो. पुणे सिकंदराबाद शताब्दी मध्य रेल्वेची एकुलती एक शताब्दी असल्यामुळं ही गाडी स्वच्छ, सुंदर ठेवण्याकडे आणि तिची सेवा कशी चांगली ठेवता येईल याकडे मध्य रेल्वेही जरा जास्तच लक्ष देत असे. नेहमीच्या सवयीप्रमाणे गाडी सुटायच्या आधी तासभर मी पुणे जंक्शनवर पोहचलो. बाहेरून एक गाडी दोन नंबरवर उभी दिसली.

आठवणींच्या जंगलात

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/07/2022 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंग त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे.

अलक - वारी

लेखक मालविका यांनी शनिवार, 02/07/2022 09:15 या दिवशी प्रकाशित केले.
अलक १ भरपूर कष्टातून वर आलेला तो. लक्ष्मी आणि सरवस्ती दोघींचा वरदहस्त असलेला तो तरीही जरा अस्वस्थच असायचा. पाहिजे ते समाधान मिळेना. शेवटी कंटाळून मानसोपचार तज्ञ् गाठला. सगळं गाऱ्हाणं ऐकून झाल्यावर तज्ज्ञांनी हसून त्याला वारीला जायचा सल्ला दिला. त्याचा विश्वास बसेना तरीही त्यांचं म्हणणं ऐकण्यासाठी तो निघाला. त्या लाखो लोकांमधला एक झाला. त्यांच्यासारखाच पेहराव, त्यांच्यातच मिळून मिसळून वागताना तो स्वतःला विसरला. त्यांच्याबरोबर भजन म्हणत, अभंग गात त्यानेहि ताल धरला. इतर वारकर्यांबरोबर टाळ वाजवून नाचताना तो भान हरपला आणि मग त्याला जाणवलं. हेच तर हवं होत आपल्याला.

तो पाऊस निराळा असतो..!

लेखक राघव यांनी शनिवार, 02/07/2022 03:05 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाकडे बघून आलेले हे विचार.. शेवटी आपण सर्व अनुभव मनानेच जगतो. हा मनातला पाऊस कितीतरी वेगवेगळ्या रुपांत जाणवतो. रुपं अनेक आहेत, त्यातली काही मांडण्याचा एक प्रयत्न. :-) रखरखत्या रेताड धरेचा येतो वर्षाकाळ.. मुरमाड मनाच्या मशागतीला मायेचा फाळ.. तो रुततो, खुपतो, नांगरट धरतो, आनंदे वर्षतो.. तो पाऊस निराळा असतो.. मनामनांतील भाव-धारणा जेणे अंगारती.. स्वराज्य विचारे उभ्या ठाकती, लक्ष-लक्ष ज्योती.. राष्ट्रभावना जागृत धरतो, मनगटांत वळतो.. तो पाऊस निराळा असतो.. राष्ट्र उभारावया प्रकटते पुरुषार्थाला साद.. कोटी-कोटी आहुती, गर्जती, प्रणवाचा नाद.. तो त्याग वर्षतो, सिंचतो, घडवतो.. राष्ट्र उद्धारतो..

विठू माउली

लेखक मालविका यांनी शुक्रवार, 01/07/2022 20:42 या दिवशी प्रकाशित केले.
रखुमाई विठ्ठलावर होती थोडी नाराज ठरवले तिने फार बोलायचे नाही आज ठरले होते आधी ते वेळ मला देणार मग जाऊन भक्तांना दर्शन ते देणार भक्त आपले सारखे काही ना काही मागतात विचार न करता हे देऊन सगळे टाकतात आधीच मला ठेवली यांनी स्वतःपासून दूर आषाढीला येईल आता भक्तांचा मोठा पूर लांबूनच मी यांच्यावर लक्ष ठेवून असते कोण येतंय कोण जातंय सगळं बघत बसते हे सुद्धा दिवसभर उभे राहून दमतात मिटल्या डोळ्यांनी सुद्धा जग सगळं पाहतात कधी एकदा हात खाली घेईन असं त्यांना होत पण भक्तांकडेच मन यांचं सारखं ओढ घेत आषाढीच्या आधी जरा विसावू त्यांना म्हटलं दोन घटका चार शब्द बोलावं जरा वाटलं पण आता यांना